५ नोव्हेंबर इ.स.१५५६ पानिपतची दुसरी लढाई

#आजचे_शिव_दिनविशेष
********************


पानिपतची दुसरी लढाई झाली स्थानिक भार्गवकुलीन सम्राट हेमू विक्रमादित्य विरुद्ध परकीय आक्रमक मोगलांचा १४ वर्षांचा वारसदार अकबर. या लढाईनंतरच मुघलांचा हिंदुस्तानात जम बसला. म्हणजे हिंदुस्तानी इतिहासाला वळण देणारी अशी ही महत्त्वाची लढाई होती.
मुळात जमीनदार, नंतर व्यापारी असलेला हेमू नक्कीच असामान्य निरीक्षणशक्ती घेऊन आला होता. हेमूला घोड्यांची आणि हत्तींची चांगली पारख होती. निरीक्षणशक्तीला बुद्धिमत्ता आणि कल्पकता यांची जोड देऊन हेमूने पारंपरिक मैदानी, गोलाच्या लढाईत नवनव्या व्यूहरचना, नवनव्या चाली रचल्या आणि तुटपुंज्या पण वेगवान आणि त्वेषाने लढणार्‍या सैन्यबळावर संख्येने मातब्बर असलेल्या प्रबळ सैन्याविरुद्ध लढाया जिंकल्या. पराभूत सैनिकांचे शिरकाण,मारलेल्या सैनिकांच्या मुंडक्यांचा मनोरा रचून विजयाचा जल्लोष,भाल्याच्या टोकावर मुंडकी खोचून घोड्यावरून दौडत जाणे,पराभूत सेनापतींची मुंडकी तबकातून बादशहाला नजर करणे अशा या मुघलांच्या क्रौर्याचा त्यांच्या सर्व शत्रूंनी धसका घेतला होता. आपल्याकडे क्रूर समजल्या गेलेल्या अफगाणांनी देखील. परंतु हुमायूं आणि अकबर यांच्या या क्रूर सैन्याविरुद्ध तोपर्यंत २२ लढाया हेमूने एकदाही पराभूत न होता जिंकल्या होत्या. बहुतेक वेळा तुटपुंज्या सैन्यबळावर.
६ ऑक्टोबर १५५६ रोजी मुघल सरदार तर्दी बेगचा हेमूने इतका जबरदस्त पराभव केला होता की तर्दी बेग रणांगणातून पळुन थेट काबूलच्या वाटेला लागला होता. व्यसनी,मानसिक रुग्ण असलेल्या आदिलशहा सुरीला फ़ाट्यावर मारुन हेमूने स्वत: हिंदुस्तानचा सम्राट होण्याचे ठरवले व ७ ऑक्टोबर १५५६ रोजी दिल्लीतील प्रसिद्ध पुराना किला येथे हेमूचा हिंदू पद्धतीने दिल्लीची जनता व अफ़गाण व हिंदू सैन्यासमोर राज्याभिषेक झाला.त्याने “सम्राट हेम चंद विक्रमादित्य” असे नाव धारण केले तसेच स्वत:च्या प्रतिमेच्या नाण्यांचे चलनही प्रस्थापित केले.
हेमूच्या बंगालपासून दिल्लीच्या धडकेनंतर व दिल्लीच्या कब्ज्यानंतर मोगल सैन्यात जरब बसली व बर्‍याच मोगल सरदारांनी गाशा गुंडाळुन काबूल येथे राजधानी स्थापून राज्य करावे असे मत व्यक्त केले परंतू बेहरामखान याने हेमूशी युद्धाचा आग्रह धरला. दिल्ली हातची गमावल्यावर १४ वर्षांचा सुल्तान जलालुद्दिनला हेमुच्या भीतीने सुरक्षित ठिकाणी नेले होते. दिल्लीकडे मोगल सैन्याने कूच केल्याची बातमी ऎकून हेमूही सैन्य घेऊन मोगलांचा पाडाव करण्यासाठी निघाला व ५ नोव्हेंबर १५५६ रोजी दोन्ही सैन्याची पानिपत येथे गाठ पडली.
बेहरामखान याने सैन्यास लढाईस प्रेरणा दिली व स्वत: मैदानापासून दूर राहीला. काही इतिहासकारांच्या मतानुसार, हेमूबद्दल प्रचंड भय आणि सुरक्षेच्या कारणास्तव जलालुद्दिन आणि त्याचा रक्षणकर्ता बेहरामखान याने युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला नव्हता. प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ते ८ मैल अंतरावर उभे होते. जलालुद्दिनबरोबर ५००० अतिविश्वासू आणि तयारीचे सैन्य होते, युद्धात पराभव होत असल्याचे दिसून येताच काबुलकडे पळून जावे असा बेहरामखानचा सैन्याला आदेश होता. हेमू स्वत: हत्तीच्या पाठीवरुन सैन्याचे नेतृत्व करत होता. पानिपतच्या या लढाईत हेमूच्या रणनीतीची आखणी नेहमीप्रमाणे होती. हेमूच्या मुख्य सैन्यातल्या हत्तींना तोंड देण्यसाठी शत्रूने आपले गजदळ आणि गजदळाचे संरक्षक धनुर्धर पुढे आणून ठेवले. तरी हेमूच्या सैन्याने प्रखर शौर्याच्या जोरावर शत्रूला मागे रेटले. बाजूने आणि पिछाडीवरून केलेल्या घोडदळाच्या हल्ल्यामुळे शत्रूसैन्याचा व्यूह पुरता विस्कळित झाला. पराभव डोळ्यासमोर आल्यामुळे शत्रुसैन्यात पळापळ सुरू झाली. हेमूचा विजय नजरेच्या टप्प्यात आला.तेवढ्यात शत्रूसैन्य पळत असतांना अचानक एक बाण हेमूच्या डोळ्यात लागला आणि आणखी एका बाणाने निशाण पडले. सैन्याच्या हालचाली नियंत्रित करणारा हेमू बेशुद्ध. आपण जखमी झालो तर सेनापतीपदाचे नेतृत्त्व कुणी करायचे याच्या सूचनाच अस्तित्त्वात नव्हत्या. रणनीतीतली ही फारच मोठी त्रुटी म्हणावी लागेल. हेमू जखमी झाल्याची खबर सैन्यात पसरली व सैन्याचे अवसान गिळाले, गोंधळात सैन्य सैरावैरा पळत सुटले आणि विजयाच्या उंबरठ्यावरून हेमूच्या सैन्याचा पराजय झाला. हेमूच्या हत्तीला बेहरामखानाच्या एका सरदाराने हत्तीवरूनच वेढा घालून वळवून जलालुद्दिनच्या शिबिरात नेले. तिथे जलालुद्दिनला गाझी सिद्ध करण्यासाठी हेमूचे मुंडके छाटले गेले,हेमूचा शिरच्छेद केला गेला. हेमूचे मुंडके हे काबूल मध्ये तर धड दिल्लीला पाठवून टांगण्यात आले. या लढाईत भाग घेतलेल्या हेमूचे सर्व पुतणे हेमूने दत्तक घेतलेल्या पुतण्यासह मारले गेले. लढाईत भाग न घेतलेला एकच पुतण्या गावात होता तेवढाच वाचला. त्याचे वंशज आजही आहेत. जलालुद्दिन दिल्लीच्या तख्तावर बसला व नंतर त्याने ‘अकबर’ हे नाव धारण केले.अकबराने हेमूचा इतका धसका घेतला होता की लढाईनंतर कित्येक महिने भार्गव आडनावाच्या प्रत्येक माणसाला अकबराच्या हेरांनी कापून काढले. भार्गव आडनावाचे लोक मग आडनाव बदलून राहू लागले. आपले देशी इतिहासकार, आपले स्वतःला विद्वान म्हणून समाजात मिरवणारे शालेय पाठ्यपुस्तकलेखककार देखील अकबराचे गोडवे गातात आणि सम्राट हेमू विक्रमादित्याचा साधा उल्लेखदेखील करीत नाहीत याची खंत वाटते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
५ नोव्हेंबर इ.स.१६६४
छत्रपती शिवरायांनी खवासखानाचा पराभव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
५ नोव्हेंबर इ.स.१८१७
इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात खडकी येथे लढाई
खडकी येथे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे
इंग्रजांसोबत भयानक युद्ध झाले. १२ दिवस राघोजी (लहुजीचे वडील) सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी
साळवेंनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन
इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या
स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या
समोर शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. १७
नोव्हेंबर १८१७ रोजी पुणे ब्रिटीशांच्या तावडीत गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻

शिवाजी महाराज्यांची पहिली स्वारी

1646  साली वयाच्या 16 व्या वर्षी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणा किल्ला जिंकला, तोरणा किल्यावर 7 रांजण सुवर्ण मोहरा सापडल्या. त्याच वर्षी कोंडाणा(सिंहगड) व पुरंदर किल्ले जिंकून पुणे प्रांतावर नियंत्रण मिळविले. यावेळी पहिल्या स्वारीत राज्यांबरोबर फक्त 300 मावळे होते.

रायगड

राज्यभिषेक दिन 6 जून.
महाराज्यांच्या काळात रायगडावरील लोकसंख्या कमीतकमी 10000 असे.
65 किल्ल्यांच्या गराड्यात रायगड किल्ला.
2000 फुटावर पहिली तटबंदी
4000 फुटावर दुसरी तटबंदी
किल्याची वाट एकदम छोटी.
किल्यावर 300 इमारती होत्या.
10000 लोकांना वर्षभर पाणी मिळावे यासाठी 9 टाके.
रायगडाला 3 बाजूला तटबंदी नव्हती फक्त पश्चिम बाजूला तटबंदी आहे.
किल्याचे एकूण क्षेत्र 1200 एकर.
रायगडावर 42 दुकाने होती. पैकी 21 दुकाने देशी माल विक्री व 21 दुकाने परदेशी माल विक्रीसाठी

समरभूमी उंबर खिंड : एक गनिमी कावा 

 
२ फेब्रुवारी १६६१
उंबर खिंड लढाई शिवाजी महाराजांना पुण्याच्या मुघली छावणीतील एक महत्वाची खबर मिळाली की, सरदार कारतलब खान मोठ्या फौजेनिशी नागोठणे, चौल, पेण वगैरे कोकणी ठाणी काबीज करण्यासाठी शाईस्तेखानाच्या हुकुमावरून निघत आहे. कारतलब खान उंबरखिंडीने नागोठण्याला उतरणार होता. खानाबरोबर माहूरची प्रख्यात देशमुखीण सावित्रीबाई उदाराम उर्फ पंडिता रायबागन ही शूर स्त्री देखील होती. उंबर खिंड पुण्याच्या वायव्य सरहद्दीवर येते. महाराज आधिच उंबर खिंडीत जावून खिंड अडवून उभे रहिले ! खान आला. पण त्याच्या फौजेला खिंडीच्याजवळ लौकर जाताच येईना. मार्गावर भयंकर आरण्य होते. मराठी फौजेसह शिवाजी राजे खिंडीतच उभे आहेत, याची खानाला कल्पनाच नव्हती ! महाराजांनी वकील पाठवून खानाला ‘सुखरूप सुटायचे असेल, तर आलात तसे परत जा -‘ असा निरोप पाठविला. खानाने तो धुडकावला. मग महाराजांनी आपल्या फौजेला हल्ला चढविण्याचा हुकूम दिला. मुघलांची भयंकर लंगडतोड सुरू झाली. त्यांना त्या घोर अरण्यात लढताही येईना ! पळताही येईना ! या अरण्याचे नाव आहे ‘तुंगारण्य’. अखेर खानाने रायबागनचा शरण जाण्याचा सल्ला ऐकला. खानाने आपला वकील पाठवला. महाराजांकडे वकिल आला. महाराज पांढर्‍या शुभ्र घोड्यावर बसले होते. त्यांच्या अंगावर चिलखत व पोलादी शिरस्त्राण होते. वकिला मार्फत खानाने बिनशर्त शरणागती पत्करली ! खानाचा प्रचंड पराभव झाला ! तो ज्या दिवशी झाला त्या दिवशी तारीख होती – २ फेब्रुवारी १६६१.
प्रचंड दौलत व सैन्य वाया घालवून कारतलब खान पुण्यास परतला. आता त्याला शाईस्तेखानाकडे वर मान करून बघायचिही हिंमत उरली नव्हती. कसाबसा जीव व आब्रू वाचवून तो पुण्यात परतला.

छत्रपती शिवरायांची गारद आणि तिच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ

गडपती – गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असे महाराज.
गजअश्वपती – ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं. म्हणुन गजअश्वपती हा शब्द आपण वैभवसंपन्नतेचे प्रतीक होता असे म्हणता येईल.) भूपती प्रजापती – वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज.
सुवर्णरत्नश्रीपती – राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवरायांच्या बाबतीत ३२ मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती.) अष्टावधानजागृत – आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.
अष्टप्रधानवेष्टीत – ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज.
न्यायालंकारमंडीत – कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज.
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत – सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज.
राजनितीधुरंधर – आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज.
प्रौढप्रतापपुरंदर – मोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज.
क्षत्रियकुलावतंस – क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज.
सिंहासनाधिश्वर – जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज.
महाराजाधिराज – विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.
राजाशिवछत्रपती – ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.

‘२४ ऑक्टोबर’ हा दिवस ‘मराठा आरमार दिन’

 

भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. शिवरायांच्या पूर्वीही हजारो वर्षांपासून आपल्याकडे आरमार होते. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे भारतात आरमाराचा वापर पूर्णपणे बंद झाला. एवढेच काय तर समुद्र उल्लंघायला देखील बंदी करण्यात आली. याचा फायदा पोर्तुगीज-इंग्रज-डच-फ्रेंच-सिद्दी यांनी उठविला आणि आपल्याला अनेक वर्षे गुलामगिरीत काढावी लागली. त्यावेळचे बलाढ्य सम्राट मोगल-आदिलशाह-निजामशहा-कुतुबशाह इ. यांनीदेखील प्रबळ असे लढाऊ आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही.

मात्र शिवाजी महाराजांनी कोकणाचा मुलुख ताब्यात आल्यानंतर तेथील समुद्र पाहून, सिद्दी व युरोपियनांच्या उचापती पाहून लढाऊ आरमार उभे केले. एवढेच नाही तर अत्यंत कमी कालावधीत उत्तमोत्तम सागरी किल्ले बांधले.धार्मिक चालीरीती झुगारून देऊन आपल्या मावळ्यांना बलाढ्य युरोपियनांविरुद्ध लढण्याची नवी प्रेरणा दिली. आणि… आणि मग पुढच्या पिढीने आपल्या समुद्रावरील युरोपियनांची सत्ता खिळखिळी करून टाकली.पोर्तुगीज तर स्वतःला हिंदी महासागराचे मालकच समजत. समुद्रामध्ये बाहेर पडणाऱ्या कोणत्याही जहाजांना मग ते बलाढ्य मोगलांचे असले तरी त्यांना पोर्तुगीजांकडून कार्ताझ (परवाने) विकत घ्यावे लागत. मोगलांची हि स्थिती तर आपली काय ? त्यावेळच्या सागरी किनारपट्टीवरील बलाढ्य शाह्यांपुढे मराठयांची नव्याने उदयास आलेली सत्ता अगदीच छोटी होती. मात्र शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी आरमाराची गरज ओळखली.

शिवरायांच्या आरमारासंबंधी एक कवी म्हणतो-

देशी भार्गव क्षेत्र सागर तिरी नाना स्थळे योजिनी
बंदी दुर्ग अनेक डोंगर शिरी बेटे बाले पाहुनी
जहाजे आरमार भर जलधि दुष्टांसी शिक्षा करी
बारा मावळ देश पर्वत दरी बांधोनि किल्ले गिरी

हा झाला आपला इतिहास, मात्र आपण तो कदापी विसरता कामा नये.

शिवाजी महाराजांनी इ.स. १६५६ मध्ये जावळी काबीज केली. जावळीमध्ये कोकणाचा बराचसा भाग येत असल्याने राजांचा कोकणात प्रवेश झाला. ४ नोव्हेंबर १६५६ पूर्वी मराठ्यांच्या सिद्दीशी अनेक झटापटी झाल्या. ऑक्टोबर १६५७ ते जानेवारी १६५८ या कालावधीत शिवरायांनी १०० किमी. लांबीचा समुद्रकिनारा व मुलुख मिळविला. मिळविलेल्या या नव्या मुलुखाच्या संरक्षणासाठी व सिद्दीच्या कुरापती थांबविण्यासाठी व त्याला समुद्रमार्गे मिळणारी रसद तोडण्यासाठी नाविक दल (लढाऊ आरमार) असणे गरजेचे होते. त्यासाठी योग्य अशी जागा / तळ असणे गरजेचे होते. *ऐन समुद्रामध्ये नौका बांधता येत नाहीत. लष्करीदृष्ट्या समुद्रामधून आत घुसलेली खाडी हि जहाजबांधणीसाठी उत्तम जागा असते.

आणि अखेर तो दिवस उजाडला….. दि. २४ ऑक्टोबर १६५७ रोजी ऐन दिवाळीत (धनत्रयोदशी) कल्याण, भिवंडी काबीज केली. आणि कल्याण, भिवंडी व पेण येथे मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती झाली. _यावर्षी या घटनेस ३५९ वर्षे पूर्ण झालेली आहेत._ हि आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

अशा शुभमुहूर्तावर शिवरायांनी आरमाराची उभारणी केली, म्हणून ‘२४ ऑक्टोबर’ हा दिवस ‘मराठा आरमार दिन’ किंवा ‘भारतीय आरमार दिन’.

महापराक्रमी संताजी घोरपडे – 7

औरंगजेबाला आपल्या २५ हजार फौजेचा झालेला सर्वनाश पाहवला नाही. अत्यंत दुखी कष्टी होत त्याने या खुदा- या खुदा ओरडत आणी संताजीला शिव्या देत छाती बडवत
औरंगजेब अन्न पाण्याविना बिछान्यावर आडवाच झाला.
औरंगाबादला आल्यावर खानजादखानाला औरंगजेबाने आपल्यासमोर येऊच दिले नाही.
औरंगजेबाला ह्याचा फार भरवसा होता म्हणून ह्याला कासिमखानाच्या मदतीस पाठविला होता.
रागाच्या भरात औरंगजेबाने ह्या खानजादखानाची भेट न घेताच बाहेरच्या बाहेर दूर बिदरच्या सुभ्यावर त्याला हाकलून दिले.
आपल्याकडे म्हणच आहे ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा.’ औरंगजेबाच्या भरवशाच्या म्हशीला टोणगाच झाला होता; खानजादखानाच्या रूपात.
आता आपण परत थोडे मागे येऊयात.
मागे बसवापट्टणला थांबलेला हिंमतखान हाच काय तो आता औरंगजेबासाठी तारणहार उरला होता.
मुघलांच्या २५ हजार फौजेचा इतका दारुण पराभव केल्यावर संताजी परत मागे बसवापट्टणला आला.
संताजीचा मागचा हिशोब बाकी होता. संताजी जसा बसवापट्टणला आला तसा हिंमतखान घाबरून जाऊन बसवापट्टणच्या गढीत जाऊन लपून बसला. २० जानेवारी १६९६ रोजी बसवापट्टण येथे संताजीने ह्या हिंमतखानाला गचांडी पकडून गढीतून बाहेर फरफटत ओढून काढले आणि त्याच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून त्यास ठार मारले.
चंदन वंदन जवळ झालेल्या लढाईत हमीदुद्दीनखानाने धनाजी जाधवांचा मुलगा मारला होता.
धनाजी जाधवांच्या मुलाच्या हत्येचा बदला संताजीने हिंमतखानाच्या हत्येने वसूल केला.
मरताना हिंमतखानाने औरंगजेबाच्या बोकांडी १८ लाख रुपये कर्ज करून ठेवलेले होते.
संताजी घोरपडेंच्या अतुलनीय पराक्रमापुढे औरंगजेब अक्षरशः थकून-वाकून गेला आणी त्याची दाढी आणी डोक्याचे उरले सुरले काळे केसही संताजीमुळे पांढरे झाले.
तर अशी हि महापराक्रमी संताजी घोरपडे यांची वीर गाथा.
लेख कसा वाटला?
जरूर कळवा. आणि हवा तेवढा शेअर करा.
अश्या वीरगाथा वाचण्यासाठी परिचयातील प्रत्येकाला महाराष्ट्रधर्मवर जॉईन करा.
लेख समाप्त.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

महापराक्रमी संताजी घोरपडे – 6

कासीमखान आणी खानजादखान ह्या बातमीने गोंधळले आणी घाई घाईने त्यांनी जवळच आपल्याच ताब्यात असलेल्या दोड्डेरीच्या किल्याकडे आसऱ्यासाठी धाव घेतली.
ह्यावेळी आता संध्याकाळ होऊन अंधार पडायला लागला होता.
ह्या दोड्डेरीच्या किल्यापुढे एक मोठा तलाव होता. तलाव आणी किल्ला ह्यांत साधारण एक कोसांचे अंतर होते. तिथे जाऊन पोहचेपर्यंत मुघलांना मराठ्यांशी लढत लढतच जावे लागले. हा किल्ला मुघलांकडेच होता.
पण भयास्तव मुघलांची किल्ल्यातील फौज ह्या कासीमखान आणी खानजादखान यांच्या फौजेला किल्ल्यात येऊ देईना. त्यांनी किल्याचे दरवाजे आतून लावून घेतले.
शेवटी निरुपायाने दमलेल्या मुघलांच्या फौजेने किल्यासमोरील तलावाच्या काठी आपला तळ दिला.
मुघलांनी जसा तळ दिला तसे मराठ्यांनी मुघलांना चहुंबाजूनी घेरले.
आता मराठ्यांची पहिली आणि दुसरी तुकडी ताजीतवानी होऊन तिसऱ्या तुकडीच्या मदतीसाठी परत मैदानात आली होती.
कासीमखान आणी खानजादखान यांच्याजवळ जे काही खाण्याचे सामान होते ते खाऊन त्यांनी आपली राहिलेली मेजवानी रडत कढत साजरी केली.
पण बाकीच्या सैन्याचे एव्हढे नशीब कुठे. ते बिचारे तलावाचे थंड पाणी पिऊन आपली भूक भागवीत होते.
दिवस संपून आता रात्र पडली होती. दिवसभराच्या लढाईच्या दगदगीने मुगलांचे सैन्य पार दमून गेले होते. त्यामुळे सहाजीकच दमलेल्या मुघलांचे डोळे अनावर झोपेमुळे आता मिटू लागले.
पण मराठे काही मुघलांना झोपू देईनात. मुघल डुलक्या मारायला लागले कि मराठे गुपचूप येऊन त्यांच्यावर हल्ले चढवत.
रात्रीच्या अंधारातच वैतागून परत मुघलांनी तलवारी हातात घेतल्या आणी मराठयांच्या पुढे लढायला उभे ठाकले.
पण मराठे लढेनातही. मराठे फक्त मुघलांच्या समोर येऊन परत मागे जात. जेवण नाही, झोप नाही, शिवाय पहाटेपासून सुरु झालेली लढाई घनघोर रात्र झाली तरी संपायचे नाव
घेईना.
मराठ्यांनी एक दोन नव्हे तर चक्क तीन दिवस आणी तीन रात्र मुघलांना घोड्यावर असेच बसवून ठेवले.
तिसरा दिवस जाऊन आता चौथा दिवस उजाडला आणी मुघलांच्या अशा पल्लवित झाल्या.
मागून दहा हजार फौज आपल्या मदतीस येत आहे असे मुघलांना कळाले. फौज मदतीला येत आहे हे पाहून मुघलांना मोठा हुरूप आला. आनंदाने ते नाचूच लागले.
पण ती फौज आपल्या नव्हे तर संताजीच्या मदतीस येत आहे हे जेंव्हा त्यांना कळाले तेंव्हा तर मुघलांनी आरडाओरडा करत छाती बडवत रडायलाच सुरवात केली.
ती दहा हजार फौज होती चित्रदूर्गच्या ब्रम्हप्पा नायकाची.
मुघलांचा कर्नाटकचा फौजदार असलेल्या ह्या कासिमखानाने पूर्वी ह्या ब्रम्हप्पा नायकाला अतिशय छळले होते. त्याचाच बदला म्हणून हा ब्रम्हप्पा नायक आपली १० हजार
फौज घेऊन मराठ्यांच्या मदतीला आला होता.
ब्रम्हप्पा नायकाने मात्र मराठ्यांच्या मदतीने कासिमखानावर चांगलाच सूड उगविला.
(म्हणून कोणालाही छळू नये. काळ कधी बदलेल ह्याचा नेम नाही. )
चौथ्या दिवशी जेंव्हा युद्धाला सुरवात झाली तेंव्हा मुघलांकडे दारूगोळाही शिल्लक राहिला नव्हता. लढाई न करताच भुकेने मुघल जमिनीवर कोसळत होते. मुगलांवर संताजीच्या फौजेकडून बंदुकीच्या गोळ्यांचा बेफान पाऊस पडत होता. मुघल सैन्य आक्रोश करीत सैरा-भैरा इकडे तिकडे जीव वाचवून पळत होते.
शेवटी कासीमखान आणी खानजादखान जीव वाचून काही सैन्यानिशी प्रयत्नाने दोड्डेरीच्या किल्यात शिरलेच.
पण तिथं तर फक्त एक दिवसाचेच धान्य शिल्लक होते. मग त्या दिवशी किल्यात सगळ्यांनी मिळून ज्वारी -बाजरीच्या भाकरी खाऊन दिवस ढकलला.
बाहेरून मराठ्यांनी आपला वेढा आता अधिक घट्ट आवळला.
उपासमारीने म्हणा किंवा अफूच्या अति सेवनाने म्हणा. पण बहुतेक मराठ्यांच्या भीतीने दोड्डेरीच्या किल्यात शिरल्यापासून तिसऱ्या दिवशी कासीमखान मृत्युमुखी पडला.
कासीमखान मेल्याने मुघलांचा धीरच खचला.
भुकेमुळे मुघल सैनिक किल्ल्यातील छपरांवरचे गवत खाऊ लागले.  शेवटी मराठ्यांनी किल्याच्या बुरूजालाच सुरुंग
लावला. बुरुज धडाधड कोसला आणी मग किल्ल्यातील खानजादखानाने संताजीपाशी तहाची याचना केली.
तहात ठरल्या प्रमाणे कासीमखानाची सर्व सम्पत्ती, हत्ती-घोडे, नगदी पैसे आणी सोने नाणे संताजीच्या हवाली करण्यात आले. शिवाय तीस लाख रुपये युद्धखर्च म्हणून संताजीने खानजादखानाकडून मान्य करून घेतले. ह्यासाठी संताजीने कासीमखानाचा विश्वासू कारभारी बालकिशन याचा मुलगा आपल्याकडे ओलीस ठेऊन घेतला.
दोड्डेरीची लढाई सुरु झाल्यापासून तेराव्या दिवशी संपली.  तेराव्या दिवशी मोगल किल्ल्यातून बाहेर पडले. संताजीने सर्व उपाशी मुघल सैनिकांना भाकरी आणी पाणी दिले.
संताजीने मुघलांना अभय दिले.
किल्ल्याबाहेर दोन दिवस मुक्काम करून आणी विश्रांती घेऊन मुघलांचे उरलेले सैन्य खानजादखानासह औरंगाबादकडे चालते झाले. वाटेत ह्या मुघलांवर परत मराठ्यांनी कोणी
हल्ला करू नये म्हणून संताजीने एक फौजेची तुकडी त्यांच्या बरोबर रवाना केली.

महापराक्रमी संताजी घोरपडे – 5

कासिमखान हा हि मूर्खच होता. आपल्या मदतीला आलेले औरंगजेबाचे दोन सरदार आणि पंचवीस हजार मुघल फौजेचा पाहुणचार आणि जंगी मेजवान्या करण्यासाठी कासिमखानाने
अधोणीच्या किल्ल्यातून मेजवानीसाठी बाहेर काढलेले कोरे करकरीत कर्नाटकी तंबू, सोन्याचांदीची भांडी, मेवा मिठाई, भांडी, दारू, बायका आणि खजिना दिमतीस आलेल्या
२५ हजार फौजेच्या पाहुणचारासाठी बाहेर काढला; आणि पेशखान्याबरोबर अधोणीच्या किल्ल्यापासून दोन कोस अंतरावर असलेल्या २५ हजार मुघल फौजेकडे पाठवून दिला.
अत्यंत गुप्तपणे संताजी ह्या कासिमखानापासून बरोबर सहा कोसांवर येऊन उभा राहिला.
संताजी कासिमखानावावर पाळत ठेऊनच होता.
पेशखाना रवाना झाल्याची खबर मिळताच संताजीने आपल्या फौजच्या तीन तुकड्या केल्या. पहिली तुकडी पेशखाना लुटण्यासाठी, दुसरी तुकडी चालून येणाऱ्या मुघलांचा
समाचार घेण्यासाठी आणि तिसरी तुकडी राखीव दिमतीस.
पहाटेच्या अंधारात अधोनीच्या किल्ल्यातून पेशखाना वाट चालत जसा निघाला आणि एक कोसावर येऊन ठेपला तसा मराठ्यांच्या पहिल्या तुकडीने त्यावर जोरदार हल्ला
चढविला.
जशी लढाईची धामधूम वाढायला लागली तशी पेशखान्याची सगळी मालमत्ता जागेवर सोडून मुघली फौज आपला जीव वाचवून पळू लागली.
पेशखान्याच्या मदतीला फौजदार कासिमखान किल्ल्यातून धावून आला आणि त्याच्या बरोबर मराठ्यांच्या पहिल्या तुकडीची जोरदार लढाई सुरु झाली.
कासिमखानाला लढाईत अडकवून ठेऊन मराठ्यांच्या पहिल्या तुकडीने पेशखाना लुटून साफसूफ केला. बायका सोडून. (पर स्त्रीला हात लावायचा नाही असा दंडकच होता मराठ्यांचा. )
हि लढाई इकडे पहाटेच्या अंधारात सुरु झालेली असतानाच तिकडे पहाटेच्या साखर झोपेत असलेल्या औरंगजेबाची खानजादखान, सफशिकन खान हि पाहुणे मंडळी उद्या
आपल्याला मिळणाऱ्या पाहुणचाराची गोड स्वप्ने रंगवीत होती.
पहाटेची स्वप्ने पूर्ण होतात म्हणे?
हो होतात ना.
कर्तृत्व गाजविणाऱ्यांची. झोपा काढणाऱ्यांची नाही.
मागे चाललेल्या ह्या लढाईची हि बातमी पुढे साखर झोपेत असलेल्या २५ हजार मुघली फौजेला कळाली आणि कानामागे अचानक बंदुकीचा बार वाजावा अशी कानठळीच त्यांना बसली.
डोळे चोळीत जो तो पडत-धडपडत तलवार शोधत, भाले शोधत, बंदुका शोधत लढाईच्या तयारीला लागला.
संताजी ह्याचीच वाट पहात होता.
मराठ्यांच्या पहिल्या तुकडीने मुघलांचा पेशखाना लुटून नेला आणि मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने आता कासिमखानाला आपल्याकडे ओढत त्याच्याशी लढायला सुरवात केली.
लढत लढत मराठ्यांची दुसरी २५ हजार मुघलांच्या फौजेच्या छावणीवर चालून गेली.
साखरझोपेत असेल्या मुघली फौजेवर असा काही मराठ्यांचा तडाखा पडला कि त्यात त्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. मराठ्यांनी मुघल छावणीतील सगळी मालमत्ता,
हत्यारे, सोने नाणे लुटून धुमाकूळ घालत छावणीला आग लावून दिली.
मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीच्या धुमश्चक्रीत कासीमखान आणी खानजादखान हे जीव खाऊन मराठ्यांशी लढत होते.
पहाटेच्या अंधारात हि घनघोर लढाई सुरु झाली होती. जस जसा दिवस उजाडत गेला तस तसे मराठ्यांनी दात ओठ खात मुघलांना बेक्कार ठोकून काढले. मुघलांकडील अनेक ठार
झाले, तसेच जखमीही खुप झाले.
दुपारच्या उन्हात मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने आता माघार घेतली आणि ताज्या दमाची मराठ्यांची तिसरी तुकडी आता मैदानात आली. लढाई ऐन निकाराला आलेली असताना
आपली छावणी गारद झाली, तिला मराठ्यांनी लुटून पेटवून दिले ही बातमी लढाई करणाऱ्या कासीमखान आणी खानजादखान यांना समजली.
संताजीने मुद्दामच ही बातमी त्यांना कशी लवकर पोहचेल ह्याची व्यवस्था केलेली होती.

महापराक्रमी संताजी घोरपडे – 4

हा हिंमतखान प्रामाणिक मूर्ख होता. त्याने मांडवगड, मलखेड, कालकुर्ती विक्रमहळ्ळी इत्यादी ठिकाणी संताजीचा पाठलाग करत करत छोट्या मोठ्या लढाया केल्या.
विक्रमहळ्ळीला तर त्याने संताजीची तीनशे माणसे ठार केली तसेच तीनशे घोडी आणि नगारे-निशाणे हस्तगत केली. ह्या लढाईत हिंमतखानाचीही बरीच माणसे मारली गेली.
औरंगजेबाने विक्रमहळ्ळीच्या लढाईच्या ह्या पराक्रमावर खुश होऊन हिंमतखानाचे ‘खाल्ल्या मिठास जागला, शाब्बास तुझी’ असे म्हणत कौतुक केले.
पाठलागावर पुढे जात ह्या हिंमतखानाने चितापूरजवळ असलेल्या अलूरच्या गढीत संताजीला कोंडले आणि गढीला वेढा दिला. इतकेच नव्हे तर हिंमतखानाने त्या
परिसरातील जमीनदारांकडून ‘आम्ही संताजीस पळून जाण्यास मदत करणार नाही’ असे मुचलके लिहून घेतले.
पण तरीही संताजी वेढा फोडून निसटलाच.
संताजीचा पाठलाग करत करत हिंमतखान ६ मार्च १६९४ रोजी थेट आंध्र प्रदेशातील कालकुर्ती भरम येथे पोहचला.  ह्यावेळी पाठलागावरच्या लढाया सारख्या चालूच होत्या.
संताजीने ह्या हिंमतखानाला असेच महिनाभर आपल्यामागे फिरवत फिरवत आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजे साताऱ्याजवळील महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याला आणले.
संताजी महादेवाच्या डोंगरात शिरला.
आता मात्र हिंमतखानाचा धीर सुटला. तिथून त्याने औरंगजेबाला पत्र पाठवून ‘आजून कुमक पाठवून द्यावी म्हणजे मी संताजीस पकडतो’ असे लिहिले.
पण औरंगजेबाने कुमक न पाठविता उलटे हिंमतखानास सांगितले कि “मराठ्यांची वाट आडवा. डोंगरातून मराठे बाहेर पडले कि त्यांचा मोड करा.”
औरंगजेबाच्या ह्या उत्तराने हिंमतखानासमोर काहीही पर्याय राहिला नाही.
महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याला बसून हिंमतखान संताजीला पकडण्यासाठी आपल्या कल्पनेचे घोडे दौडत होता. पण आता तर त्याचे कल्पनेचे घोडेही संताजीस गाठू शकत
नव्हते.
नोहेंबर १६९५ मध्ये संताजी रात्रीच्या अंधारात महादेवाच्या डोंगरातून निघून थेट कर्नाटकातच उतरला आणि तिथून तो जिंजीकडे जाऊ लागला.
हिंमतखानास जेव्हा हे कळले तेंव्हा त्याने संताजीचा परत पाठलाग सुरु केला. संताजी पुढे आणि हिंमतखान मागे हे चक्र परत सुरु झाले.
पाठलागाला कंटाळून दमून भागून हिंमतखान बसवापट्टणलाच थांबला. तो काही पुढे संताजीच्या पाठलागावर गेला नाही.
संताजीच्या पूर्वीच धनाजी जाधव हेही मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या वेल्लूरला औरंगजेबाच्या झुल्फीकारखानाने घातलेला वेढा मोडून काढण्यासाठी पुढे गेलेले होते.
आता मागून हा संताजी त्या धनाजीस जाऊन मिळणार ह्या बातमीने औरंगजेबाच्या पोटात धस्सच झाले.  “मराठ्यांचे हे दोन वाघ मिळून आता झुल्फीकारखानाला कच्चा खाणारा..” ह्या कल्पनेने औरंगजेबाची शरीरातील सगळी ताकदच निघून गेली.
हतवीर्य होऊन अवसान गिळत औरंगजेबाने “संताजीला काहीही करून जिंजीकडे जाऊ देऊ नका” म्हणून कर्नाटकाचा फौजदार कासिम खान ह्यास तातडीने लिहून पाठविले.
शिवाय ताबडतोब त्याने आपले दोन सरदार खानाजाद खान आणि सरदार सफशिकनखान ह्यांच्या दिमतीस पंचवीस हजार फौज आणि तोफखाना देऊन ताबडतोब कर्नाटकाचा फौजदार
कासिम खान ह्याच्या मदतीस पाठवून दिले.
औरंगजेबाचा कर्नाटकाचा फौजदार कासिमखान हा अधोणीच्या किल्यावर मुक्कामी येऊन थांबला. तिथं त्याला मागून आलेले औरंगजेबाचे सरदार खानाजाद खान आणि सफशिकनखान आपल्या पंचवीस हजार फौजेसहित येऊन मिळाले.
आता तो अधोनीला संताजीची वाट पाहत बसला.