५ नोव्हेंबर इ.स.१५५६ पानिपतची दुसरी लढाई

#आजचे_शिव_दिनविशेष
********************


पानिपतची दुसरी लढाई झाली स्थानिक भार्गवकुलीन सम्राट हेमू विक्रमादित्य विरुद्ध परकीय आक्रमक मोगलांचा १४ वर्षांचा वारसदार अकबर. या लढाईनंतरच मुघलांचा हिंदुस्तानात जम बसला. म्हणजे हिंदुस्तानी इतिहासाला वळण देणारी अशी ही महत्त्वाची लढाई होती.
मुळात जमीनदार, नंतर व्यापारी असलेला हेमू नक्कीच असामान्य निरीक्षणशक्ती घेऊन आला होता. हेमूला घोड्यांची आणि हत्तींची चांगली पारख होती. निरीक्षणशक्तीला बुद्धिमत्ता आणि कल्पकता यांची जोड देऊन हेमूने पारंपरिक मैदानी, गोलाच्या लढाईत नवनव्या व्यूहरचना, नवनव्या चाली रचल्या आणि तुटपुंज्या पण वेगवान आणि त्वेषाने लढणार्‍या सैन्यबळावर संख्येने मातब्बर असलेल्या प्रबळ सैन्याविरुद्ध लढाया जिंकल्या. पराभूत सैनिकांचे शिरकाण,मारलेल्या सैनिकांच्या मुंडक्यांचा मनोरा रचून विजयाचा जल्लोष,भाल्याच्या टोकावर मुंडकी खोचून घोड्यावरून दौडत जाणे,पराभूत सेनापतींची मुंडकी तबकातून बादशहाला नजर करणे अशा या मुघलांच्या क्रौर्याचा त्यांच्या सर्व शत्रूंनी धसका घेतला होता. आपल्याकडे क्रूर समजल्या गेलेल्या अफगाणांनी देखील. परंतु हुमायूं आणि अकबर यांच्या या क्रूर सैन्याविरुद्ध तोपर्यंत २२ लढाया हेमूने एकदाही पराभूत न होता जिंकल्या होत्या. बहुतेक वेळा तुटपुंज्या सैन्यबळावर.
६ ऑक्टोबर १५५६ रोजी मुघल सरदार तर्दी बेगचा हेमूने इतका जबरदस्त पराभव केला होता की तर्दी बेग रणांगणातून पळुन थेट काबूलच्या वाटेला लागला होता. व्यसनी,मानसिक रुग्ण असलेल्या आदिलशहा सुरीला फ़ाट्यावर मारुन हेमूने स्वत: हिंदुस्तानचा सम्राट होण्याचे ठरवले व ७ ऑक्टोबर १५५६ रोजी दिल्लीतील प्रसिद्ध पुराना किला येथे हेमूचा हिंदू पद्धतीने दिल्लीची जनता व अफ़गाण व हिंदू सैन्यासमोर राज्याभिषेक झाला.त्याने “सम्राट हेम चंद विक्रमादित्य” असे नाव धारण केले तसेच स्वत:च्या प्रतिमेच्या नाण्यांचे चलनही प्रस्थापित केले.
हेमूच्या बंगालपासून दिल्लीच्या धडकेनंतर व दिल्लीच्या कब्ज्यानंतर मोगल सैन्यात जरब बसली व बर्‍याच मोगल सरदारांनी गाशा गुंडाळुन काबूल येथे राजधानी स्थापून राज्य करावे असे मत व्यक्त केले परंतू बेहरामखान याने हेमूशी युद्धाचा आग्रह धरला. दिल्ली हातची गमावल्यावर १४ वर्षांचा सुल्तान जलालुद्दिनला हेमुच्या भीतीने सुरक्षित ठिकाणी नेले होते. दिल्लीकडे मोगल सैन्याने कूच केल्याची बातमी ऎकून हेमूही सैन्य घेऊन मोगलांचा पाडाव करण्यासाठी निघाला व ५ नोव्हेंबर १५५६ रोजी दोन्ही सैन्याची पानिपत येथे गाठ पडली.
बेहरामखान याने सैन्यास लढाईस प्रेरणा दिली व स्वत: मैदानापासून दूर राहीला. काही इतिहासकारांच्या मतानुसार, हेमूबद्दल प्रचंड भय आणि सुरक्षेच्या कारणास्तव जलालुद्दिन आणि त्याचा रक्षणकर्ता बेहरामखान याने युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला नव्हता. प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ते ८ मैल अंतरावर उभे होते. जलालुद्दिनबरोबर ५००० अतिविश्वासू आणि तयारीचे सैन्य होते, युद्धात पराभव होत असल्याचे दिसून येताच काबुलकडे पळून जावे असा बेहरामखानचा सैन्याला आदेश होता. हेमू स्वत: हत्तीच्या पाठीवरुन सैन्याचे नेतृत्व करत होता. पानिपतच्या या लढाईत हेमूच्या रणनीतीची आखणी नेहमीप्रमाणे होती. हेमूच्या मुख्य सैन्यातल्या हत्तींना तोंड देण्यसाठी शत्रूने आपले गजदळ आणि गजदळाचे संरक्षक धनुर्धर पुढे आणून ठेवले. तरी हेमूच्या सैन्याने प्रखर शौर्याच्या जोरावर शत्रूला मागे रेटले. बाजूने आणि पिछाडीवरून केलेल्या घोडदळाच्या हल्ल्यामुळे शत्रूसैन्याचा व्यूह पुरता विस्कळित झाला. पराभव डोळ्यासमोर आल्यामुळे शत्रुसैन्यात पळापळ सुरू झाली. हेमूचा विजय नजरेच्या टप्प्यात आला.तेवढ्यात शत्रूसैन्य पळत असतांना अचानक एक बाण हेमूच्या डोळ्यात लागला आणि आणखी एका बाणाने निशाण पडले. सैन्याच्या हालचाली नियंत्रित करणारा हेमू बेशुद्ध. आपण जखमी झालो तर सेनापतीपदाचे नेतृत्त्व कुणी करायचे याच्या सूचनाच अस्तित्त्वात नव्हत्या. रणनीतीतली ही फारच मोठी त्रुटी म्हणावी लागेल. हेमू जखमी झाल्याची खबर सैन्यात पसरली व सैन्याचे अवसान गिळाले, गोंधळात सैन्य सैरावैरा पळत सुटले आणि विजयाच्या उंबरठ्यावरून हेमूच्या सैन्याचा पराजय झाला. हेमूच्या हत्तीला बेहरामखानाच्या एका सरदाराने हत्तीवरूनच वेढा घालून वळवून जलालुद्दिनच्या शिबिरात नेले. तिथे जलालुद्दिनला गाझी सिद्ध करण्यासाठी हेमूचे मुंडके छाटले गेले,हेमूचा शिरच्छेद केला गेला. हेमूचे मुंडके हे काबूल मध्ये तर धड दिल्लीला पाठवून टांगण्यात आले. या लढाईत भाग घेतलेल्या हेमूचे सर्व पुतणे हेमूने दत्तक घेतलेल्या पुतण्यासह मारले गेले. लढाईत भाग न घेतलेला एकच पुतण्या गावात होता तेवढाच वाचला. त्याचे वंशज आजही आहेत. जलालुद्दिन दिल्लीच्या तख्तावर बसला व नंतर त्याने ‘अकबर’ हे नाव धारण केले.अकबराने हेमूचा इतका धसका घेतला होता की लढाईनंतर कित्येक महिने भार्गव आडनावाच्या प्रत्येक माणसाला अकबराच्या हेरांनी कापून काढले. भार्गव आडनावाचे लोक मग आडनाव बदलून राहू लागले. आपले देशी इतिहासकार, आपले स्वतःला विद्वान म्हणून समाजात मिरवणारे शालेय पाठ्यपुस्तकलेखककार देखील अकबराचे गोडवे गातात आणि सम्राट हेमू विक्रमादित्याचा साधा उल्लेखदेखील करीत नाहीत याची खंत वाटते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
५ नोव्हेंबर इ.स.१६६४
छत्रपती शिवरायांनी खवासखानाचा पराभव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
५ नोव्हेंबर इ.स.१८१७
इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात खडकी येथे लढाई
खडकी येथे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे
इंग्रजांसोबत भयानक युद्ध झाले. १२ दिवस राघोजी (लहुजीचे वडील) सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी
साळवेंनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन
इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या
स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या
समोर शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. १७
नोव्हेंबर १८१७ रोजी पुणे ब्रिटीशांच्या तावडीत गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻

शिवाजी महाराज्यांची पहिली स्वारी

1646  साली वयाच्या 16 व्या वर्षी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणा किल्ला जिंकला, तोरणा किल्यावर 7 रांजण सुवर्ण मोहरा सापडल्या. त्याच वर्षी कोंडाणा(सिंहगड) व पुरंदर किल्ले जिंकून पुणे प्रांतावर नियंत्रण मिळविले. यावेळी पहिल्या स्वारीत राज्यांबरोबर फक्त 300 मावळे होते.

रायगड

राज्यभिषेक दिन 6 जून.
महाराज्यांच्या काळात रायगडावरील लोकसंख्या कमीतकमी 10000 असे.
65 किल्ल्यांच्या गराड्यात रायगड किल्ला.
2000 फुटावर पहिली तटबंदी
4000 फुटावर दुसरी तटबंदी
किल्याची वाट एकदम छोटी.
किल्यावर 300 इमारती होत्या.
10000 लोकांना वर्षभर पाणी मिळावे यासाठी 9 टाके.
रायगडाला 3 बाजूला तटबंदी नव्हती फक्त पश्चिम बाजूला तटबंदी आहे.
किल्याचे एकूण क्षेत्र 1200 एकर.
रायगडावर 42 दुकाने होती. पैकी 21 दुकाने देशी माल विक्री व 21 दुकाने परदेशी माल विक्रीसाठी

समरभूमी उंबर खिंड : एक गनिमी कावा 

 
२ फेब्रुवारी १६६१
उंबर खिंड लढाई शिवाजी महाराजांना पुण्याच्या मुघली छावणीतील एक महत्वाची खबर मिळाली की, सरदार कारतलब खान मोठ्या फौजेनिशी नागोठणे, चौल, पेण वगैरे कोकणी ठाणी काबीज करण्यासाठी शाईस्तेखानाच्या हुकुमावरून निघत आहे. कारतलब खान उंबरखिंडीने नागोठण्याला उतरणार होता. खानाबरोबर माहूरची प्रख्यात देशमुखीण सावित्रीबाई उदाराम उर्फ पंडिता रायबागन ही शूर स्त्री देखील होती. उंबर खिंड पुण्याच्या वायव्य सरहद्दीवर येते. महाराज आधिच उंबर खिंडीत जावून खिंड अडवून उभे रहिले ! खान आला. पण त्याच्या फौजेला खिंडीच्याजवळ लौकर जाताच येईना. मार्गावर भयंकर आरण्य होते. मराठी फौजेसह शिवाजी राजे खिंडीतच उभे आहेत, याची खानाला कल्पनाच नव्हती ! महाराजांनी वकील पाठवून खानाला ‘सुखरूप सुटायचे असेल, तर आलात तसे परत जा -‘ असा निरोप पाठविला. खानाने तो धुडकावला. मग महाराजांनी आपल्या फौजेला हल्ला चढविण्याचा हुकूम दिला. मुघलांची भयंकर लंगडतोड सुरू झाली. त्यांना त्या घोर अरण्यात लढताही येईना ! पळताही येईना ! या अरण्याचे नाव आहे ‘तुंगारण्य’. अखेर खानाने रायबागनचा शरण जाण्याचा सल्ला ऐकला. खानाने आपला वकील पाठवला. महाराजांकडे वकिल आला. महाराज पांढर्‍या शुभ्र घोड्यावर बसले होते. त्यांच्या अंगावर चिलखत व पोलादी शिरस्त्राण होते. वकिला मार्फत खानाने बिनशर्त शरणागती पत्करली ! खानाचा प्रचंड पराभव झाला ! तो ज्या दिवशी झाला त्या दिवशी तारीख होती – २ फेब्रुवारी १६६१.
प्रचंड दौलत व सैन्य वाया घालवून कारतलब खान पुण्यास परतला. आता त्याला शाईस्तेखानाकडे वर मान करून बघायचिही हिंमत उरली नव्हती. कसाबसा जीव व आब्रू वाचवून तो पुण्यात परतला.

छत्रपती शिवरायांची गारद आणि तिच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ

गडपती – गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असे महाराज.
गजअश्वपती – ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं. म्हणुन गजअश्वपती हा शब्द आपण वैभवसंपन्नतेचे प्रतीक होता असे म्हणता येईल.) भूपती प्रजापती – वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज.
सुवर्णरत्नश्रीपती – राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवरायांच्या बाबतीत ३२ मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती.) अष्टावधानजागृत – आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.
अष्टप्रधानवेष्टीत – ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज.
न्यायालंकारमंडीत – कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज.
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत – सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज.
राजनितीधुरंधर – आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज.
प्रौढप्रतापपुरंदर – मोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज.
क्षत्रियकुलावतंस – क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज.
सिंहासनाधिश्वर – जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज.
महाराजाधिराज – विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.
राजाशिवछत्रपती – ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.