मराठा साम्राज्य : भाग 5 – भोसले कुळ

मालोजी भोसले
पूर्ण नाव मालोजी बाबाजीराजे भोसले

वडील बाबाजीराजे भोसले
पत्नी उमाबाई
संतती मालोजीराजे भोसले,
व्यंकोजीराजे भोसले
राजघराणे भोसले
चलन होन

बालपण
मालोजीरावांचे लग्न

मालोजी यांचे लग्न फ़लटणचे देशमुख जगपालराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई हिच्याशी झाले होते. त्यांना लवकर संतान होईना म्हणून मालोजी व दिपाबाई यांना वाईट वाटत होते. त्यांनी नगरचा पीरशहा शरीफ़ यांस नवस केला. त्याच्या अनुग्रहाने दिपाबाईला १५९४ व १५९७ ला दोन मुले झाली. त्यांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवण्यात आली. पुढे शहाजीना संभाजी, शिवाजी व व्यंकोजी ही ३ मुले झाली.
कारकीर्द

बाबाजीराव भोसले यांचे चिरंजीव मालोजीराजे भोसले हे पराक्रमी, युद्धप्रसंगी दाखवायची बुद्धिमत्ता असलेले व उत्तम प्रशासक होते. भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजी यांनी घातला.वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून मालोजीची पत्नी उमाबाई हिच्या हस्ते पिंडीला अभिषेक करण्यात आला. मंदिराच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पहावयास मिळतो. मालोजीनी साताऱ्यातील श्रीशिखरशिंगणापूरच्या डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधून तलाव तयार केला आणि यात्रेकरूंचा दुवा मिळवला. निजामशाहीने ऒरंगाबादेत ’मालपुरा’ व ’विठापुरा’अशा दोन पेठा भोसले घराण्याच्या नावे वसवल्या. मालोजीचा पराक्रम वाढतच गेला. आपल्या कामगिरीने मालोजीनी बुऱ्हाणपूरच्या निजामाचा विश्वास संपादन केला.त्यामुळे सरहद्दीवरील इंदापूरच्या बाजूच्या शत्रूचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवली. या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवून मालोजी रणक्षेत्रावर मरण पावले. भोसले घराण्यातील वीराच्या पराक्रमाचे ’पहिले स्मारक’ मालोजीच्या छत्रीच्या रूपाने इंदापूरला बांधले गेले.

शहाजीचे लग्न

मालोजीचा मुलगा शहाजी व लखुजी जाधवाची मुलगी जिजाऊ हे लहानपणी एकत्र खेळत असत. पण घरातील विरोधामुळे लखुजींनी संबंध नाकारले. मालोजीला कमी लेखले गेले. मालोजी पुन्हा वेरूळला आले. तिथे त्यांना देवीचा दृष्टांत होऊन द्रव्याने भरलेला हंडा सापडला. त्यातून मालोजीनी हजारो घोडे घेतले व आपली फौज तयार ते करून सरदार बनले. निजामशाहीवर मोगलाचे संकट आल्याने मालोजी भोसले निजामशाहीत कर्तबगार सरदार बनले, व लखुजी जाधवाने आपली मुलगी शहाजींना देऊन सोयरीक जमवली.

भोसले यांची वंशावळ

१. सजनसिंघ २. दिलीपसिंघ ३. सिंघजी ४. ‘भोसाजी’ ५. देवराज ६. इंद्रसेन ७. शुभकृष्ण ८. रूपसिंघ ९. भूमींद्र १०. धापजी ११. बरहटजी १२. खेलोजी १३. कर्णसिंघ १४. संभाजीराजे १५. बाबाजीराजे १६. मालोजीराजे १७. शहाजीराजे १८. शिवाजीराजे १९. संभाजीराजे २० शाहूराजे.