मराठा साम्राज्य : भाग ६ – फलटण संस्थान

फलटण संस्थान- मुंबई, सातारा जिल्ह्यांतील एक जहागीर. येथील जाहागीरदाराचें आडनांव निंबाळकर. मुख्य गांव फलटण. जहागिरीच्या उत्तरेस नीरा; पूर्वेस सोलापूर जिल्हा; दक्षिणेस माण, व खटाव तालुके; पश्चिमेस वाई व कोरेगांव हे तालुके. एकदंर गांवे ७२ आहेत क्षेत्रफळ ३९७ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) ५५९६६. उत्पन्न २ लाख रु. इंग्रज सरकारास ९६०० रु. खंडणी जाते. जहगिरीतींल उत्तरेचा नीराथडीचा प्रांत सुपीक व दक्षिणेचा डोंगराळ आहे. पाऊस फार कमी पडतो. हवा उष्ण आहे. ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा ही मुख्य पिंके होत. नीरा व बाणगंगा या मोठ्या नद्या.

इतिहास- महाराष्ट्रांतील राजघराण्यांत फलटणच्या निंबाळकराचें घराणे फार जुनें असून सुमारे सहा सातशें वर्षें तें राज्योपभोग घेत आहे. धारच्या परमार रांजावर दिल्लीच्या सुलतानांनीं पुन्हां पुन्हां हल्ले केले, त्या धामधुमींत निंबराज परमार नांवाचा एक पुरुष दक्षिणेंत फलटणनजीक शंभुमहादेवाच्या रानांत सन १२४४ च्या सुमारास येऊन राहिला. निंबराज ज्या गावीं राहिला त्यास निंबळक आणि त्यावरून त्याच्या वंशास निंबाळकर अशें नाव पडले. निंबराजाच्या वंशजांनी पुढे फलटण हें गाव वसविलें आणि तेथें ते वतन संपादून राहूं लागले. महंमद तुघ्लखाच्या वेळेस ह्यांस ‘नाईक’ हा किताब व फलटणची देशमुखी मिळाली. पुढें आदिलशाहींत निंबाळकराचें महत्त्व विशेष वाढलें. निंबराजापासून चवदावा पुरुष वणंगपाळ उर्फ जगपाळराव म्हणून झाला, त्याच्या पूर्वीची माहिती उपलब्ध नाहीं.

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

मराठा साम्राज्य : भाग 5 – भोसले कुळ

मालोजी भोसले
पूर्ण नाव मालोजी बाबाजीराजे भोसले

वडील बाबाजीराजे भोसले
पत्नी उमाबाई
संतती मालोजीराजे भोसले,
व्यंकोजीराजे भोसले
राजघराणे भोसले
चलन होन

बालपण
मालोजीरावांचे लग्न

मालोजी यांचे लग्न फ़लटणचे देशमुख जगपालराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई हिच्याशी झाले होते. त्यांना लवकर संतान होईना म्हणून मालोजी व दिपाबाई यांना वाईट वाटत होते. त्यांनी नगरचा पीरशहा शरीफ़ यांस नवस केला. त्याच्या अनुग्रहाने दिपाबाईला १५९४ व १५९७ ला दोन मुले झाली. त्यांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवण्यात आली. पुढे शहाजीना संभाजी, शिवाजी व व्यंकोजी ही ३ मुले झाली.
कारकीर्द

बाबाजीराव भोसले यांचे चिरंजीव मालोजीराजे भोसले हे पराक्रमी, युद्धप्रसंगी दाखवायची बुद्धिमत्ता असलेले व उत्तम प्रशासक होते. भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजी यांनी घातला.वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून मालोजीची पत्नी उमाबाई हिच्या हस्ते पिंडीला अभिषेक करण्यात आला. मंदिराच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पहावयास मिळतो. मालोजीनी साताऱ्यातील श्रीशिखरशिंगणापूरच्या डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधून तलाव तयार केला आणि यात्रेकरूंचा दुवा मिळवला. निजामशाहीने ऒरंगाबादेत ’मालपुरा’ व ’विठापुरा’अशा दोन पेठा भोसले घराण्याच्या नावे वसवल्या. मालोजीचा पराक्रम वाढतच गेला. आपल्या कामगिरीने मालोजीनी बुऱ्हाणपूरच्या निजामाचा विश्वास संपादन केला.त्यामुळे सरहद्दीवरील इंदापूरच्या बाजूच्या शत्रूचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवली. या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवून मालोजी रणक्षेत्रावर मरण पावले. भोसले घराण्यातील वीराच्या पराक्रमाचे ’पहिले स्मारक’ मालोजीच्या छत्रीच्या रूपाने इंदापूरला बांधले गेले.

शहाजीचे लग्न

मालोजीचा मुलगा शहाजी व लखुजी जाधवाची मुलगी जिजाऊ हे लहानपणी एकत्र खेळत असत. पण घरातील विरोधामुळे लखुजींनी संबंध नाकारले. मालोजीला कमी लेखले गेले. मालोजी पुन्हा वेरूळला आले. तिथे त्यांना देवीचा दृष्टांत होऊन द्रव्याने भरलेला हंडा सापडला. त्यातून मालोजीनी हजारो घोडे घेतले व आपली फौज तयार ते करून सरदार बनले. निजामशाहीवर मोगलाचे संकट आल्याने मालोजी भोसले निजामशाहीत कर्तबगार सरदार बनले, व लखुजी जाधवाने आपली मुलगी शहाजींना देऊन सोयरीक जमवली.

भोसले यांची वंशावळ

१. सजनसिंघ २. दिलीपसिंघ ३. सिंघजी ४. ‘भोसाजी’ ५. देवराज ६. इंद्रसेन ७. शुभकृष्ण ८. रूपसिंघ ९. भूमींद्र १०. धापजी ११. बरहटजी १२. खेलोजी १३. कर्णसिंघ १४. संभाजीराजे १५. बाबाजीराजे १६. मालोजीराजे १७. शहाजीराजे १८. शिवाजीराजे १९. संभाजीराजे २० शाहूराजे.

मराठा साम्राज्य : भाग 4 – भोसले कुळ

खेलकर्णजी माहाराज आणि मालकर्णजी माहाराज
शेडगावकरांच्या बखरीत सुरुवातीलाच, “ सिसोदे महाराणा याची वौशावळ मारवाडदेशाचे ठाई उदेपुरानजिक चितोडे शहर आहे तेथे एकलिंग माहाराज शंभू माहादेव वश्री जगदंबा देवी आहे तेच कुळस्वामी तेथील संवस्थानी सिसोदे माहाराणेआहेत. त्यांतिल एक पुरुष सजणसिव्हजी माहाराणे याजपासून संततीचा विस्तार: ” असे म्हणून त्यातील एकेक करून चौदा पुरुषांचे फक्त नाव नमुद केलेले आहे.त्यावरून कोण नेमका कोणाचा पुत्र अथवा कोणाचा भाऊ हे समजून येत नाही. तीसर्व नावे पुढीलप्रमाणे-

१. सजणसिव्हजी माहाराणा
२. दिलिपसिव्हजी माहाराणा
३. सिव्हाजी माहाराणा
४. भोसाजी माहाराणा
५. देवराजजी माहाराज
६. इंद्रसेनजी माहाराज
७. शुभकृष्णजी माहाराज
८. स्वरूपसिव्हजी माहाराज
९. भुमिंद्रजी माहाराज
१०. यादजी माहाराज
११. धापजी माहाराज
१२. बर्हाटजी माहाराज
१३. खेलकर्णजी माहाराज
१४. मालकर्णजी माहाराज.
इथे बखरीत असं नमुद केलं आहे की, चितोडगडाच्या जवळच भोशी किल्ला आहे, त्याकिल्ल्याच्या जवळच असणार्या भोसावत या गावी रहायला आल्यापासून याराजवंशाचे शिसोदे हे आडनाव मागे राहून ‘भोसले’ असं झालं. तर्क असा आहे, कीअल्लाउद्दीन खलजीने चितोडगडावर आक्रमण केल्यानंतर चितोडचा महाराणालक्ष्मणसिंह शिसोदिया हा आपल्या सात मुलांसह लढता लढता मारला गेला, आणित्याच्या आठव्या पुत्राला, अजयसिंहाला राजपुतांनी खलजीपासून वाचवूनसुरक्षित ठिकाणी लपवून ठेवले. कदाचित अजयसिंहांचेच हे पुढचे वंशज खलजीपासूनबचाव करण्यासाठी, आपला शिसोदिया म्हणून निर्वंश होवू नये म्हणून ‘भोसावत’ या नावाने राहू लागले असावेत. पण या गोष्टीला हवा तसा पुरावा आजुन सापडलेला नाही.

या शिसोदिया कुळातल्या राजांच्या दक्षिणेतल्या प्रवेशाबद्दलशेडगावकरांचा बखरकार म्हणतो, “ येकंदर पुरुष चौदा त्यांपैकी खेलकर्णजीमाहाराज व मालकर्णजी माहाराज असे दोघे बंधू हे दक्षणदेशी आलें ते आमेदशापातशहा दौलताबादकर ( दौलताबादचा अहमदशहा निजामशहा) यास येऊन भेटले. त्यानीत्यांचा मोठा सन्मान करून नंतर दर असामीस प्रथक प्रथक (?) पंधरा पंधराशेस्वारांच्या सरदार्या मणसब देऊन हे (भोसले बंधू) पातशाही उमराव म्हणवीतहोते. त्या उभयता बंधूंच्या नावे सरंजाम चाकरीबद्दल चाकण चौर्यासी (चाकणआणि भवतालची चौर्यांशी खेडी) परगणा व पुरंधेरचे खाली परगणा व सुपे माहालअसे तीन माहाल तैनातीबद्दल त्याजकडे लाऊन दिल्हे त्याप्रमाणे ते उभयेताबंधू चाकरी करीत होते”

‘२४ ऑक्टोबर’ हा दिवस ‘मराठा आरमार दिन’

 

भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. शिवरायांच्या पूर्वीही हजारो वर्षांपासून आपल्याकडे आरमार होते. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे भारतात आरमाराचा वापर पूर्णपणे बंद झाला. एवढेच काय तर समुद्र उल्लंघायला देखील बंदी करण्यात आली. याचा फायदा पोर्तुगीज-इंग्रज-डच-फ्रेंच-सिद्दी यांनी उठविला आणि आपल्याला अनेक वर्षे गुलामगिरीत काढावी लागली. त्यावेळचे बलाढ्य सम्राट मोगल-आदिलशाह-निजामशहा-कुतुबशाह इ. यांनीदेखील प्रबळ असे लढाऊ आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही.

मात्र शिवाजी महाराजांनी कोकणाचा मुलुख ताब्यात आल्यानंतर तेथील समुद्र पाहून, सिद्दी व युरोपियनांच्या उचापती पाहून लढाऊ आरमार उभे केले. एवढेच नाही तर अत्यंत कमी कालावधीत उत्तमोत्तम सागरी किल्ले बांधले.धार्मिक चालीरीती झुगारून देऊन आपल्या मावळ्यांना बलाढ्य युरोपियनांविरुद्ध लढण्याची नवी प्रेरणा दिली. आणि… आणि मग पुढच्या पिढीने आपल्या समुद्रावरील युरोपियनांची सत्ता खिळखिळी करून टाकली.पोर्तुगीज तर स्वतःला हिंदी महासागराचे मालकच समजत. समुद्रामध्ये बाहेर पडणाऱ्या कोणत्याही जहाजांना मग ते बलाढ्य मोगलांचे असले तरी त्यांना पोर्तुगीजांकडून कार्ताझ (परवाने) विकत घ्यावे लागत. मोगलांची हि स्थिती तर आपली काय ? त्यावेळच्या सागरी किनारपट्टीवरील बलाढ्य शाह्यांपुढे मराठयांची नव्याने उदयास आलेली सत्ता अगदीच छोटी होती. मात्र शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी आरमाराची गरज ओळखली.

शिवरायांच्या आरमारासंबंधी एक कवी म्हणतो-

देशी भार्गव क्षेत्र सागर तिरी नाना स्थळे योजिनी
बंदी दुर्ग अनेक डोंगर शिरी बेटे बाले पाहुनी
जहाजे आरमार भर जलधि दुष्टांसी शिक्षा करी
बारा मावळ देश पर्वत दरी बांधोनि किल्ले गिरी

हा झाला आपला इतिहास, मात्र आपण तो कदापी विसरता कामा नये.

शिवाजी महाराजांनी इ.स. १६५६ मध्ये जावळी काबीज केली. जावळीमध्ये कोकणाचा बराचसा भाग येत असल्याने राजांचा कोकणात प्रवेश झाला. ४ नोव्हेंबर १६५६ पूर्वी मराठ्यांच्या सिद्दीशी अनेक झटापटी झाल्या. ऑक्टोबर १६५७ ते जानेवारी १६५८ या कालावधीत शिवरायांनी १०० किमी. लांबीचा समुद्रकिनारा व मुलुख मिळविला. मिळविलेल्या या नव्या मुलुखाच्या संरक्षणासाठी व सिद्दीच्या कुरापती थांबविण्यासाठी व त्याला समुद्रमार्गे मिळणारी रसद तोडण्यासाठी नाविक दल (लढाऊ आरमार) असणे गरजेचे होते. त्यासाठी योग्य अशी जागा / तळ असणे गरजेचे होते. *ऐन समुद्रामध्ये नौका बांधता येत नाहीत. लष्करीदृष्ट्या समुद्रामधून आत घुसलेली खाडी हि जहाजबांधणीसाठी उत्तम जागा असते.

आणि अखेर तो दिवस उजाडला….. दि. २४ ऑक्टोबर १६५७ रोजी ऐन दिवाळीत (धनत्रयोदशी) कल्याण, भिवंडी काबीज केली. आणि कल्याण, भिवंडी व पेण येथे मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती झाली. _यावर्षी या घटनेस ३५९ वर्षे पूर्ण झालेली आहेत._ हि आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

अशा शुभमुहूर्तावर शिवरायांनी आरमाराची उभारणी केली, म्हणून ‘२४ ऑक्टोबर’ हा दिवस ‘मराठा आरमार दिन’ किंवा ‘भारतीय आरमार दिन’.

मराठा साम्राज्य : भाग 2 – भोसले कुळ


खेलकर्णजी माहाराज आणि मालकर्णजी माहाराज
बखरकार म्हणतो, की या उभयतां भावांना खेलकर्ण आणि मालकर्ण ऐवजी खेलोजी आणिमालोजी अशी नावे पडली. याचे कारण बखरकार लढाईच्या निमित्ताने देत असला तरीयाचे मूळ कारण असे असावे- सुलतानी अंमलात, मुसलमान लोक हे एखाद्याहिंदूला, जरी तो बडा सरदार अथवा सेनापती असला तरीही काफर म्हणून तुच्छतेनेचसंबोधत असत. यासाठी पुढील व्यक्तिंची उदाहरणे पाहू. महाराजांच्या पंताजीगोपिनाथ बोकील या वकीलाला अफजलखान ‘पंतू’ म्हणायचा. औरंगजेब नेतोजीपालकराला ‘नेतू’, खुद्द शिवाजी महाराजांना ‘सिवा’ आणि संभाजी महाराजांना ‘संभा’ म्हणायचा हे अस्सल पत्रांतू दिसून येतं. त्यामूळेच इथेही साहजिकच, ‘खेलकर्णजी’ आणि ‘मालकर्णजी’ ही नावे गळून पडून खेलो आणि मालो असेच उल्लेखकेले गेले असावेत. अर्थात, हे दोघेही कितीही झालं तरी निजामशाहाचे सरदारअसल्याने त्यांच्या नावापुढे ‘जी’ हे आदरार्थी विशेषण लावणे भागच होते.म्हणूनच यांची नावे पुढे ‘खेलोजी’ आणि ‘मालोजी’ अशीच रुढ झाली. पुढे खेलोजीहे लढाईत ठार झाले आणि मालोजी हे एके दिवशी चाकणजवळच्या चासकमान (थोरल्याबाजीरावांच्या पत्नीचे माहेरही याच गावचे होते) गावात जलक्रिडा करावयासगेले असता बुडून मृत्यू पावले.

बहिर्जी नाईक – 5 (भाग शेवटचा)

 

एक मराठा सरदार …राजांना भेटायला आला होता…स्वराज्याच्या सेवेसाठी स्वतःला हाजीर करण्याचा मनसुबा होता…काही छोटे मोठे नजराणे आणले होते…योग्य ती चाचपणी केल्यानंतर त्याला महाराजांसमोर उभे करण्यात आले…त्याने स्वतःचा मनसुबा पूर्ण राजसभेसमोर सांगितला…आणि निघता निघता राजांना आपल्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले….त्यातील मजकूर काहीसा असा होता… ” नवरी मुलगी दागदागिने परिधान करून आणि नटून थटून तयार आहे… राजे तुमच्या आशीर्वादाची शुभ कार्य सुरळीत पाडण्यासाठी गरज आहे…सर्व काही आलंबेल आहे…वऱ्हाडी आणि वाजंत्री यांची योग्य ती सोय केलेली आहे तेव्हा तुम्ही आणि तुमचे समस्त कुटुंब लग्नाला चला…लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला”… तो मजकुर वाचून राजांच्या चेहऱयावर स्मित रेषा उमटली आणि राजांना कळून चुकले तो मराठा सरदार दुसरा तिसरा कोणी नसून आपला बहिर्जीच आहे…

 

आमंत्रणं तर आले होते आता लगबग करायला हवी होती…मुहूर्त चुकता काम नये…राजांनी आपल्या साथीदारांना आदेश दिला ५ दिवसांत…नव्या कामगिरीवर निघायचे आहे…लगबग सुरु झाली…अवघ्या ५ दिवसांत…उत्तोम उत्तम ६ हजार घोडेस्वार आणि अजून जास्त १ ते २ हजार घोडे तयार झाले… पण दिवसाउजेडी निघणे धोकादायक होते…जवळचं जसवंतसिंग कोंढाण्याला १० हजार सैन्यासह वेढा घालून बसला होता… तो जर सामोरा आला असता तर सर्व काही फसले असते…तेव्हा रोज दोन हजार सैनिक असे तीन दिवस …बहिर्जीनी शोधलेल्या जंगलातल्या वाटेवरून…जसवंतसिंग आणि त्याच्या सैन्याच्या नजरेपासुन आणि वेढ्यापासून दूर एका गुप्त ठिकाणी थांबले होते….

 

राजे स्वतः आणि काही निवडक साथीदार आणि बहिर्जी नाईक वेष बदलून २ हजार घोडयांसकट मुख्य रस्त्याने निघाले… कोणी विचारले असता ते सांगत…खुद्द औरंगजेबाला हा घोडयांनाचा नजराणा पेश करण्यासाठी चाललो आहोत…मग कोण हो अडवणार त्यांना…कोणाला बादशाही मर्जी खप्पा करून घ्यायची हिम्मत होती….दोन दिवसांनी राजे आणि ६ हजार घोडेस्वार एका ठिकाणी जमा झाले…आणि तिथुन ठरल्याप्रमाणे त्र्यम्बकेश्वर मंदिराच्या दिशेनं कूच केली…राजांनी आणि मावळ्यांनी दर्शन घेतले…आणि निघता निघता बहिर्जी आणि त्यांच्या साथीदारांनी एकच अफवा सोडून दिली… औरंगाबादवर चढाई करायला चालो आहोंत…तेव्हा नुकताच शहाजादा मुज्जम तिथे रुजू झाला होता… त्याला हि बातमी समजली आता आपल्याला शौर्य दाखवायची मोठी संधी चालून आली आहे…आणि सिहासनावर हक्क दाखवायला संधी चालून येत होती…आणि मुज्जम च्या आदेशानुसार सर्व सरदार आणि सैन्य औरंगाबादच्या वेशीवर जमा झाले…राजांचे स्वागत करायला…पण राजे तिथे कुठे येणार होते…ते तर निघाले सुरतेला …सर्व मोकळा रस्ता मिळाला.. जे काही मोगली ठाणी होती तिथे नाममात्र सैन्य होते…त्यांना तेच कारण सांगत होते औरंगजेबाला मुजरा पेश करायला चालो आहोत… इथे शहाजादा मुज्जम ला काही कळेचना हे मराठे येत का नाही…जागा सोडू शकत नाही…मराठे म्हणजे भुते कुठूनही उगवतील…

 

मजल दरमजल करत राजे, बहिर्जी आणि ती ६ हजार सह्याद्रीची भुते सुरतेपासून आत फक्त २ ते ३ मैलाच्या अंतरावर पोहचली होती…अजूनही कोणाला थांगपत्ता लागला नव्हता…सुरतेत सकाळ होत होती…आणी अचानक कल्ला वाढला..सोने ,नाणे लपवायला हि वेळ नव्हता… मराठयांची छावणी अचानक एका रात्रीत उगवली होती…काहींचं समजत नव्हते…हि भूत एवढ्या लांब आलीत कशी…मोठमोठे व्यापारी घाबरून इनायत खानाच्या आश्रयाला आले होते… तेवढ्यात राजांचे खंडणीचे चे पत्र इनायत खानाला पोहचते झाले…त्यात बहरजी बोहरा, हाजी कासम , हाजी बेग आणि अब्दुल जाफर आपली नवे ऐकून रडायलाच लागले …त्यांना आपली नावे समजलीच कशी…त्यांना खंडणी ठरवण्यासाठी पाचारण केले होते …नाहीतर दुपारनानंतर…सुरत बदसुरत होणार होती….पण कोणी आलेच नाही…उलट राजांनी पाठवलेल्या स्वारालाही धमकी देऊन पाठवले गेले…मग काय आदेश होताच हरहर महादेवच्या गजरात सुरवात झाली…बहिर्जी आणि त्यांच्या साथीदारांनी कुठे कुठे खुणा करून ठेवल्या होत्या…ती घरे, दुकाने, गोदामे सर्वप्रथम लुटली गेली..मंदिरे,चर्च, मशिदी आणि स्त्रिया आणि मुले यांच्याकडे चुकूनही कोणी डोळां वर करून पहिले नाही आणि काही सद्गृहस्थ आणि दानशूर व्यापारी…यांना कोणीही हात लावला नाही…महाल..घरे.. गोदामे.. वखारी तीन दिवस जळत होत्या…होत्या चे नव्हते झाले होते…कित्येक कैदी झाले होते…त्यातच इनायत खानाने राजांवर मारेकरी पाठवण्याच्या मूर्खपणा केला होता…त्यामुळे अजून चवताळून मराठे जे दिसेल त्याला आग लावत होते…सहयाद्रीच्या शिवाचा तिसरा डोळा आता उघडला होता… सुरतेत आता फक्त अग्नी तांडव करत होता… खूप सारी खंडणी राजांनी आता गोळा केली होती…तेवढ्यात बहिर्जींच्या साथीदारांनी खबर आणली…कोणी एक मोगली सरदार सुरतेच्या दिशेने येत आहे…लढाई करायला वेळ नव्हता.. मग काय जेवढे गोळा झाले होते तेवढे घेऊन राजे आणि बहिर्जीं आणि ती भुते राजगडाच्या वाटेला लागले…दिवसा आराम आणि रात्री प्रवास करून राजे आणि खजिना …राजगडाच्या पायथ्याशी आला होता…

बहिर्जी नाईक, जिवाजी ,भिवाजी आणि त्यांचे हेरखातं…राजे ,राजगड आणि सह्याद्री आता निवांत झाले होते…राजा सुखरूप आला होता…..बहिर्जीनी मोठी कामगिरी बजावली होती….

 

खरंच सर्व काही निवांत होते ???….नव्हे सुरतेची बातमी कशी लपून राहील बादशाह पासुन…मिर्झा राजे जयसिंग नावाचे वादळ आता सहयाद्रीच्या दिशेनं तुफान वेगात सुटले होते…खुद्द राजांना औरगंजेबासमोर पेश करण्यासाठी …तेव्हा तर बहिर्जीना जीवनातली सर्वात मोठी कामगिरी पार पाडायची होती…

 

समाप्त…..

लेखक : – मिलिंद कल्पना राजाराम धनावडे

milindd1782@gmail.com

बहिर्जी नाईक – 4

कधी भिकारी, कधी व्यापारी, कधी फकीर,कधी सैनिक,कधी मजूर, कधी सैनिक अश्या हजार वेषात बहिर्जी आणि त्यांचे साथीदार सुरतेत जवळजवळ महिनाभर फिरत होते….कुठे जास्त घबाड सापडेल,कुठे अजिबात जायचे नाही…कुठच्या व्यापाऱ्याच्या महालात तळघर आहे…कोणच्या घरात तिजोरी भरभरून वाहत आहे…कुठे लपण्याच्या किंवा लपवण्याच्या जागा आहेत…कुठे चोरवाट आहे…कुठे छोट्या छोट्या गल्ल्या, कुठे मोठेमोठे रस्ते…कुठे दुकाने आणि गोदामे आहेत…कुठच्या दुकानात काय दडले आहे…हे सर्व बहिर्जी पाहत होते…आणखी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली…ऐकीव माहिती प्रमाणे जवळ जवळ ४ ते ५ हजार सैनिक…सुरतेच्या रक्षणाकरिता तैनात केले होते, पण महिनाभर सुरतेत फिरूनसुद्धा त्यांचा ठाव ठिकाणा किंवा त्यांचे काहीच अस्तित्व दिसत नव्हते….मग गेले कुठे ???

त्याचे उत्तरही लगेच मिळाले ….बहिर्जीच्या साथीदारांनी खुद्द सुभेदाराच्या महालात जाऊन माहिती काढली होती…. ४ ते ५ हजार सैनिक फक्त नावालाच होते…प्रत्यक्षात सैनिक होते १ ते २ हजार…५ हजार सैनिक दाखवून सुभेदार इनायत खान…त्यांचा पैसा लाटत होता… बहिर्जी मनातल्या मनात खूष झाले…तिथे लढाई करायला सुद्धा सैन्य नव्हते.. सगळी तयारी झाली होती… आता एक शेवटचा डाव टाकायचा बाकी होता….

 

एके दिवशी बहिर्जीनी त्यांचा साथीदारांना वेशीबाहेर जंगलात भेटायला सांगितले….आणि एक डाव रंगला…पूर्ण सुरत शहर झोपले होते…आणि अचानक घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू यायला लागला…आणि त्यापाठोपाठ ” हर-हर महादेव” च्या घोषणा…कोणाला काय होते ते कळेचना असा कसा शिवाजी आला… इतक्या लांब…भूत विद्या अवगत आहे का त्याला…बहिर्जी चे साथीदारांनी काम चोख बजावले होते…सुरतेत गडबड चालू झाली…काळोख्या रात्री दिवस झाला…जो तो व्यापारी बैलगाड्या भरून आपला खजिना सुरतेच्या बाहेर काढला…आणि भरूच शहराच्या दिशेने पळायला लागले..बहिर्जी गुपचूप त्यांच्यावर लक्ष ठेवून होते…अर्धाहुन सुरतेचा खजिना आता भरूच शहरात आला होता…कोणी पहारेकरी नाही…किल्ला नाही.. सैन्य नाही…बस्स न लढता असा खजिना मिळाला तर काय भांडायची गरज होती…बहिर्जीनी तिथे आपले हेर पेरून ठेवले…. हि अशी गम्मत बहिर्जी नी पुढच्या महिन्याभरात अजून दोन तीनदा करून पहिली…कुठे खजिना जातो?? कुठच्या रस्त्यानं जातो?? सगळे पाहून ठेवले…

 

आता ” शिवाजी आला .. शिवाजी आला ” ऐकून सुरत मधील व्यापारी पण निवांत झाले होते…तत्यानां समजून चुकले होते कोणीतरी आपली गंमत करतेय…. पण खरी गम्मत तर बहिर्जी आणि राजे करणार होते… सुरत खरोखरीच लुटली जाणार होती… ” हर-हर महादेव” च्या घोषणा. खरोखरीच होणार होत्या…सगळी बित्तम बातमी काढून बहिर्जी आणि त्यांचे काही साथीदार राजगडाकडे दौडत सुटले होते… भिवजी आणि जिवाजी राज्यांच्या स्वागतासाठी पाठीच थांबले होते… थोड्याच दिवसात “सुरत” बेसुरत होणार होती…दख्खन चे वादळ धडकणार होते…

क्रमश :

 

लेखक : – मिलिंद कल्पना राजाराम धनावडे
milindd1782@gmail.com

 

 

मराठा साम्राज्य : भाग 1- भोसले कुळ

आजपासून नवीन लेख संग्रह सादर करीत आहे. त्याचे नाव  मराठा साम्राज्य

या लेख संग्रहात तुम्हाला माहिती मिळणार आहे हिंदुथानात स्थापन झालेले मराठा घराणी, अपराचीत सरदार मराठा, सर्नोबत्त, सेनापती…

मराठा म्हणजे मराठा समाज तर आहे पण ज्यांनी महाराष्टासाठी आणि मराठेशाही साठी जीव दिला त्या सर्व हिंदुस्तानातील मराठा मग तो ब्राम्हण, मराठा, महार, धनगर, रामुशी किवा कोणत्याही जातीचा असो तो खरा हिंदुस्तानचा मराठा
ज्या मराठा सरदारांनी शिवरायांच्या स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रुपांतर केले त्यांचा इतिहास .

मराठे- शिवाजी राजा , जाधवकुळ, सखारामबाजू, सदाशिव माणकेश्वर, सदाशिवरावभाऊ पेशवे, संभाजी राजे , संभाजी आंग्रे, समशेरबहाद्दर, शेखोजी आंग्रे, हणमंते, हरिपंत फडके, अण्णाजी दत्तो, अनुबाई घोरपडे, अमृतराव पेशवे, अय्याशास्त्री, अलीबहाद्दर, असईची लढाई, अहल्याबाई, अज्ञानदास, अज्ञानसिद्ध नागेश, आकाबाई, आंगरे, आडगांवची लढाई, आनंदराव गायकवाड, आनंदराव धुळप, आनंदराव पवार, आनंदराव रास्ते, आनंदीबाई जोशी डॉ., आनंदीबाई पेशवे, आपटे घराणें, आपटे महादेव चिमणाजी, आप्पा देसाई निपाणकर, आप्पा बळवंत, आबदारखाना, आबाजी कृष्ण शेलूकर, आबाजी विश्वनाथ प्रभु, आबाजी सोनदेव, इनाम, इब्राहीमखान गारदी, इष्टुर फांकडा, उदाजी चव्हाण, उदाजी पवार, उद्गीरची लढाई, उद्धव योगदेव, उपरि, उमाबाई दाभाडे, उष्टरखाना, औंध, अंताजी बर्वे, अंताजी माणकेश्वर, अताजी रघुनाथ, अंबरखाना, अंबाजी इंगळे, अंबाजी पुरंधरे, कदम इंद्रोजी, कदम कंठाजी, कर्ण, कलमदाने, कलावंतखातें, कलुशा, कविजंग, कान्होजी आंग्रे, कान्होजी भोंसले, कायगांवकर, काशीबाई पेशवे, काशीराज पंडित, कुरुंदवाड, कुसाजी भोंसले, कुळकर्णी, कृपाराम, कृष्णराव खटावकर, कृष्णराव बल्लाळ काळे, कृष्णाजी कंक, कृष्णाजी त्रिमल, कृष्णाजी नाईक जोशी, कृष्णाजी भास्कर, केसो भिकाजी दातार, कोठी, कोतवाल, कोन्हरराम कोल्हटकर, कोन्हेरराव फांकडे, कोप्पळ, खंडेराव गायकवाड, खंडेराव गुजर, खंडेराव दाभाडे, खंडेराव हरि, खडेराव होळकर, खंडोजी माणकर, खंडो बल्लाळ इत्यादी.

बहिर्जी नाईक – 3

 

बहिर्जी, भिवाजी आणि जिवाजी दौड करतच होते….सोबतीला कोण होते..किर्र काळोख….रानवेडा पाऊस… भर्राट वारा…घनघोर जंगल… वेडया वाकड्या वाटा… डोंगर दऱ्या आणी स्वराज्य सांभाळणारा सह्याद्री…. आई भवानी आणि राजांचा हात होता डोक्यावर मग घाबरायचंय कशाला.. पाऊस थांबला होता…झुजूमुंजू होत होते..बळी राजा आपल्या सोनपिवळ्या शेताच्या दिशेने चालला होता…कोंबडे जिवाच्या आकांतने ओरडत होते…स्वराज्य हळूहळू जग होत होते . आता तिघांनी घोडे अजूनच जंगलात पिटाळले.. त्या तिघांची नजर काहीतरी शोधतं होती… एखादी चोरवाट, भुयार… जंगलाच्या पोटात लपलेली एखादी मोकळी जागा… येणारा खजिना सांभाळून आणायला काहीतरी जागा नको … एवढे पाच-सहा हजार मावळे..तेवढेच किंबहुना जास्त घोडे.. मग ते थांबणार कोठे…ठिकठिकाणी मोगली सरदार… ठाणी… खडे सैन्य होते..

 

एका छोट्या टेकडीवर चढून…भिवाजीने आपल्या दोस्तांना आवाज दिला आणि हुकमेसरशी बहिरी ससाणा आकाशात घिरट्या घालू लागला .. पुढे गेलेल्या साथीदारांनी निरोप पाठवला होता.. रस्ता सांगितला होता …जागा पहिल्या होत्या….पुढे सात -आठ दिवस बहिर्जी, भिवाजी आणि जिवाजी यांचा तो परिपाठच होऊन गेला होता… रात्री दौड आणि सकाळी थोडा आराम करून जंगलाचा कानोसा.

 

आता “सुरत” नजरेच्या टप्प्यात होती… बहिर्जी मोगली सैनिकाचा वेष परिधान करून एकटेच पुढे झाले…भिवाजी आणि जिवाजी तिघ्यांच्या घोड्यांची आणि पाठून येणाऱ्या पाच ते सहा हजार मावळ्यांची आणि त्यांच्या घोड्यांची व्यवस्था लावण्यासाठी पाठी थांबले .

 

“सुरत” …. दक्षिणेला भरभक्क्म बुरहाणपूर दरवाजा… मुख्य रस्ता तिथूनच होता… बाजूला खळाळता समुंद्र…समुद्रावर सज्ज असलेली कित्येक मोगली जहाज… डच ,इंग्रज , पोर्तुगीच,अरब त्यांच्या वखारी… व्यापारी बहरजी बोहरा, हाजी कासम, हाजी बेग ,अब्दुल जाफर यांचे उंची महाल…मोठमोठे वाडे… त्याला सोन्याचे खांब …नक्षीदार कमानीच्या खिडक्या… प्रशस्त रस्ते त्या वरून धावणाऱ्या मेणा,पालख्या , इंग्रज्यांच्या चार चाकी बग्ग्या…व्यापारी आणि यात्रेकरू यांच्यासाठी बांधलेल्या सराया… देशोदेशीचे वकील..खास औरंगजेबासाठी नजराणा म्हूणन आणलेले जातिवंत २०० अरबी घोडे…कित्येक प्रकारची दुकाने होती सुरतेच्या सुभेदार ” इनायत खानाच्या” किल्ल्याबाहेरच…. कुठं केशर,कस्तुरी,चंदन,अत्तर,हस्तिदंत,रेशीम आणि जरीचे कापड,उंची वस्त्रे होती’… गुलामांचा आणि स्त्रियांचा व्यापार त्यातून मिळणारे रग्गड उत्त्पन…..पण राजांना यातील काही नको होते…फक्त सॊने, चांदी, माणिक, मोती , बस्स एवढेच हवे होते….सागरातून फक्त तीन ते चार मुठी हव्या होत्या

श्रीमंत योगी होता आपला राजा. सोन्याचा धूर येत होता…औरंगजेबाची सोन्याची राजधानी होती ती…कुबेराची श्रीमंती सुद्धा त्याच्यापुढे काडीमोल होती…

 

सुरतेच्या आसपास तिन्ही बाजूला समुद्र…पूर्ण भारतवर्षात पसरलेले मोगली साम्राज्य…एकसो एक शूर सरदार…लाखो सैन्य…घोडं-दळ,पायदळ,शेकडो जहाज … अगणित संपत्ती… आणि त्यांचा शहेनशहा …”औरंगजेब”… मग कोण नजर वर करून बघणार अशा सुरतेकडे…कोण बघणार ??? सह्याद्रीच्या शिवाचा तिसरा डोळा आता उघडला होता आणि औरंगजेबाच्या सुरतेवर फिरत होता…काही दिवसातच सुरत पेटणार होती … बहिर्जी नाईक सुरतेच्या पोटात शिरले होते….नव्हे शिवाचा तिसरा डोळाच सुरतेतून फिरत होता….

क्रमश:

 

लेखक : – मिलिंद कल्पना राजाराम धनावडे
milindd1782@gmail.com

बहिर्जी नाईक – 2

खूप मोठी मोहीम होती…आपल्या साथीदारांना आवश्यक ते सूचना देऊन आणि त्यानां सुरतेच्या दिशेच्या रवाना केले … आणि स्वतः मात्र राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या निबिड जंगलात धाव घेतली…बहिर्जी जसे जंगलात आत जात होते तसे जंगल अजून दाट होते होते … सकाळीही सूर्याची किरणे जमिनीवर यायला बिचकत असत त्यात हा राक्षसी पाऊस … संध्याकाळ का सकाळ काहीही काळत नव्हते..बहिर्जीनी एका ठिकाणी घोडा थांबवला आता पुढे पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता … एक दोन टेकाड ओलांडून बहिर्जी जंगलात एका ठिकाणी मोकळ्या जागेवर येऊन उभे राहिले …. आसपासचा अंदाज घेतला आणि समोर असणाऱ्या मोठ्या वडाच्या झाडाला वळसा घालून त्या झाडाच्या पाठच्या बाजूला येऊन उभे राहिले… आणि समोर असणाऱ्या निवडुंगाच्या झाडीकडे वाटेतले दगड धोंडे आणि एक छोटी नदी पार करून चालते झाले … ती निवडुंगा ची झाडी चांगली २ ते ३ पुरुष उंचीची होती…पुढे जायला अजिबात रस्ता नव्हता … मग बहिर्जी का आले होते तिथे.???.. सुरतेचा रस्ता तर दुसरा होता ! मग काय कारण होते?? ……… बहिर्जीचे जमिनीवरचे साथीदार तर तयार झाले होते….पण आकाशातले साथीदार ते सुद्धा येणार होते ना…अहो राजा येत होता स्वतः मग ते असे पाठी राहतील…स्वराज सर्वांचे होते.. एका खारुताईने नाही का प्रभू रामचंद्राला सेतू बांधायला मदत केली होती.

निवडुंगाच्या झाडी जवळ आल्यावर बहिर्जीनी एक सांकेतिक आवाज काढला… आणि तसाच आवाज दोन तीनदा झाडीच्या पलीकडून आला… आणि अलिबाबाच्या गुहेचे दार उघडावे तसे त्या निवडुंगाची भिंतीत एक दरवाजा उघडला गेला… आणि बहिर्जीनी मोकळ्या मैदानात पाय ठेवला नसेल तेवढ्यात ६ ते ७ बहिरी ससाणे ,काही गरुड, कबुतरे यांनी कल्ला करायला सुरवात केली…आपल्या पोशिंद्याला त्यांनी बरोबर ओळखले होते…आणि तेवढ्यात लगबगीने जिवाजी आणि भिवाजी धावत आले… हे जिवाजी आणि भिवाजी बंधू पक्षी आणि प्रांण्यांचे आवाज काढण्यात एकदम पारंगत होते आणि प्रांण्यांची भाषा सुद्धा जाणत होते…बहिर्जीनीच त्यानां शोधले होते… बहिर्जीनी त्या बंधूंना काही सुचना दिल्या तसे त्यांनी ३ ते ४ बहिरी ससाणे २ गरुड आणि काही कबुतरे यांना मोकळे केले…आणि त्या स्वराज्याचा मूक शिलेदारांनी…त्या राक्षसी पाऊसाला न जुमानता आकाशात झेप घेतली … जिवाजी आणि भिवाजी आपल्या माणसांना काही खास सूचना दिल्या…आणि ते बंधू आणि बहिर्जी त्या निवडुंगाच्या झाडीतून बाहेर आले… आणि बहिर्जीनी मगाशी घोडा थांबवलेल्या ठिकाणी आले.

तिथुन उत्तर दिशेला ४ ते ५ मैल ती तिघे चालत गेले आणि एक डोंगरावर चढले आणि जंगलातली ती सर्वात उंच जागा असल्यामुळे तिथुन आसपासचे जंगल नीट नजरेत येत होते …..तिथेच बहिर्जीनी आणि जिवाजी आणि भिवाजी बंधूनी थोडा आराम केला आणि पाठीशी बांधलेला भाकर तुकडा तोडला.. काही वेळ आसपास चा अंदाज घेतला… आणि अंदाजे एक ते दोन तासापूर्वी सोडलेले दोन बहिरी ससाणे आणि एक गरुड.. ते तिघे आराम करत असलेल्या जागी आले… तेव्हा त्यांच्या पायाला चिट्ठ्या बांधल्या होत्या…त्यांत सांकेतिक स्वरूपात काही माहिती होती….कोंढाणा आणि राजा जसवंतसिंगाबद्दल

राजगडा पासून ३० ती ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या ” कोंढाणा ” किल्ल्याला राजा जसवंतसिंग वेढा घलून बसला होता….. पण फक्त बसलाच होता.. सह्याद्रीचा पाऊस आणि जंगल ह्याच्यापुढे त्याचे काहीच चालत नव्हते….. बहिर्जीना आधी मिळालेली माहिती खरी होती आणि आता तर त्यावर शिक्कामोर्तब झाले होते…राजा जसवंतसिंग आणि त्याचे १० हजाराचे सैन्य काहीच करत नव्हते… अहो अश्या पावसाची कुठे सवय होती त्याना आणि मराठे पण त्याला काहीच त्रास देत नव्हते बसतोय तर बसुंदे आता पुढे कूच करायला काहीच हरकत नव्हती…

त्या चिट्ठ्या वाचून बहिर्जी बोलले… ” जिवाजी आणि भिवाजी फार मोठी जोखीम आहे…आता उन्ह उतरतील आपले घोडे तयार ठेवा…रातच्या पहिल्या पहारी निघू… जिवाजी बोलले पण बहिर्जी रातच्याला का ??? आणि सकाळी दिवसा उजेडी का नग…बहिर्जी हसले आणि बोलले… अर आपलं धनी पण आपल्यसंगट येणार हायेत ??? कुणाची नजर नको पडायाला ??? कुठं जातोय काय करायला जातोय ?? काहीच नग समजायला !!!!

काही वेळाने बहिर्जी ,जिवाजी आणि भिवाजी डोंगर उतरून खाली आले आणि सरळ सोपा मार्ग सोडून जंगलातल्या वाटेनेच…दौडत सुरतेच्या दिशेनेच निघाले … आता काही दिवस रात्रीचा उजेड करायचा होता… औरंगजेबाच्या सुरतेवर आता हात मारल्याशिवाय बहिर्जीना आता चैन पडणार नव्हती….

क्रमश :

 

लेखक : – मिलिंद कल्पना राजाराम धनावडे
milindd1782@gmail.com