आपल्या महाराजांचे आज्ञापत्र विसरलात का?

*माझ्या रयतेच्या काडीलाही धक्का लागता कामा नये*

मराठा आंदोलनात हिंसक घटनांची वाढ होत आहे. तरुण मुलींच्या नेतृत्वाखाली शांततेने *लाखो लोकांचे ५८ मराठा क्रांती मूक मोर्चे* काढून जगाला अचंबित केलेल्या मराठा समाजाच्या मोर्चात सध्या हिंसक घटना वाढत आहेत. तरुणांना नोकऱ्या नाहीत, शेती मालाला किंमत नाही, अशा दुष्टचक्रातून तरुणांमध्ये नैराश्य वाढत आहे. ५८मोर्चे होऊन ही आपल्या मागण्यांसाठी काहीच होताना दिसत नसल्याने असंतोष वाढत आहे पण हीच वेळ आहे जबाबदारी उचलायची. आंदोलन बदनाम करण्यासाठी काही शक्ती काम करत आहेत. काही घटकांना हीच हिंसा, हाच दंगा हवा आहे. समाज पेटलेला असेल तरच यांना त्यांच्या पोळ्या भाजता येणार आहेत. पण आपण ही त्यांच्या हातातील बाहुली बनून हिंसा करून आपल्या आंदोलनाचे व आपल्याच महाराष्ट्राचे नुकसान करणार का? सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून, पोलिसांवर दगड फेकून, एसटी पेटवून आपण काय साध्य करतोय. ही सार्वजनिक मालमत्ता आपल्याच पैसमधून उभी राहिली आहे. हे पोलीस आपलेच बांधव आहेत. आपल्यासाठीच हे दिवस रात्र रस्त्यावर आहेत. ही एसटी आपल्याच ग्रामीण भागाचे दळणवळणाचे मुख्य साधन. त्यांना लक्ष्य करून आपले ध्येय कस साध्य होणार? हा विचार आपण करणार आहोत की नाही. आमच्या महाराजांच्या चारित्र्यमधून आम्ही काय शिकलो?

*छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्त असणारे आपण… आज त्यांचाच वारसा विसरलोय की काय? काय शिकवण देते आमच्या राजांचे चरित्र?*

३५०वर्षा पूर्वीचे आपल्या महाराजांचे आज्ञापत्र काय सांगते. आपल्या राज्यातीलच नव्हे पण शत्रूच्या राज्यातील सामान्य रयतेच्या गवताच्या काडीलाही धक्का लावू नये हे महाराजांची शिकवण. शत्रूच्या राज्यात असेल तरी घोड्यांना चारा हा विकतच घ्यावा सामन्य रयतेला कोणता ही त्रास देऊ नये ही त्यांची आज्ञा.
त्यांचा वारसा सांगणारे आपण आज आपलाच महाराष्ट्र पेटू देणार आहोत का? आपल्या मागण्यांसाठी आंदोलन नक्की करू पण त्याला कुठलेही हिंसेचे गालगोट लागणार याची जबाबदारी आपण घ्यायला हवी. आपल्यातीलच एखाद्या बांधव असे कृत्य करत असेल तर त्याला रोखू. आपल्या महाराजांचा सोनेरी इतिहास सोनेरी वारसा जपू. त्याला कोणत्या ही प्रकारचे गालगोट लागणार नाही याची काळजी घेऊ.
लाखो लोकांचे ५८ मोर्चे शांततेत काढून आपण जो जगापुढे आदर्श निर्माण केला आहे तो आपणच उध्वस्त करून. आज आपण महाराजांचा वारसा जपू शकलो नाही तर आपली पुढील पिढी आपल्याला दोष दिल्यावाचून राहणार नाही.

येणाऱ्या प्रत्येक अटीतटीच्या प्रसंगात तुमच्यातील माझ्यातील सर्वांमध्ये असणारे शिवाजी महाराज जागवूया. महाराजांच्या आज्ञेसाठी आपले जीवदान देणाऱ्या तानाजी, शिवा काशीद, बाजीप्रभू, मुरारबाजी व लाखो मर्द मावळ्यांना आठवूया. महाराजांची आज्ञा पाळूया.

*शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।।*
*शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।*

*एक मराठा लाख मराठा*

– सूरज अमरनाथ माने. शिरोळ.🙏

हा आततायी पणा प्रसार माध्यमांच्या आत्महत्येच्या दिशेने प्रवास सुरु झालेला दिसतोय

भिडे गुरुजींच्या वक्तव्याबद्दल वारकरी सेनेचे प्रसिद्धीपत्रक.

’सर्व संतांपेक्षा मनु एक पाऊल पुढे : भिडे गुरुजी’ अशा प्रकारची न्य़ूज ABP माझाने चालवली. या न्युज मध्ये भिडे गुरुजिंच्या ३० मिनिटांच्या भाषणातील २ ते ३ वाक्ये घेवून पुन्हा एकदा कॉन्ट्रवर्सी करण्याचा प्रयत्न केला, यावर आता राष्ट्रीय वारकरी सेनेने प्रसिद्धीपत्रक जाहीर करून या वादात उडी घेतली आहे, या प्रसिद्धीपत्रकामध्ये ’गुरुजिंच्या या भाषणामध्ये कोणताही वाद नसुन, तो तसा असण्याचे भासवले जात असल्याचे म्हटले आहे’

भिडे गुरुजींचं मनूबद्दलचं वक्तव्य आणि मिडियाचा गैरसमज पसरवण्याचा धंदा

गुरुजी अनेकदा एखादा विषय समजवुन सांगताना अनेक छोटी मोठी उदाहरणे, दाखले, आणखी छोटे मोठे विषय त्यात समाविष्ट करत असतात. आपण जर मध्येच गुरुजींचं व्याख्यान सुरु असताना आलो तर तो विषय काय चाललाय हे समजायला बराच वेळ जातो. कधी कधी गुरुजींचा एक विषय अर्ध्या अर्ध्या तासाचा असतो आणि त्यात अनेक संबंधित संदर्भ देत असतात आणि असं करत असताना थेट विषयाशी संबंध नसलेल्या ईतर गोष्टीसुद्धा मांडत असतात आणि काल नेमकं तेच झालं संत आणि मनूच्या उल्लेखा संदर्भात. आपला महाराष्ट्र हा संतांचा आणि शूरविराचा आहे हे सत्य जो स्वीकारतो त्यांना गुरुजींच्या बोलण्याचा अर्थ लगेच समजेल.

काल भक्ती आणि शक्तीचा संगम होता
भक्ती ही श्रेष्ठच आहे अध्यात्म ज्ञान हवे
पण त्यासोबत रक्षण करण्यासाठी क्षत्रियत्वसुद्धा हवच. संत परंपरा आपल्या महाराष्ट्रात होतीच पण परकीयांचे राज्य संपवायला आणि स्वराज्य निर्माण करायला छत्रपतींनाच जन्म घ्यावा लागला या सत्याचा स्वीकार करावाच लागेल. गुरुजींनी तेच सांगितलं संतांनी धर्माचरण कसे करावे हे शिकवलं तर मनूने धर्म रक्षण शिकवले ( मनू हा क्षत्रियच होता)

यात चूक काय???

मीडिया फक्त trp वाढवते किंबहुना मिडियाला गुरुजींना काय सांगायचे आहे हे कळतच नाही आणि म्हणूनच समाजात गैरसमज निर्माण होतात…

सर्व संतांपेक्षा मनू एक पाऊल पुढे : भिडे गुरुजी

सर्व संतांपेक्षा मनू एक पाऊल पुढे, वारीदरम्यान संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ व्हायरल. पुन्हा ABP माझा ने संभाजी भिडे गुरुजी यांची काट-छाट करुन व्हिडीओ व्हायरल केला .
हा व्हिडिओ व्हायरल करत असताना ABP माझा ने पुढील आपल्या व्हाक्यात ”पुढे” हा शब्द काढून ”श्रेष्ठ” असे म्हटले…
संपुर्ण व्हिडिओ ABP माझा दाखवत नाही. मागे, अंब्याच्या केस मध्ये ABP माझा ने असेच भिडे गुरुजिंच्या वाक्यांचा विपर्यास करुन बातम्या दाखवल्या होत्या, तेव्हा त्यांना माती खावी लागली होती, त्यामुळे यावेळी ABP माझा करत असलेल्या कॉन्ट्रव्हर्सीवल लोक हसुन प्रतिसाद देत आहेत.

 

जगात चिरकालीक असे काहींच नाही

*”जगात चिरकालीक असे काहींच नाही..”*

*— सरखेल कान्होजी आंग्रे*

*पश्चिम किनारपट्टीवरील अनभिषिक्त राजे सरखेल कान्होजी आंग्रे यांची आज पुण्यतिथी.*

*दिनांक ४ जुलै सन १७२९ रोजी अलिबाग येथे सरखेल कान्होजी आंग्रे यांची प्राणज्योत मावळली. पश्चिम किनारपट्टीवर कान्होजी आंग्रे यांनी जबरदस्त दबदबा निर्माण केला होता. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी सर्वच समुद्री सत्ता कान्होजींना वचकून होत्या.*

*”जगात चिरकालीक असे काहींच नाही..” हे सरखेलांचे इंग्रजांना पाठविलेले पत्र म्हणजे त्यांच्या मुत्सद्दीपणाचे प्रमाणच होय.*

*सरखेल कान्होजी आंग्रे यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन!*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏