संताजी घोरपड्यांचा दग्याने दुर्दैवी खून -2

आता वर म्हटल्याप्रमाणे जे सरदार पूर्वी मोंगलांकडून संताजी आणि धनाजी यांच्या फौजेत आलेले ते अनेक जण राजाराम महाराजांनी संताजींचं सेनापतिपद काढलं हे पाहून पुन्हा मोंगलाईत गेले. मार्च १६९७ च्या सुमारास धनाजी जाधवांची मोठी फौज संताजींच्या मागे धावू लागली, अखेर संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. म्हसवडच्या आसपास संताजींचा मुक्काम असताना नागोजी माने याने संताजींना दग्यानें मारलं. या नागोजींची बायको म्हणजे सान्ताज्जीनी ज्याला हत्तीच्या पायी दिलं त्या अमृतराव निम्बालकरांची सख्खी बहीण होय. नागोजीने संताजींचं मस्तक कापून ते ब्रह्मपुरीला नेऊन बादशहाला नजर केलं, यावरून संताजी आणि धनाजी यांच्यातला भांडणाचा फायदा औरंगजेबाने अप्रत्यक्ष वा प्रत्यक्ष घेतला असं नक्कीच म्हणता येईल. पूर्वी आपण बादशहाला सोडून गेलो आणि आता पुन्हा रुजू झालो याची खात्री पटवण्यासाठी नागोजीने या गोष्टीचा दुहेरी फायदा घेतल्याचं दिसतं कारण बादशहाचा सरदार लुत्फुल्लाखानाचं नागोजीला जुलै १६९७ मध्ये एक पत्रं लिहिलं त्यात तो म्हणतो, “संताजीला तुम्ही पळून जाऊ दिलं नाही. येणेंकरून सरकारची नोकरी तुम्ही एकनिष्ठतेने बजावत आहेत हे समजून तुमचे अपराध (पूर्वी सोडून गेल्याचे) क्षमा होऊन बादशहाची मेहेरनजर होईल”.

यानंतर सुमारे तीन-चार वर्ष घोरपडे-जाधव वैर सुरूच होतं, पण इ.स. १७०० नंतर संताजींच्या मुलांना भेटून धनाजींनी रुसवा काढला आणि संताजींनी दोन्हीही मुलं राणोजी घोरपडे आणि पिराजी घोरपडे पुन्हा स्वराज्यात रुजू झाले. संताजींनी नारो महादेव जोशी नावाच्या एका हुशार ब्राह्मणाला आपला पुत्र मानले होते, ज्यांनी पुढे आपले जोशी हे आडनाव सोडून घोरपडे हे आडनाव घेतले. हे नारो महादेव म्हणजेच पुढे बाळाजी विश्वनाथाचे व्याही. बाळाजी विश्वनाथांची मुलगी अनुबाई हि या नारो महादेवाचं मुलगा व्यंकटराव घोरपड्यांची पत्नी, ज्यांनीही पुढे स्वराज्यसेवा कायम केली.

एकूणच अशी आहे संताजी घोरपड्यांच्या दुर्दैवी हत्येची कहाणी.

टीप: संताजींविषयी आणि या एकंदरीत प्रकरणाविषयी अनेक पत्रे उपलब्ध आहेत. फारसी कागदात लुत्फुल्लाची पत्रे इत्यादी आहेतच, पण त्यासोबतच जेधे शकावली, म्हसवडकर माने यांची हकीकत (इतिहाससंग्रह), घोरपड्यांची हकीकत, राजवाडे खंड २०, पेशवे दफ्तर खंड ३१ इत्यादी अनेक ठिकाणी आपल्याला हि हकीकत विखुरलेली आढळेल.

– कौस्तुभ कस्तुरे

संताजी घोरपड्यांचा दग्याने दुर्दैवी खून -1

संताजी घोरपडे हे निःसंशय शूर होते. पन्हाळ्यावर मुघलांचा लोंढा चालून आला तेव्हा कागलकर घाटगे किल्लेदाराने संताजींकडे मदत मागितली. काही कारणास्तव संताजींकडून मदत पोहोचली नाही आणि अखेरीस घाटग्यांनी किल्ला तर मोंगलांना दिलाच पण स्वतःही मोंगलांच्या चाकरीत रुजू झाले. नागोजी माने वगैरे अनेक सरदार कधी इकडे तर कधी तिकडे करत होते. फलटणकर निंबाळकर हे खरंतर पूर्वीपासून भोसल्यांचे सोयरे होते. पूर्वी शिवाजी महाराजांसोबतच आत्ताही राजाराम महाराजांनी आपली एक कन्या फलटणच्या निंबाळकर घराण्यात दिली होती. अर्थात, निंबाळकर हे पूर्वीपासून आदिलशाही आणि त्यानंतर मुघलांच्या चाकरीत होते. निंबाळकरांच्या घराण्यातील, म्हणजे राजाराम महाराजांच्या जावयाचा चुलतभाऊ अमृतराव हा सुद्धा मोंगल चाकरीत असून त्याची सख्खी बहीण हि म्हसवडकर नागोजी मानेची बायको होती. इ.स. १६९१ मध्ये राजाराम महाराजांनी (रामचंद्रपंतांनी, कारण राजाराम महाराज जिंजीला होते) नागोजी मानेला सरदेशमुखीचं वतन बहाल केलं. यानंतर नागोजी पुढील पाच वर्षे तरी स्वराज्यात होता. बहुदा याच सुमारास राजाराम महाराजांनी अमृतराव निंबाळकरालाही वतनाची सनद दिली. पण निंबाळकरांच्या अंतर्गत भाऊबंदकीमुळे अमृतरावाचा चुलता मुधोजी हा कर्नाटकात जाऊन राजाराम महाराजांना भेटला आणि त्याने अमृतरावाला दिलेली संवाद रद्द करवून स्वतःच्या नावे करून घेतली.

१६९३ मध्ये संताजी आणि धनाजी हे दोघेही जिंजीच्या रक्षणार्थ दक्षिणेत उतरले तेव्हा झुल्फीकारखान कचाट्यात सापडला. त्याने राजाराम महाराजांकडे तहाची बोलणी लावली. यावेळी संताजींचं मत मोंगलांना जाऊ देऊ नये, कापून काढावं असं होतं पण राजारामम महाराजांनी आपण किल्ल्यातून बाहेर पडू शकू म्हणून मोंगलांना वेढा उठवून जायला सांगितलं. या कारणामुळे राजाराम महाराज आणि संताजीमध्ये वाकडं आलं. जेधे शकवलीतही याचा उल्लेख आहे. तात्पुरतं राजाराम महाराजांनी संताजीचं काम धनाजी जाधवांना दिलं. संताजी महाराष्ट्रात आल्यानंतर रामचंद्रपंतांनी त्यांचा रुसवा काढला आणि समजूत घातली. शंकराजी नारायण राजाज्ञा यांनीही संताजींनी समजूत घातली होती. पण एकूणच संताजी आणि बहिर्जी हे दोघेही बंधू नाराजच होते. इ.स. १६९५-९६ मध्ये मोंगली फौजांनी स्वतंत्ररित्या संताजी आणि धनाजी यांचा पराभव केलेला. यापूर्वीपासूनच संताजी आणि धनाजी यांच्यात वाकडं येऊन भांडणं सुरु झाली होती. संताजी हे शिस्तीचे कडक होते तर धनाजी हे वेळप्रसंगी पाहून माणसं आपल्या बाजूला घेण्याच्या दृष्टीचे होते. अनेक कनिष्ठ सरदार हे संताजींच्या शिस्तीला कंटाळून धनाजींची बाजू घेत यामुळे या भांडणात आणखी ठिणग्या पडल्या. जेधे शकवलीत ‘राजश्री स्वामींजवळ मुद्दे घालू नयेत, मर्यादेने राहावे’ असं शंकराजीपंत संताजींना सांगतात यावरून ते राजाराम महाराजांचाही वेळप्रसंगी मुलाहिजा ठेवत नसत हे दिसतं. १६९६ च्या एप्रिल मध्ये आयेवारकुटीजवळ झालेल्या लढाईत संताजी फते पावले. धनाजींचा पराभव झाला आणि ते महाराष्ट्रात आले. मुघल साधनांतही अनेक प्रसंग आढळतात. अमृतराव निंबाळकर हा धनाजीच्या बाजूने असता संताजींनी त्याला हत्तीच्या पायी घातले. हा अमृतराव म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे राजाराम महाराजांच्या जावयाचा चुलतभाऊ. यानंतर संताजी आणि धनाजीची या दोघांनीही राजाराम महाराजांच्या समोर एकमेकांविषयीचे चुकांचे पाढे वाचले. पेशवे दफ्तरच्या खंड ३१ मध्ये लेखांक ६८ मध्ये राजाराम महाराज रामचंद्रपंतांना म्हणतात, “संताजी घोरपडे यांनी स्वामींच्या पायांशी हरामखोरी केली याकरिता त्यास सेनापतिपदाचा कार्यभाग होता तो दूर करून फौज आणविली”. यानंतर संताजींनी उघडपणे बंड पुकारले असले तरी त्यांना राजाराम महाराजांशी थेट लढण्याची ताकद नसावी असं दिसतं.

निकोल्सच्या डायरीतलं रायगडाचं वर्णन: २३ मे १६७३

शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी इंग्रज वकील टॉमस निकोल्स १९ मे १६७३ रोजी मुंबईहून निघाला. महाराजांनी लुटलेल्या राजापूर आणि हुबळीच्या वखारींची नुकसानभरपाई मागणे हे काम त्याला सोपवलेले होते.

कल्याण – नागोठणे – महाड मार्गे तो २१ मे रोजी रायगडाच्या पायथ्याशी पोहोचला. महाराज तेथे नव्हते. म्हणून त्याने संभाजीराजांना भेटायची परवानगी मागितली. ती त्याला देण्यात आली. पण २२ मे रोजी जोरदार पाऊस आल्याने तो गडावर जाऊ शकला नाही. शेवटी २३ मे रोजी पहाटे तो गडावर जायला निघाला.

ह्या निकोल्सने त्याचे मुंबईपासून निघून पुन्हा मुंबईत येईपर्यंतचे इत्यंभूत प्रवासवर्णन लिहून ठेवलेले आहे. रायगडावर तो वकील म्हणून गेला होता पण त्याचे एखाद्या हेराप्रमाणे चोहोबाजूंस व्यवस्थित लक्ष होते. इंग्रज त्यांच्या शत्रूंवर किती बारीक लक्ष ठेवून होते हे त्याच्या २३ मे रोजीच्या डायरीतल्या नोंदीने स्पष्ट होते.

ते लिहीतो, “…किल्ल्याच्या पायऱ्या दगडांत खोदलेल्या आहेत (the steps are cut out of firm rocks) जेथे किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण नाही तेथे २४ फूट उंचीपर्यंतची तटबंदी उभारलेली आहे (where the hill is not naturally strong, there they’ve built walls of about 24 foot high) ह्या भिंतींच्या ४० फुटांच्या आतच तेथे तशीच दुसरी तटबंदी बांधलेली आहे (& within 40 foot of the first wall, there is another such a wall) थोड्या सैन्यासह हा किल्ला संपूर्ण जगाशी लढू शकेल इतका मजबूत आहे (a few men may keep it from all the world – हे निकोल्सचे शब्द आहेत!) पाण्यासाठी किल्ल्यावर खडकांत खोदलेली मोठमोठी टाकी आहेत. पावसाळयात ती भरून जातात आणि वर्षभर पाणी पुरवतात. किल्ल्यावर सर्वात उंच ठिकाणी मधोमध शिवाजीचा मोठा चौसोपी वाडा आहे. तिथूनच कारभार चालतो. मला तेथे थोडावेळ थांबवून ठेवले होते. नंतर निराजीने मला राजा संभाजीबरोबर भेटायला नेले. राजा संभाजी तरूण व अननुभवी असल्याने तो (राज्यकारभारातल्या) महत्त्वाच्या गोष्टी सांभाळत नाही…”

पण शिवाजी महाराज निकोल्सपेक्षाही धूर्त होते. ह्या भेटीत शिवाजी महाराजांनी निकोल्सच्या हाती विशेष काही लागू दिले नाही हे वेगळे सांगायला नकोच. हात हलवत तो जूनमध्ये पुन्हा मुंबईला जायला निघाला आणि १७ जून १६७३ रोजी मुंबईत पोहोचला. त्याची डायरीही त्याच दिवशी संपते.

ब्रिटिश लायब्ररीत ही निकोल्सची डायरी छान जपून ठेवलेली आहे. सोबत देतोय त्याच्या डायरीतले २३ मे १६७३ चं पान आणि डायरीच्या शेवटी त्याची छान लफ्फेदार सही!

संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार झाल्याचा पुरावा उपलब्ध नाही.

महाराजांची हत्या १६८९ साली झाली. वढू येथील समाधीचा सर्वात जुना उल्लेख १७१५ चा आहे.या पत्रात छ.शाहू व थोरल्या बाजीराव पेशव्यांनी समाधीच्या पूजेची व्यवस्था भिकाजी गोसावी व वासुदेव धर्माधिकारी यांचेकडे दिल्याचे लिहिले आहे.त्यानंतर १७३३च्या पत्रात गोविंद गोपाळ ढगोजी मेगोजी महार यांच्याकडे झाडलोटीची व्यवस्था दिल्याचे लिहिलेय. विश्वास पाटलांनी या गोविंदजींना १६८९ मध्येच आणले आहे ते कादंबरीकाराचे स्वातंत्र्य आहे.इतिहास नव्हे.शिवले वेचले ही आडनांवे शिवकालापासून आहेत त्यांचा शंभूराजांच्या मृत्यूशी संबंध नाही.संदर्भ: कमल गोखले.शं ना जोशी . सदाशिव शिवदे. डॉ.जयसिंगराव पवार.

अंत्रूज चा शिलालेख

#धर्मवीर_छत्रपती_श्री_संभाजी_महाराज_की_जय

#निजामश्रीवस्त्रहरण

पणजी येथील गोवा राज्य संग्रहालयाला भेट दिल्यानंतर हा शिलालेख नजरेस पडला. मराठी भाषा, शके १६१० (सन १६८८) आणि मूळ जागा फोंडा तालुक्यातील हडकोळण येथील. येवढीच त्रोटक माहिती शिलालेखाच्या जवळ होती.

शके १६१० ह्या कालगणनेमुळे हा लेख छत्रपती संभाजी महाराजांचा हे कळायला मदत झाली. हा शिलालेख वाटसरूंना ‘अंगभाडे’ नावाचा कर द्यावा लागे त्या संदर्भातील आहे. या लेखात संभाजी राजांना ‘क्षत्रियकुळावतंस’ असे म्हटले आहे. त्याचबरोबर शिलालेखातील ‘आता हे हिंदुराज्य जाहाले’ हे वाक्य महत्त्वाच आणि अर्थपूर्ण आहे.

शिलालेखाच्या शिळेची लांबी 36″ व रुंदी अंदाजे १०” ते १२” आहे. लेखात एकूण २० ओळी असून शेवटच्या दोन ओळी शिळेच्या खालच्या जागेत लिहिल्या आहेत. लेखाच्या वरच्या भागात ‘श्रीरामाय’ असे कोरले आहे. पण ते पटकन वाचता येत नाही. नंतर सूर्य, चंद्र आणि अष्टदल कमळ कोरले आहे. लेखाच्या शेवटी दोन्ही बाजूंना गाईची चित्रे असून त्यांच्या मधोमध ‘शुभं भवतु’ कोरले आहे. हे पण बरेच अस्पष्ट झाले आहे.

श्रीगणेशायनम:
श्री लक्ष्मी प्रसन्न|| स्वस्ति श्री नृपशाळीवाहन शके||
१६१० वर्ष | वर्तमान विभवनाम संवत्सर चैत्र शुध्द
प्रतिपदा गुरुवासर गोमंतक प्रांत अनंतउर्ज देश
क्षत्रियकुळावतंस राजा शंभुछत्रपति यांचे आज्ञानुव-
र्ती राजश्री धर्माजी नागनाथ मुख्य देशाधिकारी प्रां-
त मामले फोंडा याप्रति तिमनायकाचे पुत्र सा-
मनायक याहीं विनंती केलि जे पूर्वि मुसलमाना-
च्या राज्यामध्यें तरि अनंतउर्जेसि लोकास आंगभा-
डें घेत नव्हते. तेणेंकरून व्यावहारीक लोके सुखें
येत. तेणेंकरुन राजगृहिं हासिल होय. आता हे
हिंदुराज्य जाहालेपासोन आंगभाडें घेउं लागले तेणेंकरुनी राजगृहिं
हासिलासी धका बैसला. त्यासी ते कृपाळु होउन आगभाडें उरपासि जाव
दुडूवा अर्धकोसी चौदा दुडू घेत आहेति मना करावे पण काहि राजा-
गृहिं आदाय होईल ऐसि विज्ञापना केलि ते प्रमाण जाणुन
भाणस्तरि व पारगावि व मांदुस कुडैचि येथिल आंगभाडें सोडी
लें. पुढें या प्रमाणें सकळांहि चालवावे सहसा धर्मकृत्यास नाश क
रुं नये करतिल त्यांसि महापातक आहे|| श्लोक|| श्वकृत वा परे
णापी धर्मकृत्यं कृतं नर:|| यो नश्यती पापात्मा स यती
नरकान् बहून् ||१|| लोभान्मत्सरतो वापि धर्मकार्यस्य
दुस्यक: || यो नर: स महापापी विष्ठायां जायते कृमि ||२||
दानपाळनयोर्मध्ये दानात् स्त्रेयोनुपाळनं|| दानात् स्वर्गमवा
प्नोति पाळणादच्युतं पदं|| या धर्मकार्या समस्तिं मान देवावे

या शिलालेखातील “अनंतउर्ज” म्हणजे आजचे अंत्रुज. धर्माजी नागनाथ याने नदीवरील मालासाठी अंगभाडे व्यापाऱ्यांच्या हितार्थ माफ केलेले होते. अंगभाडे कर बसवल्यास मालाची ने-आण कमी होते. पण अंगभाडे सोडल्यापासून मालाच्या ने-आणीला प्रोत्साहन मिळते. कर माफ केल्याने लोकांना दिलासा मिळतो. तसेच धर्मकृत्यास नाश करू नये यातून संभाजी महाराजांची स्वधर्मावरील धर्मनिष्ठा दिसून येते.

वीरपुत्र संताजी जाधव -इतिहासात हरवलेला मावळा

किल्ल्याच्या पायऱ्या चढून धनाजी जाधव वर आला…. पोटचा गोळा धारतीर्थी पडला आहे याची खबर रात्रीच कळली होती त्याला… संताजी घोरपडे रात्रभर त्याचा डोक आपल्या मांडीवर घेऊन बसले होते.. आपल्या जिवलग मित्र धनाजीच पोर ते…. कोवळ्या वयात चंदनवन च्या लढाईत मारल गेल… दोघांची मैत्री अशी कि धनाजीला जेव्हा मुलगा झाला तव्हा त्याने आपल्या जिवलग मित्रच नाव त्याला दिल ‘संताजी’ संताजी जाधव जसा मोठा झाला तसा त्याने त्याला युद्ध शिक्षणासाठी संताजीच्या ताफ्यात सामील केला..संताजी घोरपडेंच्या तालीमीत तयार झालेला संताजी जाधव… वाघाचे संस्कार असलेला ते पोर मागे हटेल का ? चंदनवनच्या लढाईत अभिमन्यू बनून लढला… शत्रूने घेरले.. मरण पत्करले पण मागे हटला नाही…
समोर धनाजीला पाहताच संताजीने कलेवरचे शीर जमिनीवर ठेवून धनाजीला जाऊन मिठी मारली… अजून पर्यंत थांबवून धरलेले अश्रू मोकळे झाले नव्हते . खूप मोठ्या मुश्किलीने अडवून धरले होते..सरदार रडला.. तुटला तर सेनेचे मनोबल कमी होत.. म्हणून अजून अश्रू बाहेर पडले नव्हते.. त्याच्यावर पक्का बांध संताजीने घातला होता..
“नाय वाचवू शकलो तुझ्या पोराला.सर्वात मोठा अभागी हाय र मी …..” संताजी असे म्हणताच धनाजीने मिठी सोडवत म्हणाला ” मराठ्याच पोर हाय ते … युद्धात मारणार किंवा मरणार.. फक्त मला एवढ बघायचं हाय वार लढताना पोराच्या छातीवर झाल हायत कि पळताना पाठीवर…” संताजीने पुन्हा एकदा धनाजीला कडकडून मिठीत घेतल… “क्षत्रियाच पोर ते.. वार छातीवरच झेलणार…” आता मात्र संताजीच्या अश्रूचा बांध फुटला…
-संदर्भ कादंबरी #संताजी लेखक- #काका_विधाते
शब्दांकन –

9) अहमदशहा अब्दाली- भारताची लूट करणारे ९ क्रूर विदेशी शासक

अहमदशहा अब्दाली ला अहमदशहा दुर्रानी असे सुद्धा म्हटले जाते. १७४७ मध्ये नादिरशहा च्या मृत्यू नंतर तो अफघानिस्थानचा शासक बनला. आपल्या पित्याप्रमाणे त्याने भारतावर ई.स. १७४८ ते १७५८ दरम्यान अनेक वेळा आक्रमणे करुन लूटपाट आणि नरसंहार केला. आणि अगणीत संपत्ती ओढून नेली.

सन १७५७ च्या जानेवारी मध्ये तो दिल्लीवर आला. साधारण एक महिना तो दिल्लीमध्ये थांबून होता येईल तेवढी लूट करुन घेतली. दिल्ली लुटून झाल्यावर त्याचे लालूच वाढले आणि त्याने आग्र्यावर आक्रमण केले त्याच्यानंतर वल्लभगड वर आक्रमण केले वल्लभगड मध्ये जाट लोकांना त्याने हरवले आणि आसपासचा भाग लुटून फस्त केला.
त्याच्यानंतर अहमदशहा ने आपल्या पठान सैनिकांना मथुरा लुटण्यासाठी आणि हिंदुंच्या पवित्र मंदिरे तोडण्यासोबतच हिंदुंचा व्यापक प्रमाणावर नरसंहार करण्याचा आदेश दिला. त्याने आपल्या सैनिकांना सांगितले होते की एका हिंदुच्या कापलेल्या मुंडक्याच्या बदल्यात ठराविक उपहार देण्यात येईल. अब्दालीने मथुरामध्ये केलेला हा नरसंहाज प्रसिद्ध आहे , जो आज सुद्धा विस्तृत स्वरुपात मथुराच्या इतिहासामध्ये आपल्याला वाचायला मिळतो.

[लेखमाला समाप्त ]

8) नादिरशहा – भारताची लूट करणारे ९ क्रूर विदेशी शासक

नादिरशहा चे पुर्ण नाव नादीर कोली बेग होते. हा मुळचा ईराण मधला शासक, याने भारतात येवून अनेक प्रकारे लूटालुट आणि कत्लेआम माजवला होता. दिल्लीच्या तख्तावर विराजमान तत्कालीन मुघल बादशहा मुहम्मदशहा याला पराजीत करुन त्याने तिथली लूट केली, ज्यामध्ये प्रसिद्ध कोहिनूर हिरा सामिल होता.

मुघल बादशहा मुहम्मदशहा आणि नादिरशहा यांच्यामध्ये करनाल मध्ये १७३९ मध्ये युद्ध झाले. काबुल वर वर्चस्व प्रस्थापित करुन त्याने दिल्लिवर आक्रमण केले. यामध्ये नादिरशहाचे सैन्य लहान असुन सुद्धा आपल्या दारुगोळ्याच्या आधारावर नादिरशहाचे फारसी सैन्य विजयी झाले.

झालेली हार पचवून सुल्तान मुहम्मद शहाने साधारण १७३९ मध्ये पुन्हा दिल्लीमध्ये जावून नादिरशहाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवून दिली. त्यामुळे दिल्लीमध्ये गोधळ माजला गेला. त्याचा फायदा घेवून नादिरशहाचे फारसी सैन्याची कत्तल चालू झाली. नादिरशाहाला जेव्हा हे समजले तेव्हा याचा बदला घेण्यासाठी त्याने इराणहून पुन्हा दिल्लीवर आक्रमण केले, यादरम्याण त्याने दिल्लीमध्ये भयंकर नरसंहार आणि लूटपाट केली याच्यामध्ये हजारांच्या संख्येत स्त्रि, पुरुष आणि अबालवृद्ध मारले गेले. यामध्ये मुहम्मद ने तलवार खाली ठेवून सिंधू नदीच्या पश्चिम भागाची सगळी जमिण नादिरशहाला दान दिली. सोबत हिरे जवाहरात यांची पोतीच्या पोती इराणला रवाणा झाली ज्यात कोहिनूर सामील होता.