7) औरंगजेब – भारताची लूट करणारे ९ क्रूर विदेशी शासक

भारतामधील सर्व मुघल शासकांपैकी सर्वात क्रुर म्हणुन औरंगजेब कुख्यात आहे तसेच हिंदुस्तान मधिल सर्वात क्रुर शासक म्हणुन औरंगजेब प्रसिद्ध आहे. त्याने तख्तासाठी आपल्या पित्याला कैद केले, आपल्या सक्ख्या भावा आणि त्यांच्या मुलांची क्रुरपणे हत्या केली, गुरू तेग-बहादूर यांचे सर छाटले. गुरू गोविंद सिंग याच्या लहान मुलांना जिवंत भिंतीमध्ये चुनवले. त्याने शेकडो मंदीरे तोडली. आपल्या प्रजेवर मरणप्राह्य अत्याच्यार केले आणि आपल्या शासनामधील गैर-इस्लामी जनतेवर भरमसाठ कर लादून जगणे मुश्लिक केले जेणेकरुन त्यांनी इस्लाम धर्म स्विकारावा परिणामत: बहुतांशी हिंदुंना एक तर इस्लाम स्विकारावा लागला , किंवा त्यांना त्यांचा प्रदेश सोडून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मधील गावांमध्ये शरण जावे लागले.

उत्तर प्रदेश मधील प्रसिद्ध इतिहासकार राधाकृष्ण बुंदेली यांच्या नुसार, औरंगजेबाने आपले सैन्य इ.स. १६६९ मध्ये आपल्या एका हुकुमानुसार हिंदुंची सर्व मंदिरे नष्ट करण्याचा आदेश दिला. या हुकुमानुसार सोमनाथ मंदीर, वाराणसीचे मंदिर, मथुरा चे केशव राय मंदिर याचसोमत अनेक हिंदू देवदेवतांची प्रसिद्ध मंदिरे तोडण्यात आली.

औरंगजेबाने हिंदु उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करण्यावर बंदी आणली होती. औरंगजेबाचे दार-उल-हरब ( म्हणजे काफरांचा देश ) चे रुपांतर दा-उल-ईस्लाम (ईस्लाम चा देश) मध्ये करणे हे आपले महत्वपुर्ण लक्ष होते. १६६९ मध्ये औरंगजेबाने बनारस मधील विश्वनाथ मंदीर आणि मथुरा मधील मंदीर तोडले.

शिव_दिनविशेष : ३० एप्रिल

३० एप्रिल १६५७: शिवाजीराजांचा जुन्नरवर हल्ला

२३ एप्रिलच्या पोस्टमधे मी शिवाजीराजांनी शहजादा औरंगजेबाला केलेल्या अर्जाचा आणि त्यानंतर त्याने शिवाजीराजांना पाठवलेल्या एका क्रुपादर्शक पत्राचा उल्लेख केला होता. त्या पत्रानुसार औरंगजेबाने शिवाजीराजांच्या ताब्यात असलेल्या मुलुखाला मुघलांकडुन मान्यता दिली होती.
या पत्रावरून कदाचित असा समज होईल की, शिवाजीराजे मुघलांचे मांडलिक होतात की काय. (औरंगजेबाचाही तसाच समज झाला होता)
मात्र त्या पत्रानंतर केवळ सातच दिवसांनी म्हणजे ३० एप्रिल १६५७ रोजी शिवाजीराजांनी अकस्मात मुघलांच्या ताब्यातील जुन्नरवर हल्ला केला. जुन्नरचा अधिकारी बेसावध होता.
वैशाख वद्य द्वादशीच्या रात्री दोराच्या शिड्या लावून मावळे जुन्नरच्या परकोटातुन आत शिरले. पहारेकर्यांना मारून त्यांनी जुन्नर ठाणे लुटायला सुरुवात केली. या लुटीत महाराजांना २०० घोडे, ३ लक्ष नगदी होन, शिवाय कापड, जिन्नस व जडजवाहीर वगैरे भरपूर माल मिळाला.
यावेळी औरंगजेब आदिलशहाच्या ताब्यातील कल्याणीचा किल्ला वेढण्यासाठी निघाला होता. त्याला वाटेतच ही बातमी समजल्यावर त्याने काही मुघल सेनानींना वाटेतुनच परस्पर जुन्नरकडे जाण्याचा आदेश दिला. मात्र ही कुमक तिथे पोहोचेपर्यंत महाराज निघुन गेले होते. नंतर त्यांनी ४ जुन रोजी मुघलांच्या ताब्यातील नगरवरही हल्ला चढवुन लुटालूट केली व तिथे युद्धही खेळले.
आता इथे एक प्रश्न निर्माण होतो की, १६५७ला स्वराज्य तितके मोठे नसताना, तेवढी ताकद नसताना, शिवाजीराजांनी अचानक मुघलांसारख्या बलाढ्य शत्रूवर स्वतः हुनच हल्ला करून का ललकारले?? ऐतिहासिक साधनांतुन याचे ठोस उत्तर मिळत नाही. श्री देशमुखांनी याची थोडीफार चिकित्सा केली आहे मात्र, याबाबतीत मला श्री मेहेंदळे यांनी त्याच्या पुस्तकात मांडलेला वस्तुनिष्ठ अंदाज पटला. ते म्हणतात, या जुन्नर लुटीनंतर काही दिवसांनी मुघल-आदिलशहा यांच्यात तह झाला होता. शिवाजीराजांना या तहाची बातमी हेरखात्याकडुन कळाली असावी त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले. कारण, एकदा का तह झाला की, शिवाजीराजांनी जे किल्ले आदिलशहाकडुन जिंकले होते व जे १६३६ च्या मुघल आदिलशहा तहानुसार वस्तुतः मुघलांकडे असायला हवे होते ते मुघलांनी आदिलशहाकडून परत घेतले असते किंवा संयुक्तपणे स्वराज्यावर मोहीम काढली असती.
या परिस्थितीत स्वराज्य नक्कीच संकटात येऊन शिवाजीराजांना या प्रबळ सत्तांपुढे झुकावे लागले असते. तेव्हा नंतर जी परिस्थिती येणार आहे तिला तोंड द्यायचेच आहे तर आत्ताच मुघलांचा मुलख जितका मारता येईल तितका मारावा.

अर्थात हा झाला वस्तुनिष्ठ अंदाज. याचे नेमके कारण कळत नाही. पण एक मात्र नक्की की, त्या वर्षी शिवाजीराजांनी मराठी अकलेचा अस्सल नमुना मुघलांना दाखवून दिला. शरण आलो आहे असे दाखवून औरंगजेबाला हूल दिली, त्याला मधाचे बोट लावले व काही दिवसांतच मुघलांचाच मुलुख मारला. लवकरच एक असे निमित्त झाले की, त्यामुळे औरंगजेब दिल्लीला परत जायच्या तयारीला लागला (सप्टेंबर १६५७) त्यामुळे स्वराज्यावरचे संकट टळले. इथे मात्र शिवाजीराजांचा हात नव्हता, तो नियतीचा खेळ होता.

इतिहासात फारसा प्रसिद्ध नसणारा परंतू, शिवाजीराजांची मुत्सद्देगिरी दाखवुन देणारा हा प्रसंग.

संदर्भ: शककर्ते शिवराय, श्री राजा शिवछत्रपती

:- सारंग

6) बाबर – भारताची लूट करणारे ९ क्रूर विदेशी शासक

मुघलवंशाचा संस्थापक बाबर हा एक लुटारू होता. त्याने उत्तर भारतामध्ये कित्तेक लूट केली. मध्य आशिया मधील समरकंद राज्याची खुप लहान असलेली जहागीरदारी ’फरगना’ मध्ये इ.स. १४८३ मध्ये बाबर चा जन्म झाला.

बाबर ने तुर्की भाषा शिकून ’तुझुक ई बाबरी’ लिहिले ज्याला इतिहासामध्ये बाबरनामा या नावानी सुद्धा ओळखले जाते. बाबर ची टक्कर दिल्लीचा शासक इब्राहीम लोदी याच्याशी झाली. आणि बाबर च्या जिवनातील सर्वात मोठी टक्कर मेवाड चे राजा राणा रांगा यांच्याशी झाली. बाबरनामा मध्ये याचे विस्तृत वर्णन आहे. या संघर्षामध्ये त्याला १९२७ मध्ये खन्वाह च्या युद्धामध्ये यश मिळाले.

बाबरने आपल्या विजय पत्रामध्ये स्वत:ला अनेक मुर्त्यांचा विध्वंस करणारा असे संबोधले आहे. या भयंकर संघर्षानंतर बाबरने इस्लाम मध्ये पवित्र माणली जात असलेली ’गाजी’ ही पदवी प्राप्त केली. गाजी तो आहे जो काफीरांचा कत्लेआम करतो. बाबर ने अमानुश पद्धतीने आणि क्रुरतापुर्वक केवळ हिंदुंचा नरसंहारच नाही केला, तथापी अनेक मंदिरे नष्ट केली. बाबर च्या आज्ञेवरून मीर बाकी याने अयोध्यामध्ये राम जन्मभूमी वरील रामाचे मंदीर जनिनदोस्त करुन त्याठीकाणी मस्जिद उभारली. त्याचप्रमाणे ग्वालियर च्या जवळील उरवा मधील अनेक जैन मंदीरे त्याने पाडली. ग्त्याने चंदेरी मधील प्राचिन ऐतिहासी मंदिरे नष्ट केली, आजसुद्धा ही जागा संपूर्ण खंडर आहे.

शिव_दिनविशेष : २९ एप्रिल

२९ एप्रिल इ.स.१६६१
छत्रपती शिवरायांनी शृंगारपूर जिंकले व तेथील सुर्व्यांची गादी लाथेने उडवली. शिवरायांनी फेब्रुवारी १६६१ ते मे १६६१ मध्ये ४ महीन्यांची महत्वाची मोहीम काढली होती, त्यात त्यांनी शृंगारपूर २९ एप्रिलला घेतले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

5) तैमुरलंग- भारताची लूट करणारे ९ क्रूर विदेशी शासक

तैमुरलंगची आपण चंगेज खान प्रमाणे शासक व्हावे अशी मनिशा होती. इ.स. १३६९ मध्ये तैमुरलंग हा समरकंद चा शासक बनला, आणि तेव्हापासुन त्याची विजयी आणि क्रुर यात्रा चालू झाली. मध्य आशिया मध्ये दरम्यान मंगोल लोक मुसलमान बनले होते आणि तैमूर स्वत: मुसलमान होता.

क्रुरतेच्या बाबतीत तो चंगेज खानचा आदर्श समोर ठेवत होता. सांगीतले जाते की एके ठिकाणी त्याने दोन हजार जिवंत लोकांना एक मिनार बनवून त्यावर विटा आणि चुन्यांच्या आधारे चिनले होते.

जेव्हा तैमूर ने भारतावर आक्रमण केले त्या वेळी उत्तर भारतावर तुघलक वंशाचा राजा होता. १३९९ मध्ये तैमूरच्या दिल्लीवरील आक्रमनासोबत तुघलक साम्राज्याचा अंत झाला. तैमूर मंगोलांची फौज घेवून आला तेव्हा त्याच्या विरोधात म्हणावा तसा मुकाबला झाला नाही आणि त्याने त्या ठिकाणी कत्लेआम आणि लूटपाट करत पुढे निघाला.

तैमूरच्या आक्रमणावेळी हिंदू नी जौहार ची राजपूती पद्धत आचरणात आणली गेली होती. दिल्लीमध्ये तैमूर १५ दिवस राहीला आणि त्याने या मोठ्या शहराचे रुपांतर खाटीकखान्यात केले. नंतर तो तसाच कश्मिर लुटत पुढे समरकंद या त्याच्या ठीकाणी परत पोहोचला. तैमूर गेल्यावर दिल्लीला ’मुडद्यांचे शहर’ म्हणून पुढे कित्तेक वर्षे संबोधले जात होते.

शिव_दिनविशेष : २८ एप्रिल

२८ एप्रिल इ.स.१६६१
छत्रपती श्री शिवरायांनी कोकणातील, आताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील “ प्रचीतगड उर्फ उचीतगड ” जिंकले.
⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
२८ एप्रिल इ.स.१७३१
मराठ्यांनी बेलापूर किल्ल्याजवळ साहसी लढाई केली तेव्हा घनघोर लढाई झाली होती.
३१ मार्च १७३१ रोजी झालेल्या या लढाईत पेशव्यांनी चिवट पोर्तुगीजांना होणारा पाणीपुरवठा व रसद पुरवठा बंद केल्यामुळे मराठ्यांपुढे हतबल झालेला पोर्तुगीज किल्लेदार आज २८ एप्रिल १७३१ रोजी कुटुंबासहीत गलबतात बसून पळून गेला व मराठ्यांनी किल्ल्यावर भगवा फडकावला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

4) चंगेज खान- भारताची लूट करणारे ९ क्रूर विदेशी शासक

(मंगोलीयन नाव चिंगिस खान ) चंगेज खान या शासकाने भारतातील मुस्लिम साम्राज्य जवळ जवळ नष्ट करुन टाकले होते, तो एक बौद्ध धर्मीय मंगोल वंशी शासक होता. चंगेज खान हा आपल्या संगठन शक्ती, कृरता आणि साम्राज्य विस्ताराबद्दल अजुनही प्रसिद्ध कुख्यात योद्ध्यांच्या यादीत येतो. भारता सोबत संपूर्ण रशिया, आशिया आणि अरब देश चंगेज खानाचे नाव ऐकले की कापत होते.

चंगेज खान चा जन्म ११६२ च्या सुमारास आधुनिक मंगोलिया च्या उत्तर भागामध्ये ओनोद नदीच्या भागात झाला. त्याचे मुळ नाव तेमुजिन होते.
चंगेज खान ने अभियान चालवून ईरान, गजनी सहीत पश्चिम भारताच्या काबुल, कन्धार, पेशावर सहित त्याने कश्मिर वर सुद्धा वर्चस्व स्थापन केले. याचवेळी चंगेज खान ने सिंधू नदी पार करुन उत्तर भारत आणि आसाम मार्गे मंगोलिया परत जायचे असा मनाचा कायस केला परंतु तसे होऊ शकले नाही त्यामुळे उत्तर भारत संभविय लुटालूटीपासुन वाचले होते.

एका नविन संशोधनानुसार या क्रुर मंगोल योद्ध्याने आपल्या आक्रमणांमध्ये अशी काही लूटपाट आणि कत्तली केल्या की आशिया मध्ये चीन, अफगानिस्थान सहित उजबेकिस्तान, तिब्बत आणि बर्मा इत्यादी देशांमधील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या साफ झाली होती. मुसलमानांसाठी चंगेज खान आणि त्याचा साथी हलाकू खान म्हणजी ’अल्लाह का कहर’ होता.

शिव_दिनविशेष : २७ एप्रिल

२७ एप्रिल इ.स.१६६६
घाटमाथा व कोकण यांच्या मध्यभागी उभा असलेला विजापूरकरांचा खेळणा उर्फ विशालगड स्वराज्यात दाखल करण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना सुचना दिल्या. त्याप्रमाणे भारंभार माळा लावून खेळणागड स्वराज्यात दाखल केला. मावळ्यांनी बहु पराक्रम केला.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

3) मुहम्मद घोरी- भारताची लूट करणारे ९ क्रूर विदेशी शासक

मुहम्मद कासीम नंतर महमूद गजनवी आणि त्याच्यानंतर मुहम्मद घोरी याने भारतावर आक्रमण करुन अंधाधुंद कत्लेआम आणि लूटपाट चालवली. मुहम्मद घोरी चे पुर्ण नाव शिहाबुद्धीन उर्फ मुईजुद्दीन मुहम्मद घोरी असे होते, भारतामध्ये तुर्की साम्राज्य स्थापण करण्याचे श्रेय यालाच जाते.

घोरीने पहीले आक्रमण ११७५ मध्ये मुल्तान वर केले, दुसरे आक्रमण ११७८ मध्ये गुजरातवर आणि त्याच्यानंतर ११७९-८६ दरम्यान पंजाब प्रांतावर आपले वर्चस्व स्थापीत केले. पुढे ११७९ मध्ये पेशावर व ११८५ मध्ये सियालकोट आपल्या कब्ज्यामध्ये घेतले. ई.स. ११९१ मध्ये मुहम्मद घोरी चे युद्ध पृथ्विराज चौहान याच्याशी झाले, या युद्धामध्ये मुहम्मद घोरी ला वाईट पद्धतीने पराजयाला सामोरे जावे लागले. या युद्धामध्ये मुहम्मद घोरी ला कैदी बनवून पृथ्विराज चौहान समोर आनले गेले परंतु पृथ्विराज ने त्याला सोडून दिले. हे युद्ध तराईन चे पहिले युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे.

याच्यानंतर घोरीने आपली ताकत वाढवून १९२ ला मोठ्या ताकतीनी पृथ्विराज वर आक्रमण करुन पराजीत केले हे तिराईन चे दुसरे युद्ध.