अथ राजव्यवहारकोश:

महाराष्ट्रातील पूर्वीच्या ३०० वर्षे नांदलेल्या राजवटीमुळे फारसी व दक्षिणी उर्दू या दोन्ही भाषांना राजभाषांचे स्वरूप प्राप्त झाले होते. म्हणून राजव्यवहारामध्ये प्राचुर्याने आढळून येणारे फारसी व दख्खनी उर्दूतील शब्द यांच्या ऐवजी संस्कृत पर्याय वापरून राजव्यवहाराचे मराठीकरण करण्याची योजना शिवप्रभूंनी आखली. अशा प्रकारचा एक कोश तयार करण्याचे काम त्यांनी प्रसिध्द मतुसद्दी व प्रशासक रघुनाथ नारायण हणमंते यांजकडे सोपवली. त्याने धुण्डिराज व्यास या विद्वानाच्या सहाय्याने राजकोश सिध्द केला ही घटना इ.स. १६७८ ची असावी.
आजही मराठीत रूढ करण्यात येत असलेले काही शब्द राजव्यवहारकोशात आढळतात हे पाहून मोठी गंमत वाटते. सचिव, मंत्री, सभासद, न्यायाधीश, दुर्ग, कोशागार, शस्त्रगार, चषक, आदाय, सभा, लेखा, आय-व्यय, वेतन, ऋण, प्रतिभू(जमीन), कारागृह, आयपत्र, सहकारी, अनक्रमाणीका, संवाद, गणना – तीनशे वर्षानंतर सुध्दा हा कोश आजही उपयुक्त ठरू पाहत आहे. हे लक्षणीय आहे. या कोशातील एक शब्द मन वेधून घेणारा आहे. राजदरबारातील खलबतखान्याला त्या काळात गुसलखाना म्हणत. आग्र्यातील दिवाण ई खास ला बरेच वर्षे गुसलखाना हेच नाव होते. याला पर्याय रघुनाथ नारायणाने मन्त्रस्थानं असा दिला आहे. आज ३०० वर्षांनी, मुंबईच्या सेक्रेटेरिएटला मंत्रालय हे नाव मिळालेले पाहून, शिवाजी महाराज व रघुनाथ नारायण हणमंते यांच्या आत्म्यास अगदि संतोष झाला असेल.

– सेतुमाधवराव पगडी
१०-०६-८१

संदर्भ :- राजकोश
संपादक :- अ.द. मराठे

झोपलेले सरकार आणि कपाळकरंटे पुरातत्व खाते !

* औरंगजेबाच्या बायकोची समाधी सरकारला शिवरायांच्या समाधीपेक्षा जास्त महत्वाची
* छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रोज अंधारात (चंद्रप्रकाश होता म्हणून रात्रीच्या वेळी समाधीचा फोटो निघू शकला ) तर रबिया दुराणी म्हणजे औरंगजेबाच्या बायकोची समाधी फ्ल्याशलाईटस आणि प्रकाशयोजनांनी रोज रात्री झळाळून उठते.

* समाधीचे हे छायाचित्र ३ एप्रिल २०१५, म्हणजे शिवपुण्यतिथी दिवशीचे आहे,त्या दिवशीसुद्धा समाधी अंधारात होती, किती हे दुर्दैव !

* छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या रिस्टोरेशन ची फक्त २-३ वेळा कामे केली गेली ते सुद्धा एकदा समाधीवर वीज पडली म्हणून काम केले गेले.

* याउलट औरंगाबाद येथील रबिया दुराणीच्या बीबी का मकबरा वर तब्बल ४४ वेळा रिस्टोरेशन ची कामे केली गेली.

* छत्रपती शिवरायांच्या समाधीवर नगण्य खर्च,प्रकाशयोजना नाही,दिवाबत्ती ची सोय नाही.

* रबिया दुराणीच्या समाधीची काळजी स्वतःची बायको असल्यासारखे पुरातत्व खाते घेते.आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च केला गेला.

* राष्ट्रपुरुषाच्या समाधीसमोर दिवाबत्तीची सुविधा करणे हा प्रोटोकॉल आहे जो आपल्या सरकारने आणि झोपलेल्या पुरातत्व खात्याने पाळला नाही परंतु इंग्रजांनी पाळला होता.
-१९८५ साली सर रिचर्ड टेम्पल, कमिशनर क्रोफर्ड,कप्तान पिट रायगड ला जाऊन आले, छत्रपती शिवरायांच्या समाधीची दुरवस्था पाहून त्यांना फार खेद झाला.समाधीच्या दुरुस्ती संदर्भात त्यांनी सूचना अधिकार्यांना दिल्या तसेच कुलाब्याच्या कमिशनर ला पत्र लिहिले.

लॉर्ड रे यांच्या शिफारसीनंतर १८८७ साली समाधीला रोज तुपाचा दिवा,पूजासाहित्य,दरमहा नैवैद्य,१ नोकर यासाठी मंजुरी मिळाली.

* औरंगजेबाविरुध्द लढून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची समाधी दुर्लक्षित आणि औरंगजेबाच्या बायकोच्या समाधीला VIP ट्रीटमेंट, असा हा अजब न्याय पुरातत्व खात्याचा.

* सर्वांना विनंती आहे हि माहिती जास्तिस्त जास्त लोकांपर्यंत पोचविण्यास मदत करावी,जेणेकरून सरकार रायगड किल्ला केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या अख्यत्यारीत आणण्यासाठी झटपट पावले उचलेल .

* यासंदर्भातले सर्व पुरावे उपलब्ध आहेत,ज्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांनी आपला email कळवावा त्यांना सर्व माहिती पोचविली जाईल.

* शिवरायांच्या बद्दल जितका आदर इंग्रजांनी दाखवला तितकासुद्धा आदर आपल्या सरकारला नाही याहून मोठे दुर्दैव नाही.