…मी सांगतो त्यांना अटक करा।

मी सांगतो त्यांना अटक करा। मी सांगतो त्यांना शिक्षा करा। मला पंतप्रधान पद मान्य नाही। मला मुख्यमंत्री पद मान्य नाही हे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे पाहिलं, ऐकलं आणि मी मनोमन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागितली। आदरणीय बाबासाहेबांनी अखंड मानव जातीला जो मार्ग दाखवला आणि मानव जातीचं कल्याण स्मरलं। आज आंबेडकर घराण्याचा वारसा सांगणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी छातीवर हात ठेवून बाबासाहेबांना स्मरावं. “आज मी जे काही करतोय ते खरंच बरोबर करतोय का! मी समाजाला पेटवण्याचं महापाप तर नाही न? केवळ एकविरोधी दुसरा उभा करण्यासाठी मी दलितांना भंडावून सोडतोय का?” याचं आत्मपरीक्षण करणं आजची गरज आहे.

विदर्भासारख्या भागात हजारो दलितांच्या हत्या करणाऱ्या नक्षलवादी टोळीला समर्थन करणारे प्रकाश आंबेडकर म्हणजे समस्त दलित बांधव नाही. आंबेडकर आडनाव काढलं तर किती टाळकी जमतील याचाही विचार महाशयांनी करावा. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेली माणसं कोणत्याही विषयावर भीडत नाहीत। “शिका, संघटित व्हा अन संघर्ष करा” असा उपदेश देणाऱ्या आंबेडकरांना प्रकाश आंबेडकर विसरले अन थेट नक्षलवादी चळवळीला जाऊन मिळाले. यापूर्वीही नक्षलवादी हे देशाचे मित्र असा जावईशोध यांनीच लावला होता. एका बौद्ध संमेलनात तर जाहीर कबुली दिली होती की “होय, मी आहे नक्षलवादी. काय करायचं ते करा”।

समाजाला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा मिळवून देता देता विकासाच्या उंचीवर समाजाला अजून तुम्ही आम्ही घेऊन जाऊ शकलो नाही. भीमा कोरेगाव घटना घडली. त्या ठिकाणी जे कारस्थान रचले त्यातही या प्रकाश आंबेडकरांचा सक्रिय सहभाग आहे हे मी ठाम अजूनही सांगतोय. यापूर्वीही सांगितलं आहेच. एल्गार सभाच त्या दंगलीचे केंद्र आहे हेही माझं ठाम मत आहे. जी माणसं त्याच्या आजूबाजूलाही गेली नाहीत त्यांनाच अटक करा हे या संविधानाचा अपमान नाही का वाटत? मी ज्यांना सांगतो त्यांना अटक करा याचा अर्थ या महाराष्ट्रात काही मोगलाई आहे ही हुकुमशाही ? अटक नाही झाली तर मुंबईचे जनजीवन विस्कळीत करू, महाराष्ट्र धगधगत ठेऊ, मोर्चा काढू, आंदोलन करू, पुतळा जाळु हे आता कुठंतरी आंबेडकर आडनाव लावणाऱ्या अन आंबेडकरांचे नातू म्हणवून घेणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी थांबवलं पाहिजे. जातीयवादी चळवळीच्या आडोशाने राजकारणाचा अध्याय गिरवत असाल तर ते कदापि शक्य होणार नाही, कारण जो रस्ता निवडला आहे तो रस्ता त्या दिशेला जातच नाही.

हिंदू अन ब्राम्हण याचा पराकोटीचा द्वेष अन त्यातून समाजाला पेटवून राजकारण करण्याची वृत्ती आगामी काळात काही हीत साधेल असं कदापि वाटत नाही. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. पण आम्ही सांगतो त्यांनाच झाली पाहिजे अशा वलग्ना करणे म्हणजे हास्यास्पद आहे. भिडे गुरुजी यांना अटक करा म्हणून मोर्चा काढला अन भाषण काय तर मला सर्वोच्च पदे मान्य नाहीत. पद ही काही घरणेशाहीने आलेली जहागिरी नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या संविधानानुसार अन लोकशाहीने निवडून दिलेली पदं आहेत. कालच्या वक्तव्याचा अर्थ म्हणजे प्रकाश आंबेडकरांना संविधान मान्य आहे का असा सवाल माझ्या मनात सातत्याने येतो आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान बोलताना गुरुवर्य भिडे गुरुजींच्या बाबतीत एकही पुरावा नसल्याचं सांगितलं. मुळात उच्च प्रतीचं राजकारण करण्याच्या हेतूने प्रकाश आंबेडकरांनी भिडे गुरुजींचं नाव गोवलं होतं मात्र पुढे त्याचं हसं झालं. योद्धा संन्यासी जीवन जगणाऱ्या भिडे गुरुजींना अटक करा म्हणत थैमान घालणं सोप्पं असतं. पण भिडे गुरुजींच्या त्यागाच्या एक टक्का तरी कार्य उभं करता आलं तर प्रकाश आंबेडकर समस्त जनतेचे नेते होतील! मात्र भंपक राजकारण करताना जर काळाची तमा नाही बाळगली तर येणारा काळच उत्तर देईल हा विश्वास आहे. कारण आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत अन शिवरायांच्या स्वराज्याचे मावळे…..

#पटलं तर शेअर करा

© विकास विठोबा वाघमारे
VWaghamare0@gmail.com

३१ मार्च १६६५: पुरंदर किल्ला मुघल सैन्याने वेढला

शिवाजीराजांनी लहान वयातच स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करायला सुरूवात केली. सुरुवातीची बरीच वर्षे त्यांच्या ताब्यात जास्त करून आदिलशाहीचेच किल्ले आले. १६५७ साली त्यांचा प्रथमच मुघलांशी थेट संबंध आला कारण त्यांनी मुघलांच्या ताब्यातील सधन शहर जुन्नर लुटले. तसेच, १६३६च्या मुघल-आदिलशहा तहानुसार जे किल्ले मुघलांकडे असायला हवेत त्यातले बरेचसे शिवाजीराजांनी जिंकून घेतले होते.
पुढे १६६३ मधे शाहिस्तेखानावर हल्ला, १६६४मधे सुरतेची लुट, जसवंतसिंगाची फजिती या कारणांमुळे औरंगजेब चिडुन गेला व सप्टेंबर १६६४ मधे त्याने मिर्झाराजा जयसिंग या महापराक्रमी, मुत्सद्दी रजपुत मुघल मनसबदाराची स्वराज्यावरच्या मोहिमेवर नियुक्ती केली.
भलीमोठी फौज, तोफखाना तसेच, सरकारी व खाजगी खजिना बरोबर घेऊन मिर्झाराजा स्वराज्याकडे निघाला. सोबत दिलेरखान हा पराक्रमी मुघल मनसबदार व इतरही नावाजलेले मनसबदार होते. १० फेब्रुवारी रोजी हे मुघल सैन्य औरंगाबादला पोहोचले. ३ मार्चला पुण्याला पोचले आणि १५ मार्चला सासवडला छावणी करण्याच्या उद्देशाने त्या दिशेने निघाले.
३० मार्चला हे सैन्य सासवडजवळ पोहोचले. आघाडीवर दिलेरखान होता. अचानक पुरंदर गडावरून उतरून मराठ्यांनी मुघल सैन्यावर हल्ला केला. दिलेरने कसेबसे या सैन्याला मागे रेटत गेला आणि थेट पुरंदर पायथ्याशी पोचला आणि ३१ मार्चला त्याच्याच सांगण्यावरून जयसिंगाने तिथे आणखीन सैन्य पाठवले व अशा तर्हेने पुरंदरचा वेढा सुरु झाला.
पुरंदरवर मराठे सैन्य केवळ २००० होते. मराठ्यांचे नेतृत्व करत होते मुरारबाजी देशपांडे.
मुघलांनी वेढा घट्ट आवळला. किल्ल्याच्या समोरून दिलेरखानाचे पुतणे मुजफ्फर व गैरत त्यांच्या पठाणी सैन्यासह तर, उदेभान व हरिभान हे राजपुत, तोफखान्यावर आतिशखान व तुर्कताजखान हे होते.
किल्ल्याच्या पिछाडीकडुन दाऊदखान, रायसिंग राठोड, सय्यिद झैनुल, आबिदीन बुखारी, हुसेन दाऊदझई, शेरसिंह राठोड, राजसिंग कुंवर, रसूलबेग रोझभानी हे सर्व होते.

मुघलांनी किल्ला जिंकण्याची शिकस्त केली, वज्रगडावर तोफा चढवून पुरंदरवर डागल्या परंतु, तब्बल अडीच महिने पुरंदर झुंजत राहिला. मुरारबाजींनी असामान्य शौर्य गाजवले व शेवटी ते नररत्न स्वराज्यासाठी खर्ची पडले. लढाई चालु असताना मुरारबाजींचा पराक्रम पाहुन स्वतः दिलेरखान चाट पडला. त्याची अंगुली आश्चर्याने तोंडात गेली आणि त्याने मुरारबाजींना कौल देऊन त्याच्या पक्षात येण्याचा प्रस्ताव दिला. मात्र स्वामिनिष्ठ मुरारबाजी त्याला म्हणाले ,”तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजीराजांचा शिपाई. तुझा कौल घेतो की काय?”
आणि ते दिलेरखानाशीच लढण्यास पुढे सरसावले. दिलेरने तीर-कमठा ताणला आणि मुरारबाजींना ‘तीर मारून पुरा केला’ वीर मुरारबाजी धारातीर्थी पडले.
बरेच मराठे सैन्यही मारले गेले. मुघल सैनिकही मारले गेले. मात्र, मराठे सैन्य संख्येने कमी असल्याने पुरंदरचे प्राण कंठाशी आले. शेवटी नाईलाजाने शिवाजीराजांनी मुघलांशी तहाची बोलणी लावली व पुरंदर खाली करून दिला. त्यानंतर पुरंदर किल्ल्याच्या परिसरातच, जयसिंगाच्या छावणीत शिवाजी राजांनी बोलणी करून मुघलांशी जो तह केला तोच इतिहासप्रसिद्ध ‘पुरंदरचा तह’ या पुरंदर प्रकरणामुळे शिवाजीराजांच्या जीवनात पुढचे साधारण दीड वर्षे बरच काही घडणार होत.

संदर्भ: शककर्ते शिवराय

:- सारंग

शिवदिनविशेष : ३१ मार्च इ.स.१६६०

1) याच दिवशी आपल्या युध्दनितीच्या बळावर छञपती शिवरायांनी विशालगड जिंकला.व स्वराज्यात दाखल करुन घेतला.

2) “मिर्झाराजे जयसिंग” व “दिलेरखान पठाण” किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी दाखल. त्यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला आणि ऐतिहासिक पुरंदरचा रणसंग्राम चालू झाला.

शिवाजी महाराजांची समाधी अंधारात

आज पुण्यश्लोक श्री शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी हजारो मेसेज,पोस्ट येतील आज ….इथे महारांच्या समाधीचा साधा जीर्णोद्धार आपण करू शकत नाही आणि महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न कधी पूर्ण करणार?????

 

कोंडाजी फर्जंद

अवघ्या साठ मावळ्यानिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा पराक्रमी वीर हा कोंडाजी होय.तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गड राजांनी कब्जात घेतले होते.पण दख्खनचा दरवाजा असलेला पन्हाळगड त्यांना ताब्यात मिळाला नव्हता.राजेंनी दि.६ जून १७७२ रोजी रायगडावर आपल्या सहकाऱ्यांना ही सल बोलून दाखविली.

यावेळी कोंडाजी फर्जंद,राजेंना बोलिला की गड म्या घेतो.त्याने अवघे तीनशे हशम(मावळे)राजेंकडे मागितले.अवघ्या तीनशे मावळ्यानिशी पन्हाळगड जिंकावयास निघालेल्या कोंडाजीचे राजेंनी कौतुक करून त्यास सोन्याचे कडे दिधले.कोंडाजीने कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरास आपला तळ टाकला.राजापुर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने(जंगली रस्त्याने)अंदाजे ८०-९० कि.मी होते.हेरगिरीने वेष पालटून गडावर जाऊन त्यांनी गडाची पूर्ण माहिती काढली.गडावर अंदाजे दोन हजार गनिम होते.बाबूखान हा अदिलशाही किल्लेदार होता.

फाल्गुन वद्य त्रयोदशी(दि.६ मार्च १६७३)रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन कोंडाजी गडाच्या जवळ पोहोचला.तीनशे मावळ्यापैकी त्यांनी निवडक साठ मावळे घेऊन गडावर हल्ला केला.तीन दरवाज्याजवळ असलेल्या कड्यावरून चढून त्यांनी गडावर प्रवेश केला.मध्यरात्री मराठे गडावर आल्यावर त्यांनी कापाकापीला सुरूवात केली.गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यात महाभयंकर युध्द जाहाले.अखेर कोंडाजीच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले.किल्लेदार पडल्यामुळे खानाच्या सैन्यात गोंधळ उडाला.ते पळून जाऊ लागले.पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला.अवघ्या साठ मावळ्यांनिशी गड ताब्यात घेणारा कोंडाजी खरोखरच वीर होता.

चैत्र पौर्णिमा छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी

समद्या स्वराज्यात हनुमान जन्मोत्सवाची धामधूम लय जोरात सुरू होती. पण त्या विधात्याच्या मनात येगळाच खेळ सुरू व्हता. भर दुपारच्या पहरी राजधानी रायगडाच्या दारावर मात्र काळं ढग जमा होऊ लागलं होतं. काहीतरी येडवाकडं घडण्याची चिन्ह दिसू लागली होती. माझ्या महाराजांना न्यायला तो आला होता. पण त्याच्याकडं कुणाचंच लक्षच नव्हतं, जो तो आपपल्या गोंधळात मग्न होता अन अचानक काळाने घाला घातला आणि महाराजांना घेऊन गेला. समस्त हिंदवी स्वराज्याला पोरकं करून गेला.
महाराजांचे अखेरचे शब्द – “आम्ही जातो आमचा काळ झाला.”
“सप्तनद्या, सप्तसिंधु मुक्त करा.”
“काशीचा विश्वेश्वर सोडवा.”
“आणि चुकुर होवू नका.” !!
शौर्य, धैर्य, पराक्रम, नितीमत्ता, प्रजाप्रेम, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले व गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवला मुक्त करणारे आणि ह्या भूतलावर सुवर्ण स्वराज्य स्थापन करणारे असे तुमचे आमचे नाही तर ह्या सकल त्रिलोकाचे पालनकर्ते, तारणहार, राजमान्य राजश्री, अखंड लक्ष्मीअलंकृत, महापराक्रमी, महाप्रतापी, महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज हे समस्त त्रिलोकाला पोरके करून अनंतात विलीन झाले. ज्यांच्या उपकारांची परतफेड आपणच काय तर आपल्या येणाऱ्या हजारो पिढ्या हि करू शकत नाही व आज हि ज्यांच्या जाज्वल्य स्मृती आपल्या सारख्या त्यांच्या लेकरांना ह्या अनंत अत्याचाराने व पापाने बरबटलेल्या कलियुगात जगण्याचे सामर्थ्य देतात अशा ह्या अलौकिक,अद्वितीय छत्रपती शिवाजी महाराजांस आमचे कोटी कोटी शिरसाष्टांग प्रणाम…

 

जात आली कुठून

 

भगवान श्री कृष्ण भगवद् गीतेत सांगतात,

चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्मविभागश: |
तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम ||

याचा अर्थ असा की, चार वर्णांची ( ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र ) समाजरचना मनुष्याचे स्वभावधर्म आणि तदनरुप त्यांची कर्मे यांना अनुसरून मी तयार केली आहे. मी तीचा कर्ता असूनही मीच अकर्ता व अविनाशी आहे !

जात म्हणजे तुमचे कर्म ( काम )
ज्यांना तलवार चालवता आली आणि राज्य करता आले ते #क्षत्रिय झाले.
ज्यांना तलवार चालवता आली नाही त्यांनी वेदांचा अभ्यास केला ते #ब्राह्मण झाले.
ज्यांना या दोन्ही गोष्टी जमल्या नाहीत त्यांनी हातात तराजू घेतला ते #वैश्य ( वाणी ) झाले.
ज्यांना यापैकी काहीच जमले नाही त्यांनी या तिघांकडे नोकरी केली ते #शुद्र झाले.

तुमच्या कर्माने ( कामामुळे ) तुम्हाला जात जोडली जाते. एखादा चांगले कपडे शिवतो त्याला #शिंपी म्हणतात मग तो जन्माने जरी शिंपी नसला तरी त्याला शिंपी ( सोप्या भाषेत #Tailor ) म्हणतात.

न्हावी, सुतार, चांभार, लोहार, परिट, सोनार, गवळी, कुंभार, महार, शिंपी ही सर्व #कामे आहेत. या कामामुळे त्या त्या कुटुंबाचे पोट भरते. यालाच पुर्वी बारा बलुतेदार म्हटले जायचे. या लोकांशिवाय गावगाडा चालत नसे ! गावात ही लोक असायचीच आणि त्यांची कामे ती कुठल्याही तक्रारी शिवाय करायची कारण पिढीजात कुटुंब व्यवसाय होता तो त्या परिवाराचा !

जात ( जातकुळी ) याचा साधा अर्थ आहे तुम्हाला कुठल काम येत.

आता भगवान श्री कृष्ण काय म्हणतात ते नीट समजून घेउ. ‘तुमच्या कर्मावरुन ( कार्यावरुन ) तुमचा वर्ण ( जात ) ठरते.’

वाल्या कोळी हा मुळचा दरोडेखोर पण त्याचाही महाकवी वाल्मिकी ( ब्राह्मण ) झाला ना ?
कारण वाल्याकोळीने अभ्यास करून ब्राह्मणत्व प्राप्त केले म्हणून त्याने रामायणासारखे महान काव्य लिहिलें ! म्हणजेच कार्यावरुन तुमची श्रेष्ठता ठरते, जन्म जातीवरून नाही !

शिवकालात तर हा भेदाभेद शिवछत्रपतींनी नाहीसाच केला होता असेच म्हणावे लागेल कारण अनेक ब्राह्मण हे हातात तलवारी घेउन लढाईत उतरलेले आपल्याला सापडतात. तर अनेक न्हावी, महार, रामोशी, लोहार, गवळी इ. मराठ्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढताना सापडतात. हे घडले ते फक्त शिवछत्रपतींमुळेच !

पण पुढे इंग्रजांना हिंदुस्थानातून आपण बाहेर काढेपर्यंत सर्व एकजुटीने लढले आणि इंग्रजांना विरोध केला. मात्र जेव्हा देश स्वतंत्र होत आहे असे दिसताच काही हिरव्या पिलावळींनी पाकिस्तानची मागणी केली तर काहींनी अचानकपणे आपल्या जातीचे वेगळेपण दाखविण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याच जातीच्या पुढाऱ्यांना १५० वर्षे इंग्रज राजवटीमधला अन्याय दिसला नाही पण त्याआधीचा पेशवेकाळ म्हणजेच २५० वर्षापूर्वीची रडगाणी काही लोक गाऊ लागली आणि ‘ आमच्या जातीवर अन्याय झाला होता ‘ असं म्हणत जातपात नसावी म्हणणाऱ्या लोकांनीच जातीवर आधारित कायदे तयार करून जे नष्ट करायला हवे होते तेच जातीच बीज आणखी खोलवर रुजवलं आणि आता बघता बघता त्याचा महावृक्ष झालाय ज्याला असंख्य अगणित फांद्या फुटून त्यांच्याही वेगवेगळ्या शाखा वाढू लागल्या आहेत !

जातीभेद नष्ट करा म्हणणाऱ्या थोरामोठ्यांनीच जातपात पोसली आणि कळतनकळत वाढवली सुध्दा ! आज जात म्हणजे आपले कर्म ( काम ) हेच काही जण विसरले आणि जात म्हणजे फक्त आरक्षणाचा मलिदा मिळवायच साधन करून ठेवले आहे !

आणखी सांगण्यासारख बरच काही आहे पण तुर्तास आज एवढेच सांगतो. ज्याला हे नीट समजून घ्यायच आहे तो ते समजून घेइल ज्याला हे समजूनच घ्यायच नाही तो यालाही फाटे फोडत बसेल !
इतिहासात कोळसाही आहे आणि चंदन सुद्धा… काय उगाळायच हे तुम्ही ठरवा !

*बळवंतराव दळवी*

स्वाती नखातेना कुणाल देशमुख यांचे प्रत्युत्तर

शिवदिनविशेष : ३० मार्च इ.स.१६४६

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी तत्कालिन रोहीड खोरे तील आणि आत्ताच्या भोर तालुक्यातील रायरेश्वर डोंगरावरील महादेव मंदीरात स्वराज्याची शपथ घेतली. १२ मावळ मधील रोहीड खोरे, हिरडस मावळ आणि वेळवंड खोरे तील काही निवडक मावळे व बालसवंगडी यावेळेस शिवरायांच्या सोबत होते.
आदिलशहास हि बातमी समजताच त्याने या संबंधित मावळ्यांना धमकीचे पत्र पाठवले. पण छत्रपती शिवरायांनी मावळ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वता पत्र पाठवले त्यात असा उल्लेख केला,
“हे स्वराज्य व्हावे हि तो श्रींची(सर्वांची) इच्छा !
आपण सुरू केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनुसार आहे.”