छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या चाफळ सनदेचे विवेचन

छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना दिलेल्या प्रसिद्ध चाफळ सनदेचे विवेचन – इतिहास अभ्यासक : श्री. कौस्तुभ कस्तुरे

शिवकाळ – काही समज – गैरसमज

शिवकाळ – काही समज – गैरसमज – श्री.गजानन भास्कर मेहेंदळे यांचे व्याख्यान . सदर व्याख्यान श्री. मेहेंदळे सरांनी पुण्यातील जंगली महाराज मंदिरात २०१५ साली आषाढी वारी दरम्यान दिले होते. हे व्याख्यान प्रत्यक्ष उपस्थितीत ध्वनीमुद्रित केले गेले असल्याने त्यातील आवाजाचा दर्जा व्यावसायिक नाही.

शिवनेरी गडावरून मुख्यमंत्र्याची केली हाकालपट्टी

शिवनेरी किल्ल्यावर आज जल्लोष होता. मात्र हा जल्लोष सुरु असताना शिवप्रेमींमधला सरकारविरोधातला असंतोष बाहेर पडल्याचं पहायला मिळालं. शिवप्रेमींनी घोषणाबाजी केल्यानं मंत्र्यांना चक्क पळ काढावा लागला. यासंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दरवर्षी शिवजयंती झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण होत असतं. यंदा मात्र मुख्यमंत्र्यांनी भाषण केलंच नाही. पाळणा जोजवला आणि मुख्यमंत्री निघून गेले. शिवनेरीवर होणाऱ्या गोंधळाची मुख्यमंत्र्यांना पूर्वकल्पना असावी, त्यामुळे त्यांनी काढता पाय घेतल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री गेल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिवप्रेमींच्या रोषाला तोंड देण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला. तावडे काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. तर पंकजा मुंडे यांनी शिवप्रेमींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त याठिकाणी होता. गोंधळ वाढत गेला त्यामुळे विनोद तावडे यांनी मागच्या मागे काढता पाय घेतला. ते पाहून पंकजा मुंडेही त्या ठिकाणावरुन निघून गेल्या. मंत्र्यांनी काढता पाय घेतल्याचं पाहून शिवप्रेमींचा संताप आणखी अनावर झाला. त्यांनी ‘शिवाजी महाराज की जय’चा जयजयकार केला आणि सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन शिवप्रेमी आक्रमक झाले होते, असं कळतंय. त्यातच शिवप्रेमींनी गोंधळ घालू नये यासाठी सकाळी 4 वाजल्यापासून त्यांना गडाच्या पायथ्याशी रोखून धरण्यात आलं होतं, अशीही माहीती आहे. व्हिडिओमध्ये एक संतप्त तरुण पंकजा मुंडे यांना यासंदर्भात प्रश्न विचारत असल्याचं दिसतंय. दरम्यान, मुख्यमंत्री लवकर निघून गेल्याप्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलंय. मुंबईमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम सुर आहे. त्यामुळे त्यांना जास्त वेळ शिवसेनेरीवर थांबता आलं नाही. राज्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणण्याचं महत्त्वाचं काम या कार्यक्रमाद्वारे होत आहे. तरीही मुख्यमंत्री महत्त्वाचा कार्यक्रम असल्याने शिवनेरीवर आले, असं विनोद तावडे यांनी म्हटलंय.

 

लाखांच्या शिवगर्जनेची जागतिक नोंद

 

मराठा क्रांती मोर्चा शिव जन्मोत्सवामध्ये नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर आज झालेल्या कार्यक्रमात पन्नास हजार नागीरक, विद्यार्थ्यांनी गगनभेदी शिवगर्जना केली. या शिवगर्जनेची ‘अमेझींग वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली.

कोणत्याही इलेक्ट्रीक वाद्यांशिवाय पर्यावरणपुरक कार्यक्रमाला शाळांचे विद्यार्थी, शिवप्रेमी संघटनांचे कार्यकर्ते, समाजबांधव व नागरीक उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी एकाच वेळी पन्नास हजार जणांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ‘जय जिजाऊ’, ‘जय शिवाजी- जय भवानी’ या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला. त्याची नोंद संबंधीत संस्थेने केल्यावर त्याचे प्रमाणपत्र व्यासपीठावरील नेत्यांना सुपूर्द केले.

व्यसनमुक्त शिवजयंती

🙏​शपथ🙏​
मी शपथ घेतो कि जर माझ्या त मराठी रक्त असेल,मी स्वताला शिवरायांचा मावळा म्हणत असेल तर”मी शिवजयंतीच्या दिवशी दारु 🥃🥃🍺🍺पिणार नाही ” व इतरांना पिउन जयंतीत सहभागी होउन देणार नाही. या जगात माझ्या राजांची प्रतीष्टा कमी होऊन देणार नाही . आणि मी हा संदेश  वाचताना न कळत मी शपथ घेतली आहे हे विसरणार नाही
जय जिजाउ..! जय शिवराय…!

 

शोकांतिका ! होय शोकांतिकाच

हिंदुत्ववादी म्हणवणारे बहुतांशी लोक शिवरायांच्या नावाचा वापर मुसलमानांच्या विरोधात
आणि  “बहुजनवादी” म्हणवून घेणारे शिवरायांचा वापर ब्राह्मणांच्या विरोधात करतात.
आजच्या घडीला खरे आणि निस्वार्थ असे शिवभक्त उरलेले नाहीत, ही छत्रपतींची किती मोठी शोकांतिका म्हणावी ?

‘प्रभो शिवाजीराजा’ प्रदर्शित

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवरायांचा जाज्ज्वल्य इतिहास असणारा पहिला मराठी अॅनिमेशनपट ‘प्रभो शिवाजीराजा’ आज राज्यात प्रदर्शित झाला आहे.

इतिहासाच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास अभ्यासला जात असला, तरी अॅनिमेशनचे तंत्र वापरून हा इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षकांना जिवंतपणे अनुभवता येणार आहे. या चित्रपटात स्वराज्याची बांधणी, मावळ्यांचे पराक्रम, स्वराज्य असे अनेक प्रसंग यामध्ये पाहता येणार आहेत.