अपरिचित इतिहास – भाग ३ : छत्रपती शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र

इतिहासातील अज्ञात माहिती लोकांसमोर आणण्याचा एक अभिनव प्रयत्न ! – अपरिचित इतिहास. दुसऱ्या भागाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सादर करत आहोत, भाग ३: छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्वपूर्ण पत्र

शिव चरित्र भाग ५ – पुरंदर तह – कीर्तनकार आफळे बुवा

महाराजांच्या स्वराज्याला बसलेला पहिला आणि शेवटचा सर्वात मोठा तडाखा म्हणजे मुघल सैन्यातील राजपूत मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान यांची स्वारी . एका हिंदू राजाकडून हिंदूच राजाला हिंदुस्थाना मध्ये हिंदूंना सुखाने राहण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांना पाबंदी घातली जावी या पेक्षा हिंदुस्थानचे दुसरे दुर्दैव ते कोणते??? पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला ह्या ऐतिहासिक तहाच्या घटनेचा भाग सुरु झाला . त्याच तहाचे सविस्तर वृत्तांत आफळे बुवांनी आपल्या कीर्तनातून केला आहे .

शिव चरित्र भाग ४ – सुरतेची स्वारी – कीर्तनकार आफळे बुवा

शिवरायांच्या इतिहासामध्ये एका घटनेला फार चुकीच्या प्रकारे दाखवले जाते ते म्हणजे  सुरतेची स्वारी शालेय पुस्तकां मध्ये सुद्धा सुरतेची  लूट असे सम्बोधले जाते त्यामुळे साहजिकच त्याकडे नकारात्मक दृष्ट्या बघितले जाते . परंतु त्या मागचा खरा इतिहास कधी आपल्या पर्यंत पोहचला का ??? महाराजांनी सुरतेवरच का हल्ला केला ??? नेमके काय लुटले आणि कोणाला लुटले ??? या सर्व प्रश्नांवर आफळे बुवांनी सविस्तर कथन करून त्या मधला सकारात्मक दृष्टिकोन दर्शवला आहे . जरूर ऐकावे !

शिव चरित्र भाग ३ – अफझल वध – कीर्तनकार आफळे बुवा

खाणीतून , मातीतून सोन्या सारखे स्वराज्य बाहेर काढून त्याला तापवून सलोखुन अस्सल सुराज्य महाराजांनी बनवले ते लुटायला ओरबाडायला यवन पुढे सरसावले नाहीत तर नवलच ! पण स्वराज्यावर आक्रमण होणार याची पूर्व कल्पनाच महाराजांना होती त्यामुळे ते आक्रमण परतवून लावण्यासाठी महाराजांनी काय काय शक्कल लावली याचेच सविस्तर कथन आफळे बुवांनी आपल्या कीर्तनातून दिले आहे ! जय शिवराय !

शिव चरित्र भाग २ – स्वराज्य ते सुराज्य – कीर्तनकार आफळे बुवा

यावनी शक्तींच्या विरोधात उभे राहून स्वराज्य निर्मितीसाठी जरी जिद्द, चिकाटी व मनगटातील ताकतीची गरज असते तसेच त्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी निर्णयक्षमता , कर्तव्यदक्षता व बुद्धीच्या धारेची देखील गरज असते व सर्वच राजांमध्ये हे दोन्ही गुण असतीलच असे नाही परंतु शिवरायांमध्ये हे सर्व गुण भर भरून वाहत होते त्याच व केवळ त्याच मुळे स्वराज्य फक्त जन्मालाच नाही आले तर त्याचे सुराज्य देखील झाले ज्याला जनसामान्यातून देखील डोक्यावर घेतले गेले व राजाला देवपण लाभले , अशा या थोर राजाने राज्याची सुरवातीची घडी कशी बसवली त्या बाबतचा हा कथा वृत्तांत आफळे बुवांनी आपल्या कीर्तनातून मांडला आहे तो आम्ही शिव चरित्र भाग २ द्वारे प्रसारित करीत आहोत जरूर ऐकावे .

शिव पूर्व इतिहास – शिव चरित्र – भाग ०१ – चारुदत्त आफळे बुवा

शिव पौर्णिमे च्या आधी संपूर्ण हिंदुस्थानाला मुघली ग्रहणाने घ्रासलेले होते , त्या आधीचा काळ आपल्यापैकी अनेक जणांसाठी अज्ञात आहे परंतु आफळे बुवांनी त्यावर प्रकाश टाकल्यामुळे इतिहासाची नवीन पाने आपल्या साठी उलगडली जातात .

शिवलेखकांना आवाहन…

Digital History broadcasting campaign च्या अंतर्गत चालवलेल्या शिवचरित्र आणि शंभूचरित्र प्रसाराणाच्या कार्यामध्ये आपल्या दोन्ही छत्रपतिंवर लेख मागवण्यात येत आहेत.
आपण जर उत्तम लेखक असाल व आपले लेख शिव-शंभू महाराजांचा जाज्वल्य इतिहासावर आधाराती तसेल तर आपण shivajagar@gmail.com या मेल आयडी वर लेखकाचे नाव व नंबर सहीत पाठवु शकता, आपले लेख. शिवचरित्र , शंभु चरित्र तसेच पुढे याच campaign च्या अंतर्गत चालू होत असलेल्या शिवजागर या ई-मासिकामध्ये प्रकाशीत करण्यात येतील तसेच त्याचं नोटिफिकेशन संबंधीत लेखकाला द्देण्यात येईल.

शिवचरित्र आणि शंभू-चरित्र या एप्लिकेशन्स बद्दल वाचकांना निवेदन.

मित्रहो,

Digital History Broadcasting Campaign च्या अंतर्गत, आपण हे दोन एप्लिकेशन्स बनवले आहेत,
आणि केवळ एका महिण्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न करता दोन्ही एप्लिकेशन्स ना प्रत्येकि एक एक हजार इन्स्टॉलेशन्स झाले, त्याबद्दल आपले आभार व अभिनंदन.
हे काम करत असताना आपल्याला एप्लिकेशन्स संदर्भात काही सुचणा किंवा अडचण असल्यास आपण मुक्तपणे आम्हाला shivajagar@gmail.com  या मेल आयडी वर लिहू शकता.