कोपर्डी बलात्कार व हत्याप्रकरण: दोषींच्या शिक्षेचा फैसला २९ नोव्हेंबरला

कोपर्डीतील १५ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद संपला आहे. जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (२५), संतोष भवाळ (३०) आणि नितीन भैलुमे (२३) या तिघांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. शिक्षेबाबत न्यायालय २९ नोव्हेंबरला निकाल देणार आहे.

कोपर्डीत राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीची १३ जुलै २०१६ रोजी जितेंद्र शिंदे, संतोष आणि नितीन या तिघांनी बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. शनिवारी विशेष जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. सुवर्णा केवले यांनी तिघाही आरोपींना दोषी ठरवले होते. या तिघांच्या शिक्षेबाबत मंगळवारपासून सुनावणीला सुरुवात झाली.

बुधवारी भैलुमेचे वकील तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद केला. सुमारे सव्वातास युक्तिवाद सुरु होता. दोषींना मृत्युदंडाची शिक्षा व्हावी यासाठी निकम यांनी १३ कारणे दिली. जितेंद्रने पीडितेवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. बलात्कारानंतर जितेंद्रने त्याच्या साथीदारांना मिस कॉल दिला होता. घटना घडली तेव्हा हे दोघेही जवळच दबा धरुन बसले होते. संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे हे पडद्यामागचे सूत्रधार आहेत. त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, असे निकम यांनी न्यायालयात सांगितले. इंदिरा गांधींची हत्या आणि संसदेवरील हल्ला या प्रकरणांमध्ये सूत्रधारांना फाशीची शिक्षा झाली होती, याकडेही निकम यांनी लक्ष वेधले. बचावपक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने २९ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असे सांगितले. याच दिवशी न्यायालय शिक्षेबाबत निकाल देण्याची शक्यता आहे.

Source : Loksatta.com

कोपर्डी निकाल : मला फाशी नको, जन्मठेप द्या: जितेंद्र शिंदे

 

*Source : _डिजिटल नगर_ | _डिजिटल बातमीपत्र_*

_शिक्षेच्या युक्तीवादाच्या पार्श्वभूमीवर आजही अहमदनगर जिल्हा न्यायालयात कडक बंदोबस्त तैनात आला आहे._

राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही दोषींच्या शिक्षेचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. दोषींना शिक्षेवर आज जिल्हा सत्र न्यायालयात युक्तीवाद झाला. दोषीच्या वकिलांनी आज आपल्या अशिलाला कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली.

या प्रकरणातील मुख्य दोषी आरोपी असलेल्या जितेंद्र शिंदेंने पीडित तरुणीला आपण मारलं नाही, असा दावा करत, फाशी ऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली. तर शिंदेचे वकील मोहन मकासरे यांनी आपल्या अशिलाला फाशी नको तर जन्मठेप द्यावी, अशी मागणी केली.

दुसरीकडे  या खटल्यातील तीन नंबरचा आरोपी नितीन भैलुमेच्या वकिलांनी आपल्या अशिलाला या खटल्यात गोवल्याचा दावा केला. तसंच नितीन भैलुमे हा कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही. तो दलित कुटुंबातील आहे. तो 26 वर्षाचा विद्यार्थी असून, त्याचं कुटुंब सर्वसामान्य आहे. त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून आहेत. शिवाय त्याच्यावर लावण्यात आलेल्या कलमात जास्त शिक्षेची तरतूद नाही. तो केवळ 102 ब कटकारस्थान आणि 109 गुन्ह्याला उत्तेजित करणं या दोनच कलमात दोषी आढळला आहे. त्याच्याविरोधात कोणताही साक्षीदार नाही, कोणी प्रत्यक्षदर्शी नाही, त्याला या गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे. तो एक सुशिक्षीत मुलगा आहे, असा दावा नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अहेर यांनी केला.

*आरोपी नंबर तीन-  नितीन भैलुमे*

-कोपर्डी खटल्यात आरोपी नितीन भैलूमेचे वकील प्रकाश आहेर यांचा युक्तिवाद पूर्ण

-आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही.

– तो 26 वर्षाचा विद्यार्थी असून त्याचं कुटुंब सर्वसामान्य आहे. त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून आहेl.

– या संदर्भात आरोपी नितीन भैलुमेला न्यायालयानं तुला काही सांगायचं का असं विचारल्यावर हात जोडून त्यानं मी निर्दोष असल्याचं सांगितलं.

– नितीन भैलुमेविरोधात कोणताही साक्षी पुरावा नाही, त्याला गुन्ह्यात अडकवलंय, तो बलात्कार, हत्या प्रकरणात नव्हता- दोषीचे वकील

*आरोपी नंबर एक – जितेंद्र शिंदे*

जितेंद्र शिंदेच्या वकिलांचाही युक्तिवाद पूर्ण. मोहन मकासरे यांनी युक्तिवाद केला. कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी

मी तिला मारलं नाही, मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेचा कोर्टात दावा, फाशी ऐवजी जन्मठेप देण्याची मागणी

*उज्ज्वल निकम उद्या युक्तीवाद करणार*
बचावपक्षाचे वकील आज दोषींना कमीत कमी शिक्षेची मागणी करतील. त्यानंतर उद्या (22 नोव्हेंबर) विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आपली बाजू मांडतील. वकील उज्ज्वल निकम यांनी कठोरातील कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

दरम्यान, बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे. त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता 22 नोव्हेंबरला होणार आहे.

शिक्षेच्या युक्तीवादाच्या पार्श्वभूमीवर आजही अहमदनगर जिल्हा न्यायालयात कडक बंदोबस्त तैनात आला आहे.

*जन्मठेप की फाशी?*
दरम्यान, आरोपींवर ज्या कलमांतर्गत दोष सिद्ध झाले आहेत, त्यानुसार त्यांना कमीत कमी जन्मठेप आणि जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होऊ शकते.

कलम 120 ए, 376 (बलात्कार) आणि 302 (हत्या) अशा कलमांन्वये लावलेले आरोप सिद्ध झाले आहेत.

*कोर्टात नेमकं काय झालं?*
कोर्टात आज तीनही आरोपींवरील दोष सिद्ध झाले. सुरुवातीला न्यायाधीशांनी आरोपींना कठड्यात उभं केलं. तीनही आरोपींना नाव विचारुन, त्यांचं वय विचारलं. मग न्यायालयाने तिघांवर ठेवण्यात आलेले आरोप त्यांना वाचून दाखवले.

तिघांवर बलात्कार, कटकारस्थान आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानंतर तिघांवरील दोष सिद्ध करण्यात आले.

*काय आहे नेमकं प्रकरण?*
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. जलदगती न्यायालयात सुनावणी करुन आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली.

*31 जणांच्या साक्ष*
कोपर्डी खटल्यात आतापर्यंत 31 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात सर्व साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर कटकारस्थान करुन बलात्कार आणि हत्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

 

💥कोपर्डी खटला: विशेष

💥कोपर्डी खटला: विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम न्यायालयात पोहोचले

💥अहमदनगर: पीडित मुलीच्या वडिलांसह कोपर्डी ग्रामस्थ पोलीस संरक्षणात न्यायालयात दाखल

💥अहमदनगर: कोपर्डी खटल्यातील आरोपीचे वकील बाळासाहेब खोपडे पोलीस संरक्षणात न्यायालयात पोहोचले

आग्र्याहून सुटका

महाराजांचे हे कठोर कैदेतून बेमालूमपणे निसटणे हा जगाच्या इतिहासातील एक विलक्षण चमत्कार आहे. या संपूर्ण आग्रा प्रकरणाचा खूपच तपशील इतिहास संशोधकांना मिळाला आहे.

ही कथा म्हणजे एक विशाल सत्य कादंबरी आहे. ही एक दिव्य तेवढेच थरारक महाकाव्य आहे. प्रतिभावंतांची नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा स्तिमित व्हावी अशी ही सत्य कलाकृती आहे.

समजा , महाराज जर त्याच दिवशी निसटले नसते , तर काय झाले असते ? त्याच दिवशी ते निसटले हा केवळ योगायोग होता का ? कदाचित कुणी म्हणेल की , महाराजांना झालेला हा ईश्वरी साक्षात्कार होता.

पण नेमके त्याच दिवशी (दि. १७ ऑगस्ट) निसटून जाण्याचे महाराजांनी तडका फडकी ठरविले आणि ते पसार झाले याच्या पाठीमागे मराठी हेरांनी करामतच असली पाहिजे. त्या शिवाय हे घडलेले चित्तथरारक नाट्य बुद्धिला उमगत नाही.

ते पेटाऱ्यातून गेले की वेषांतर करून गेले! मोघली कागदपत्रात ते वेषांतर करून गेले असे उल्लेख आहेत पण सुमारे २३ ऑगस्ट म्हणजेच सुटकेनंतर एक आठवड्याने मोघलांच्या टेहळ्यांना अर्धवट जळून विझून गेलेले पेटाऱ्याचे अवशेष त्या माळावर आढळले.

त्यावरून त्यांचीही खात्री झाली की , शिवाजीराजे पेटाऱ्यातून पसार झाले आणि त्यांनी पेटारे जाळून टाकले. ‘ सेवो दखन्नी और सेवो के पुत्तो संभो दखणी पिटारा बैठकर भागोछे ‘ अशी राजस्थानी पत्रात नोंद आहे.

अशाच पद्धतीने सुटून जाण्याची महाराजांची कल्पना मात्र त्यांच्या पूर्व तयारीवरून आग्ऱ्यात तयार करून घेतल्याचे दिसून येते. महाराज आपल्या बरोबरच्या मराठी साथीदारांसह नरवरपासून पुढे सटकले तेव्हा नरवरच्या

मोघली ठाणेदाराला महाराजांनी आपल्याला मिळालेली , दक्षिणेत घरी जाण्याची परवानापत्रे दाखवली त्या ठाणेदाराने महाराजांना सोडून दिले ही पत्रे म्हणजे महाराजांनी तयार करून घेतलेली बनावट परवानापत्रे होती….

महाराज आग्ऱ्याहून एकदम दक्षिणेच्या मार्गाला न लागता ते उलटे उत्तरेकडे म्हणजेच मथुरेकडे दौडत गेले. ही त्यांची दौड एकूण ६० किलोमीटरची होती. मथुरेत मोरोपंत पिंगळे यांची सासुरवाडी होती….

मोरोपंतांच्या पत्नीचे बंधू तेथे राहत होते. महाराजांना ते माहिती होते. राजगडापर्यंतची दौड चिरंजीव शंभूराजेंना झेपणार नाही , म्हणून शंभूराजेंना मोरोपंतांच्या मेहुण्यांच्या घरी लपवून ठेवायचे आणि आपण मराठी
मुुलुखाकडे नंतर दौडायचे हा महाराजांचा आराखडा होता…

त्यामुळे महाराजांची दौड १२० किलोमीरटने आणि वेळ जवळ जवळ दहा तासांनी वाढणार होती , तरीही शंभूराजेंकरिता त्यांनी हे महागाईचे गणित पत्करले….

मथुरेपर्यंतचा प्रवास ऐन काळोख्या रात्री दौडत करावा लागला शंभूराजेंच वय यावेळी फक्त नऊ वर्षांचे होते. या नऊ वर्षांच्या मुलाला मोरोपंतांच्या मेहुण्यांच्या स्वाधीन करून महाराज अगदी त्वरित दक्षिणेच्या मार्गाला लागले….

शंभूराजेंच्या सांगाती महाराजांनी बाजी सजेर्राव जेधे देशमुख यांना ठेवले दक्षिणची दौड सुरू झाली महाराज नरवरला पोहचले तेथे मोघलांचे लष्करी गस्तीचे ठाणे होते या ठाणेदाराची महाराजांनी मुद्दाम धावती भेट घेतली….

त्यांनी आपल्या जवळची दस्तके (परवानापत्रे) त्याला दाखवली. ठाणेदाराला प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना पाहून काय वाटले असेल ? ते भयंकर शिवाजी महाराज आपल्यासमोर पाचपंचवीस मराठी सैनिकांनिशी उभे आहे. याची प्रत्यक्ष प्रचिती त्या ठाणेदाराला स्वप्नासारखी वाटली असेल नाही! तो विस्मित झाला ? गोंधळला ? भारावला ? क्षणभर घाबरला ?

शिवाजी महाराज आपल्याला दस्तके दाखवून आपल्या परवानगीनेच जात आहेत या सुखद जाणीवेने आनंदला ? काय झाले असेल त्याचे ? त्याने महाराजांना पुढे जाण्यास म्हणजेच झपाट्याने पसार होण्यास मोठ्या आदबशीररितीने परवानगी दिली….

महाराज नरवरवरून निसटले. ते स्वत:हून या ठाणेदाराला दस्तके दाखवून पसार झाले यात त्यांचा मिस्किल , थट्टेखोर स्वभाव दिसून येतो ही थट्टा प्रत्यक्ष औरंगजेबाचीच होती….

तसेच झाले महाराज दि. १७ ऑगस्टला संध्याकाळी पसार झाले. त्यावेळी त्यांच्या शामियान्यात हिरोजी फर्जंद स्वत: ‘ महाराज ‘ म्हणून शाल पांघरून झोपले सुमारे पाच-सहा मावळे चिंताग्रस्त चेहऱ्यांनी भोवती होते…

थोड्याच वेळाने चिंताग्रस्त चतुर उठले अन् शामियान्याच्या दारावर असलेल्या मोघली पहारेकऱ्यांना ‘ आम्ही महाराजांची औषधं आणावयास जातो ‘ असे सांगून बाहेर पडले अशा प्रकारचा औषधासाठी जाण्या येण्याचा
रिवाज रोजच चालू होता….

त्यामुळे हे लोक जात आहेत , ते नेहमी प्रमाणे औषधं घेऊन परतही येणार आहेत अशी स्वाभाविकच पहारेकऱ्यांची कल्पना झाली…

आणखी थोड्या वेळाने हिरोजी फर्जंद भोसले हे हळूच पलंगावरून उठले. त्यांनी याही घाईगदीर्त गंमतच केली. त्यांनी त्या पलंगावर कोणीतरी माणूस (म्हणजे शिवाजी महाराज!) झोपले आहे असे भासावे म्हणून उशाशी एक छोटेसे गाठोडे ठेवले….

मधे लोड ठेवला आणि पायाच्या बाजूला दोन जोेड उभे करून ठेवले आणि यावर शाल पांघरली अगदी साक्षात शिवाजीराजे गाढ झोपल्यासारखे वाटावे…

अन् स्वत: तंबूच्या बाहेर निघाले त्यांनी दारावरच्या पहारेकऱ्यांना साळसूदपणे सांगितले की , ‘ मघा माणसं औषध आणायला गेली , ती अजून का येत न्हाईत , ते पाहून येतो ‘ हिरोजीही निसटले. आता त्या शामियान्यात कोणीही नव्हते. सगळे पसार!

दुसरा दिवस उजाडला आणि बोभाटा झाला. एकच कल्लोळ उसळला. फौलादखानाला तंबूत चिटपाखरूही दिसले नाही. पलंगावर एक गाठोडे , एक लोड आणि दोन जोडे शालीखाली गाढ झोपलेले आढळले.

ते पाहून फौलादखानाची काय अवस्था झाली असेल ? तो विरघळला की गोठला ? त्याला शिवाजी महाराजांचा आणि औरंगजेबाचाही चेहरा आलटून पालटून दिसू लागला असेल का ? आपण जिवंत असूनही ठार झालेलो आहोत याचा साक्षात्कार झाला असेल का ? केवढी फजिती!

एवढ्या प्रचंड पहाऱ्यातून अखेर ते शिवाजीराजे आपली थट्टा करून पसार झाले आता त्या औरंगजेबापुढे जायचे तरी कसे ? त्याला सांगायचे तरी काय ? काय अवस्था झाली असेल फौलादखानची ?
*संकलन – गायकवाड क्लासेस आष्टी*
औरंगजेबाचे भयंकर क्रूर जल्लादही हे सारं समजल्यावर खळखळून , पोट धरून हसले असतील….

शिवरायांचे …जगभरातून इतिहासकारणी केलेली वर्णन

“शिवाजीचे डोळे अतिशय तीक्ष्ण व विलक्षण तेजस्वी आहेत.त्याची बुद्धीमत्ता त्यातुन व्यक्त होते.तो दिवसातून एकच वेळ सामान्यतः भोजन करतो. तरीही त्याचे आरोग्य उत्कृष्ट आहे.”
-जिन दि तेवनो

“शिवाजी केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरूष नसून ,त्याचे शरीरही डौलदार आहे. त्याच्या चेहरा आकर्षक आहे आणी निसर्गतः त्याचे व्यक्तित्व अत्यंत परिपूर्ण आहे. विशेषतः त्याचे काळेभोर आणी विशाल नेत्र इतके विलक्षण भेदक आहेत की तो टक लावून पाहू लागला तर त्यातून ठिणग्या बाहेर पडतात की काय ,असे वाटते. त्याचबरोबर तरल, तीक्ष्ण,स्पष्ट आणी तंतोतंत निर्णय करणारी त्याची प्रतिमाही व्यक्त होते.”
-कोस्मा दी गार्डा

“शिवाजीने उत्तरेस दमण आणी खाली गोवा ह्या आमच्या दोन्ही प्रदेशामधला सर्व मुलुख काबीज केला आहे. हिंदुस्थानच्या हा अँटिला(प्रख्यात हूण नेता) च्या चातुर्याची आणी पराक्रमाची स्तुती करावी तितकी थोडीच आहे. तो केवळ बचावाचेच खेळ खेळतो असे नव्हे तर चढाईचेही खेळतो.”
-गोव्याचा व्हाईसराँयने पोर्तुगालच्या राजास लिहिलेळे पत्र २४ जानेवारी १६८०

डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार) – “स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत.”

प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड) – “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे.”

|| श्री शिवसूर्य वाणी १ ||

।। हे राज्य म्हणजे केवळ ईश्वरदत्त ।। — पुण्यश्र्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज — (संदर्भ :- ।। आज्ञापत्र ।।) ” आज्ञापत्र ” म्हणजे छत्रपतिंचे आज्ञा सांगणारे ” राजपत्र ” . सामान्यतः छत्रपतिंकडून दिल्या जाणाऱ्या आज्ञा पत्रावर राज्याभिषेक शकाचा उल्लेख असतो,तसेच छत्रपतिंचे नाव व मुद्रा असतात.

‘राणी पद्मिनी(पद्मावती)चा खरा इतिहास’

 

सुलतानी परंपरेप्रमाणे आपला काका व सासरा असणार्या आणि दिल्लीच्या गादीवरील खिलजी राजवंशाचा संस्थापक असणार्या जलालुद्दिन खिलजीचा कपटाने आणि अतिशय क्रूरपणे खून करुन,त्याचे मुंडके भाल्याच्या टोकात खूपसून पूर्ण सैन्यातून मिरवून,त्यानंतर आपले भाऊ व साळ्यांचे मुडदे पाडून 21 ऑक्टोबर 1296 रोजी अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीश्वर झाला.सत्तेसाठीचा रक्तपात आटोपून अल्लाउद्दिनने भारतातील इतर राज्यांवर आक्रमण करुन लूट मिळवण्याचे सत्र सुरु केले.चित्तोड(इ.स.1303),गुजरात(1304),रणथंबोर(1305),मालवा(1305),सिवाना(1308),देवगिरी(1308),वारंगल(1310),जलोर(1311),द्वारसमुद्र(1311)आदि राज्यांवर आक्रमणे करुन अल्लाउद्दिनने परमार,वाघेला,चामहान(चौहान),यादव,काकाटीय,होयसाळ,पांड्य आदि साम्राज्ये उद्ध्वस्त केली. हजारोंचा नरसंहार केला,लाखोंचे धर्मपरिवर्तन केले,कोट्यवधींच्या संपत्ती व हत्ती-घोड्यांची लूट केली आणि आमच्या अगणित माताभगिनींचा शीलभंग करुन त्यांना आपल्या जनानखान्यात भरती केले वा बाजारात विकण्यास्तव गुलाम बनवून नेले.इतिहासकारांच्या लेखण्यांना लिहीतानाही लाज वाटेल इतके रानटी व सैतानी अत्याचार अल्लाउद्दिन व त्याच्या सैनिकांनी आम्हां भारतीयांवर केले. सैतानालाही लाज वाटेल असा हा ‘इतिहासप्रसिद्ध’ अल्लाउद्दिन खिलजी.

अल्लाउद्दिन दिल्लीच्या गादीवर असतांना मेवाडात रावळ वंशाचा राणा रतनसिंह गादीवर होता व चित्तोडगड ही त्याची राजधानी होती.आणि रतिप्रमाणे अद्भूत,आरसपानी अशा लावण्याची खाण असलेली पद्मिनी मेवाडची महाराणी होती.सिंहली(श्रीलंकेचा ?)राजा गंधर्वसेन व राणी चंपावतीची रुपगर्विता राजकन्या असणारी पद्मिनी लहानपणापासून युद्धकौशल्यात निपूण होती.तिच्या स्वयंवराचा पण असा होता की जो कोणी तिने निवडलेल्या सैनिकाला लढाईत हरवेल,त्याच्याच गळ्यात ती वरमाला घालेल.आणि असे म्हणतात की तो सैनिक म्हणजे स्वतः पद्मिनीच असे.तर असा पण जिंकून राणा रतनसिंहाने पद्मिनीला वरले.रतनसिंह आपल्या प्रजाहितदक्ष राज्यकारभारासाठी आणि पद्मिनी आपल्या रुपासाठी विश्वविख्यात होते.

रतनसिंहाच्या दरबारी राघव चेतन नावाचा एक कलाकार होता.कसल्यातरी गुन्ह्यासाठी राण्याने राघव चेतनला अपमानित करुन दरबारातून हाकलून दिले.सूडाग्निने पेटलेला राघव चेतन दिल्ली राज्यातील एका वनात जावून बसला जेथे खिलजी नियमितपणे शिकारीला येत असे.एके दिवशी खिलजीचे शिकारी टोळके येताना पाहून राघव चेतनने सुंदर बासरी वाजवणे सुरु केले.बासरीचे सूर ऐकून अल्लाउद्दिनने त्याला आपल्यासमोर हजर करण्यास सांगितले.त्यावेळी त्याने राणी पद्मिनीच्या अनुपम सौंदर्याचे रसभरित वर्णन करुन सांगितले की,”तुझ्यासारख्या पराक्रमी पुरुषाच्या जनानखान्यात पद्मिनी नसणे हा तुझ्या पराक्रमाचा अपमान आहे.”हे ऐकून खिलजीच्या व्याभिचारी व लंपट मनात पद्मिनीच्या प्राप्तीची इच्छा बळावली.आणि पद्मिनीसाठी खिलजीने जानेवारी 1303मध्ये चित्तोडगडावर स्वारी केली व गडाला वेढा घातला.राजपूतांच्या चिवट प्रतिकारामुळे आठ महिने होवूनही खिलजीला काहीच यश मिळत नव्हते.तेंव्हा त्याने रतनसिंहाकडे निरोप पाठवला की ,”मला जर राणी पद्मिनीचे दर्शन करविण्यात आले,तर मी दिल्लीला निघून जाईन.” प्रजाहितास्तव राण्याने हे मान्य केले.परंतु यामागील कुटिल डाव ओळखून राणी पद्मिनीने स्वतः समोर न जाता आरशातून खिलजीला स्वतःचे प्रतिबिंब दाखवण्यात यावे,असे सूचविले.त्याप्रमाणे खिलजीला पद्मिनीचे प्रतिबिंब दाखवण्यात आले अन् कपटी,लंपट खिलजी राणीचे रुप पाहून आणखीनच चेकाळला.’अतिथी देवो भव’ या भारतीय मूल्याचे पालन करण्यास्तव (परंतु देश-काल-पात्राचा विवेक न केल्यामुळे जी आपल्याच अंगावर उलटून अनेकदा आपली ‘सद्गुणविकृती’ ठरली) रतनसिंह गडाच्या दरवाजापर्यंत गेला.मात्र खिलजी व त्याच्या सैनिकांनी कपटाने राजाला कैद करुन खाली आपल्या पाडावात नेले आणि निरोप पाठवला की ,”राणा जीवंत हवा असेल तर पद्मिनीला आमच्या स्वाधीन करा.”

गडावर सैनिकी खलबतं झडलीत. आणि गडावरुन निरोप गेला की,”राणी पद्मिनी तिच्या पन्नास दासींसमवेत अल्लाउद्दिनच्या डेर्यात दाखल होईल,पण त्याबदल्यात राणा रतनसिंहास सोडून देण्यात यावे.” ठरल्याप्रमाणे राणी व तिच्या दासी एका-एका पालखीत व त्या पालखी उचलणारे चार-चार पालखीचे भोई खिलजीच्या डेर्यात दाखल झाले.राणी पद्मिनीची पालखी खिलजीच्या शामियान्यासमोर थांबली.राणा रतनसिंहाला मोकळे करुन घोड्यावर बसवण्यात आले.पद्मिनीच्या पालखीतून एक स्त्री उतरली.अन्य पन्नास पालख्यांतून पन्नास दासीही उतरल्या. संकेत झाला.आणि….आणि हे काय?क्षणात पद्मिनी, त्या दासी व त्या भोयांच्या हातात पालखीत लपवून ठेवलेल्या तलवारी तळपायला लागल्या.दगा झाला होता तर!राणीचा मामा गोराच पद्मिनीचा वेश घेवून आणि त्याचा पुतण्या बादल(ही गोरा-बादलची काका-पुतण्याची जोडगोळी राजस्थानी लोकगीतांमध्ये फार प्रसिद्ध आहे.)काही निवडक सैनिकांना घेवून स्त्रीवेश धारण करुन खिलजीच्या डेर्यात घुसले होते.काही कळायच्या आतच सपासप कत्तल सुरु झाली व भूमाता उष्ण शत्रूशोणिताचे पान करुन तृप्त व्हायला लागली.गोरा तर खुद्द अल्लाउद्दिनच्या तंबूत शिरला व त्याची गर्दन उडवणार तो त्याने आपल्या दासीला समोर केले.स्त्रीवर वार न करण्याच्या राजपूत बाण्यामुळे गोरा थांबला अन् मागून आलेल्या खिलजीच्या सैनिकांनी गोराचे मुंडके धडावेगळे केले.आपल्या स्वामीचे प्राण वाचविण्यासाठी गोराने हौतात्म्य पत्करले.बादल व अन्य राजपूत सैनिक आपल्या राण्याला घेवून झपाट्याने गडावर निघून गेले अन् खिलजी हात चोळत राहिला.

आता मात्र झालेल्या प्रकाराने डिवचलेला हा विषारी भुजंग त्वेषाने चालून गेला.काही दिवस गड झुंजविल्यानंतर गडावरील रसद संपत आली आणि अंतिम युद्धासाठी राणा रतनसिंह व राजपूत वीर सिद्ध झाले.25 ऑगस्ट 1303 रोजी गडाचे दरवाजे उघडून, ‘जय एकलिंग,जय महाकाल’ चे नारे देवून राजपूत सेना खिलजीच्या सेनासागराशी भिडली.परंतु संख्याबळात कमी असल्यामुळे लढाईचा अपेक्षितच निर्णय आला.दहा-दहा सुल्तानी सैनिकांना लोळवून एक-एक राजपूत रणभूमीरुपी मातेच्या चरणी अर्पण होवू लागला.लढाई संपली.राण्यासहित सर्व राजपूत मारल्या गेले.अन् वखवखलेले सुल्तानी लांडगे आपल्याला सोळा हजार राजपूत जनानींची शिकार करायला मिळणार,म्हणून गडात घुसले.

पण गडावर शिरताच पाहतात तर काय,एकही स्त्री दिसेल तर शपथ.थोडे पूढे जावून चित्तोडगडावरील जगप्रसिद्ध ‘विजयस्तंभ’ ओलांडल्यावर लागणार्या विस्तीर्ण मैदानावर,जिथे आज ‘जौहर स्थल’ म्हणून पाटी लागलेली आहे,तिथे जावून पाहतात तर काय,अनलज्वाला आकाशाला भिडताहेत.राजपूतांच्या पराभवाची वार्ता मिळताच, खिलजीचे सैन्य गडावर शिरण्यापूर्वीच राणी पद्मिनी व सोळा सहस्र वीरांगनांनी ज्या अग्निसाक्षीने आपल्या प्राणनाथांना वरले होते,त्याच अग्नित उड्या घेतल्या.स्वतःच्या शीलाचे व देव,देश अन् धर्माचे रक्षण करण्यास्तव या सोळा हजार तेजस्वी अग्निशलाका अग्नितच जळून भस्म झाल्यात.आईला मुलींच्याच रक्ताचा अभिषेक घडला.रणभूमीला रणरागिणींच्याच देहाच्या माला अर्पित झाल्या.अन् चित्तोडगडाने अनुभवला एक अलौकिक सोहळा, ‘जोहाराचा सोहळा’.तसे चित्तोडगडाने यानंतरही दोन मोठे जोहार अनुभवलेत,पण हा जोहार युगानुयुगे या देशाला प्रेरणा देणारा ठरला.

लढाई संपल्यावर सुमारे 30,000 निष्पाप नागरिकांची अल्लाउद्दिनने कत्तल केली,असे त्याच्याच दरबारातील लेखक अमिर खुस्रोने लिहून ठेवलेय.तसेही प्रत्येक युद्ध आटोपल्यावर तेथील निःशस्त्र व निष्पाप नागरिकांची कत्तल करुन,त्यांच्या मुंडक्यांचे पहाड रचून त्यापुढे बसून मदिराप्राशन करणे,हा अल्लाउद्दिनचा आवडता छंद होता,असे म्हणतात.आणि म्हणूनच अशा क्रूर,रानटी श्वापदाचे थोडेही महिमामंडन भारतीय जनमानस कधीही स्वीकार करु शकत नाही.आणि आम्हां सार्या भारतीयांना मातृवत् पूजनीय असलेल्या महाराणी पद्मिनीच्या चारित्र्यावर यत्किंचितही शिंतोडे उडवलेलेही आम्हांला चालू शकत नाही.अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली आणि गल्लाभरु मनोरंजनासाठी आपल्या राष्ट्रीय आदर्शांचा असा अपमान,भारत कधीही सहन करणार नाही.

नुकतेच संजय लीला भन्साळीने मुलाखतीत सांगितलेय की पद्मिनी व अल्लाउद्दिनबाबत काहीही आक्षेपार्ह असे चित्रपटात दाखविण्यात आलेले नाही.आशा करु या की भन्साळी खरे बोलतोय.आपल्या सगळ्यांना या चित्रपटातून खरा आणि यथातथ्य असाच इतिहास बघायला मिळेल,या आशेसह भन्साळीला आणि आपणां सगळ्यांनाही या चित्रपटासाठी शुभेच्छा.

 

शेवटी राजपूतान्याच्या गौरवशाली इतिहासातील जोहाराचे हे सोनेरी पान संपवतांना एवढेच म्हणावेसे वाटते-

 

ये हैं अपना राजपूताना,

नाज इसे तलवारोंपे

इसने सारा जीवन काटा

बरची-तीर-कटारोंपे ।

-डाॅ.सचिन जांभोरकर,
नागपूर.

॥ श्री शिवराज्याभिषेक सोहळा ॥

मोत्यांची झालर लावलेलं , रत्नजडीत राजछत्र गागाभट्टांनी हातात घेतलं व महाराजांच्या मस्तकावर धरलें !
आणि गागाभट्टांनी उच्च स्वरांत घोषणा केली….. महाराज श्री शिवाजीराजे आज छत्रपती झाले ! छत्रपती ! राजा श्री
शिवछत्रपती ! क्षत्रियकुलावतंस महाराज सिंहासनाधीश्वर राजा श्री शिवछत्रपती की जय ! जय ! जय !
त्या जयजयकाराने दिल्लीच्या कानठळ्या बसल्या ! विजापूर बधीर झालें ! फिरंग्यांची झोप उडाली ! रुमशामपावेतो दख्खनच्या दौलतीच्या नौबती ऐकूं गेल्या . राजसभा देहभान विसरली होती .
कोणत्या शब्दांत सांगूं हें सारें ?
आनंदनाम संवत्सरे , शालिवाहन शके १५९६,
जेष्ठ शुद्ध १३ , शनिवारी , उषकाली पांच वाजतां महाराज श्री शिवाजीराजे सिंहासनाधीश्वर झाले !
“चार पातशाह्या उरावर भाले रोवून उभ्या असतांनाही त्यांस पराभूत करून मराठा राजा छत्रपती झाला !
सामान्य गोष्ट नव्हे !”
सुलतानांची मिरास संपली .
देवगिरी , वारंगले , द्वारसमुद्र , कर्णावती , विजयनगर आणि खुद्द इंद्रप्रस्थ येथील चिरफाळलेलीं सिंहासने आज रायगडावर सांधली गेली…

 *श्री शिवराज्याभिषेक सोहळा*
जगाच्या इतिहासातला एक सोनेरी दिवस.
साडे तिनशे वर्षांच्या गुलामगिरी नंतर हिंदूंचे स्वतंत्र सिंहासन रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला उभे राहीले. सर्वत्र आनंद जल्लोष….

_*श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामी लिखित*_
*’आनंदवनभूवनी’*

स्वप्नीं जे देखिले रात्री | ते ते तैसेचि होतसे |
हिंडतां फिरता गेलो | आनंदवनभूवनी ||
स्वधर्माआड जीं विघ्नें | तीं तीं सर्वत्र ऊठिलीं |
लाटिलीं, कुटिलीं, देवें | दापिलीं, कापिली बहु |
विघ्नाच्या उठिल्या फौजा |भीम त्यावरी लोटला |
भर्डिली, चिर्डिली रागे | रडविलीं, बडविलीं बळे |
खौळले लोक देवाचे | मुख्य देवची ऊठिला |
कळेना काय रे होतें | आनंदवनभूवनी ||
स्वर्गींची लोटली जेथे | रामगंगा महानदी |
तीर्थासी तूळणा नाही | आनंदवनभूवनी ||
त्रैलोक्य चालिल्या फौजा | सौख्य बंदिविमोचने |
मोहीम मांडिली मोठी | आनंदवनभूवनी ||
अनेक वाजती वाद्यें | ध्वनिकल्लोळ ऊठिला |
छबीने डोलती ढाला | आनंदवनभूवनी ||
कल्पांत मांडिला मोठा | म्लेंच्छदैत्य बुडावया |
कैपक्ष घेतला देवीं | आनंदवनभूवनी ||
बुडाले सर्वही पापी | हिंदुस्थान बळावलें |
अभक्तांचा क्षयो जाला | आनंदवनभूवनी ||
येथून वाढला धर्मु | रमाधर्म समागमे |
संतोष मांडिला मोठा | आनंदवनभूवनी ||
बुडाला औरंग्या पापी | म्लेंच्छसंहार जाहला |
मोडिलीं मांडलीं क्षेत्रें | आनंदवनभूवनी ||
उदंड जाहले पाणी | स्नानसंध्या करावया |
जपतप अनुष्ठानें | आनंदवनभूवनी ||
लिहीला प्रत्ययो आला | मोठा आनंद जाहला |
चढता वाढता प्रेमा | आनंदवनभूवनी ||
बंड पाषांड उडाले | शुद्ध अध्यात्म वाढलें |
राम कर्ता राम भोक्ता | आनंदवनभूवनी ||
देवालये दीपमाळा | रंगमाळा बहूविधा |
पूजिला देव देवांचा | आनंदवनभूवनी ||
गीत संगीत सामर्थ्ये | वाद्यकल्लोळ ऊठिला |
मिळाले सर्व अर्थार्थी | आनंदवनभूवनी ||
येथुनी वांचती सर्वे | ते ते सर्वत्र देखती |
सामर्थ्य काय बोलावें ? आनंदवनभूवनी ||

*पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय !*