५ नोव्हेंबर इ.स.१५५६ पानिपतची दुसरी लढाई

#आजचे_शिव_दिनविशेष
********************


पानिपतची दुसरी लढाई झाली स्थानिक भार्गवकुलीन सम्राट हेमू विक्रमादित्य विरुद्ध परकीय आक्रमक मोगलांचा १४ वर्षांचा वारसदार अकबर. या लढाईनंतरच मुघलांचा हिंदुस्तानात जम बसला. म्हणजे हिंदुस्तानी इतिहासाला वळण देणारी अशी ही महत्त्वाची लढाई होती.
मुळात जमीनदार, नंतर व्यापारी असलेला हेमू नक्कीच असामान्य निरीक्षणशक्ती घेऊन आला होता. हेमूला घोड्यांची आणि हत्तींची चांगली पारख होती. निरीक्षणशक्तीला बुद्धिमत्ता आणि कल्पकता यांची जोड देऊन हेमूने पारंपरिक मैदानी, गोलाच्या लढाईत नवनव्या व्यूहरचना, नवनव्या चाली रचल्या आणि तुटपुंज्या पण वेगवान आणि त्वेषाने लढणार्‍या सैन्यबळावर संख्येने मातब्बर असलेल्या प्रबळ सैन्याविरुद्ध लढाया जिंकल्या. पराभूत सैनिकांचे शिरकाण,मारलेल्या सैनिकांच्या मुंडक्यांचा मनोरा रचून विजयाचा जल्लोष,भाल्याच्या टोकावर मुंडकी खोचून घोड्यावरून दौडत जाणे,पराभूत सेनापतींची मुंडकी तबकातून बादशहाला नजर करणे अशा या मुघलांच्या क्रौर्याचा त्यांच्या सर्व शत्रूंनी धसका घेतला होता. आपल्याकडे क्रूर समजल्या गेलेल्या अफगाणांनी देखील. परंतु हुमायूं आणि अकबर यांच्या या क्रूर सैन्याविरुद्ध तोपर्यंत २२ लढाया हेमूने एकदाही पराभूत न होता जिंकल्या होत्या. बहुतेक वेळा तुटपुंज्या सैन्यबळावर.
६ ऑक्टोबर १५५६ रोजी मुघल सरदार तर्दी बेगचा हेमूने इतका जबरदस्त पराभव केला होता की तर्दी बेग रणांगणातून पळुन थेट काबूलच्या वाटेला लागला होता. व्यसनी,मानसिक रुग्ण असलेल्या आदिलशहा सुरीला फ़ाट्यावर मारुन हेमूने स्वत: हिंदुस्तानचा सम्राट होण्याचे ठरवले व ७ ऑक्टोबर १५५६ रोजी दिल्लीतील प्रसिद्ध पुराना किला येथे हेमूचा हिंदू पद्धतीने दिल्लीची जनता व अफ़गाण व हिंदू सैन्यासमोर राज्याभिषेक झाला.त्याने “सम्राट हेम चंद विक्रमादित्य” असे नाव धारण केले तसेच स्वत:च्या प्रतिमेच्या नाण्यांचे चलनही प्रस्थापित केले.
हेमूच्या बंगालपासून दिल्लीच्या धडकेनंतर व दिल्लीच्या कब्ज्यानंतर मोगल सैन्यात जरब बसली व बर्‍याच मोगल सरदारांनी गाशा गुंडाळुन काबूल येथे राजधानी स्थापून राज्य करावे असे मत व्यक्त केले परंतू बेहरामखान याने हेमूशी युद्धाचा आग्रह धरला. दिल्ली हातची गमावल्यावर १४ वर्षांचा सुल्तान जलालुद्दिनला हेमुच्या भीतीने सुरक्षित ठिकाणी नेले होते. दिल्लीकडे मोगल सैन्याने कूच केल्याची बातमी ऎकून हेमूही सैन्य घेऊन मोगलांचा पाडाव करण्यासाठी निघाला व ५ नोव्हेंबर १५५६ रोजी दोन्ही सैन्याची पानिपत येथे गाठ पडली.
बेहरामखान याने सैन्यास लढाईस प्रेरणा दिली व स्वत: मैदानापासून दूर राहीला. काही इतिहासकारांच्या मतानुसार, हेमूबद्दल प्रचंड भय आणि सुरक्षेच्या कारणास्तव जलालुद्दिन आणि त्याचा रक्षणकर्ता बेहरामखान याने युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला नव्हता. प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ते ८ मैल अंतरावर उभे होते. जलालुद्दिनबरोबर ५००० अतिविश्वासू आणि तयारीचे सैन्य होते, युद्धात पराभव होत असल्याचे दिसून येताच काबुलकडे पळून जावे असा बेहरामखानचा सैन्याला आदेश होता. हेमू स्वत: हत्तीच्या पाठीवरुन सैन्याचे नेतृत्व करत होता. पानिपतच्या या लढाईत हेमूच्या रणनीतीची आखणी नेहमीप्रमाणे होती. हेमूच्या मुख्य सैन्यातल्या हत्तींना तोंड देण्यसाठी शत्रूने आपले गजदळ आणि गजदळाचे संरक्षक धनुर्धर पुढे आणून ठेवले. तरी हेमूच्या सैन्याने प्रखर शौर्याच्या जोरावर शत्रूला मागे रेटले. बाजूने आणि पिछाडीवरून केलेल्या घोडदळाच्या हल्ल्यामुळे शत्रूसैन्याचा व्यूह पुरता विस्कळित झाला. पराभव डोळ्यासमोर आल्यामुळे शत्रुसैन्यात पळापळ सुरू झाली. हेमूचा विजय नजरेच्या टप्प्यात आला.तेवढ्यात शत्रूसैन्य पळत असतांना अचानक एक बाण हेमूच्या डोळ्यात लागला आणि आणखी एका बाणाने निशाण पडले. सैन्याच्या हालचाली नियंत्रित करणारा हेमू बेशुद्ध. आपण जखमी झालो तर सेनापतीपदाचे नेतृत्त्व कुणी करायचे याच्या सूचनाच अस्तित्त्वात नव्हत्या. रणनीतीतली ही फारच मोठी त्रुटी म्हणावी लागेल. हेमू जखमी झाल्याची खबर सैन्यात पसरली व सैन्याचे अवसान गिळाले, गोंधळात सैन्य सैरावैरा पळत सुटले आणि विजयाच्या उंबरठ्यावरून हेमूच्या सैन्याचा पराजय झाला. हेमूच्या हत्तीला बेहरामखानाच्या एका सरदाराने हत्तीवरूनच वेढा घालून वळवून जलालुद्दिनच्या शिबिरात नेले. तिथे जलालुद्दिनला गाझी सिद्ध करण्यासाठी हेमूचे मुंडके छाटले गेले,हेमूचा शिरच्छेद केला गेला. हेमूचे मुंडके हे काबूल मध्ये तर धड दिल्लीला पाठवून टांगण्यात आले. या लढाईत भाग घेतलेल्या हेमूचे सर्व पुतणे हेमूने दत्तक घेतलेल्या पुतण्यासह मारले गेले. लढाईत भाग न घेतलेला एकच पुतण्या गावात होता तेवढाच वाचला. त्याचे वंशज आजही आहेत. जलालुद्दिन दिल्लीच्या तख्तावर बसला व नंतर त्याने ‘अकबर’ हे नाव धारण केले.अकबराने हेमूचा इतका धसका घेतला होता की लढाईनंतर कित्येक महिने भार्गव आडनावाच्या प्रत्येक माणसाला अकबराच्या हेरांनी कापून काढले. भार्गव आडनावाचे लोक मग आडनाव बदलून राहू लागले. आपले देशी इतिहासकार, आपले स्वतःला विद्वान म्हणून समाजात मिरवणारे शालेय पाठ्यपुस्तकलेखककार देखील अकबराचे गोडवे गातात आणि सम्राट हेमू विक्रमादित्याचा साधा उल्लेखदेखील करीत नाहीत याची खंत वाटते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
५ नोव्हेंबर इ.स.१६६४
छत्रपती शिवरायांनी खवासखानाचा पराभव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
५ नोव्हेंबर इ.स.१८१७
इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात खडकी येथे लढाई
खडकी येथे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे
इंग्रजांसोबत भयानक युद्ध झाले. १२ दिवस राघोजी (लहुजीचे वडील) सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी
साळवेंनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन
इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या
स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या
समोर शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. १७
नोव्हेंबर १८१७ रोजी पुणे ब्रिटीशांच्या तावडीत गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻

शिवाजी महाराज्यांची पहिली स्वारी

1646  साली वयाच्या 16 व्या वर्षी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणा किल्ला जिंकला, तोरणा किल्यावर 7 रांजण सुवर्ण मोहरा सापडल्या. त्याच वर्षी कोंडाणा(सिंहगड) व पुरंदर किल्ले जिंकून पुणे प्रांतावर नियंत्रण मिळविले. यावेळी पहिल्या स्वारीत राज्यांबरोबर फक्त 300 मावळे होते.

रायगड

राज्यभिषेक दिन 6 जून.
महाराज्यांच्या काळात रायगडावरील लोकसंख्या कमीतकमी 10000 असे.
65 किल्ल्यांच्या गराड्यात रायगड किल्ला.
2000 फुटावर पहिली तटबंदी
4000 फुटावर दुसरी तटबंदी
किल्याची वाट एकदम छोटी.
किल्यावर 300 इमारती होत्या.
10000 लोकांना वर्षभर पाणी मिळावे यासाठी 9 टाके.
रायगडाला 3 बाजूला तटबंदी नव्हती फक्त पश्चिम बाजूला तटबंदी आहे.
किल्याचे एकूण क्षेत्र 1200 एकर.
रायगडावर 42 दुकाने होती. पैकी 21 दुकाने देशी माल विक्री व 21 दुकाने परदेशी माल विक्रीसाठी

समरभूमी उंबर खिंड : एक गनिमी कावा 

 
२ फेब्रुवारी १६६१
उंबर खिंड लढाई शिवाजी महाराजांना पुण्याच्या मुघली छावणीतील एक महत्वाची खबर मिळाली की, सरदार कारतलब खान मोठ्या फौजेनिशी नागोठणे, चौल, पेण वगैरे कोकणी ठाणी काबीज करण्यासाठी शाईस्तेखानाच्या हुकुमावरून निघत आहे. कारतलब खान उंबरखिंडीने नागोठण्याला उतरणार होता. खानाबरोबर माहूरची प्रख्यात देशमुखीण सावित्रीबाई उदाराम उर्फ पंडिता रायबागन ही शूर स्त्री देखील होती. उंबर खिंड पुण्याच्या वायव्य सरहद्दीवर येते. महाराज आधिच उंबर खिंडीत जावून खिंड अडवून उभे रहिले ! खान आला. पण त्याच्या फौजेला खिंडीच्याजवळ लौकर जाताच येईना. मार्गावर भयंकर आरण्य होते. मराठी फौजेसह शिवाजी राजे खिंडीतच उभे आहेत, याची खानाला कल्पनाच नव्हती ! महाराजांनी वकील पाठवून खानाला ‘सुखरूप सुटायचे असेल, तर आलात तसे परत जा -‘ असा निरोप पाठविला. खानाने तो धुडकावला. मग महाराजांनी आपल्या फौजेला हल्ला चढविण्याचा हुकूम दिला. मुघलांची भयंकर लंगडतोड सुरू झाली. त्यांना त्या घोर अरण्यात लढताही येईना ! पळताही येईना ! या अरण्याचे नाव आहे ‘तुंगारण्य’. अखेर खानाने रायबागनचा शरण जाण्याचा सल्ला ऐकला. खानाने आपला वकील पाठवला. महाराजांकडे वकिल आला. महाराज पांढर्‍या शुभ्र घोड्यावर बसले होते. त्यांच्या अंगावर चिलखत व पोलादी शिरस्त्राण होते. वकिला मार्फत खानाने बिनशर्त शरणागती पत्करली ! खानाचा प्रचंड पराभव झाला ! तो ज्या दिवशी झाला त्या दिवशी तारीख होती – २ फेब्रुवारी १६६१.
प्रचंड दौलत व सैन्य वाया घालवून कारतलब खान पुण्यास परतला. आता त्याला शाईस्तेखानाकडे वर मान करून बघायचिही हिंमत उरली नव्हती. कसाबसा जीव व आब्रू वाचवून तो पुण्यात परतला.

छत्रपती शिवरायांची गारद आणि तिच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ

गडपती – गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असे महाराज.
गजअश्वपती – ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं. म्हणुन गजअश्वपती हा शब्द आपण वैभवसंपन्नतेचे प्रतीक होता असे म्हणता येईल.) भूपती प्रजापती – वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज.
सुवर्णरत्नश्रीपती – राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवरायांच्या बाबतीत ३२ मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती.) अष्टावधानजागृत – आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.
अष्टप्रधानवेष्टीत – ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज.
न्यायालंकारमंडीत – कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज.
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत – सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज.
राजनितीधुरंधर – आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज.
प्रौढप्रतापपुरंदर – मोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज.
क्षत्रियकुलावतंस – क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज.
सिंहासनाधिश्वर – जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज.
महाराजाधिराज – विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.
राजाशिवछत्रपती – ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.

मराठा साम्राज्य : भाग ६ – फलटण संस्थान

फलटण संस्थान- मुंबई, सातारा जिल्ह्यांतील एक जहागीर. येथील जाहागीरदाराचें आडनांव निंबाळकर. मुख्य गांव फलटण. जहागिरीच्या उत्तरेस नीरा; पूर्वेस सोलापूर जिल्हा; दक्षिणेस माण, व खटाव तालुके; पश्चिमेस वाई व कोरेगांव हे तालुके. एकदंर गांवे ७२ आहेत क्षेत्रफळ ३९७ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) ५५९६६. उत्पन्न २ लाख रु. इंग्रज सरकारास ९६०० रु. खंडणी जाते. जहगिरीतींल उत्तरेचा नीराथडीचा प्रांत सुपीक व दक्षिणेचा डोंगराळ आहे. पाऊस फार कमी पडतो. हवा उष्ण आहे. ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा ही मुख्य पिंके होत. नीरा व बाणगंगा या मोठ्या नद्या.

इतिहास- महाराष्ट्रांतील राजघराण्यांत फलटणच्या निंबाळकराचें घराणे फार जुनें असून सुमारे सहा सातशें वर्षें तें राज्योपभोग घेत आहे. धारच्या परमार रांजावर दिल्लीच्या सुलतानांनीं पुन्हां पुन्हां हल्ले केले, त्या धामधुमींत निंबराज परमार नांवाचा एक पुरुष दक्षिणेंत फलटणनजीक शंभुमहादेवाच्या रानांत सन १२४४ च्या सुमारास येऊन राहिला. निंबराज ज्या गावीं राहिला त्यास निंबळक आणि त्यावरून त्याच्या वंशास निंबाळकर अशें नाव पडले. निंबराजाच्या वंशजांनी पुढे फलटण हें गाव वसविलें आणि तेथें ते वतन संपादून राहूं लागले. महंमद तुघ्लखाच्या वेळेस ह्यांस ‘नाईक’ हा किताब व फलटणची देशमुखी मिळाली. पुढें आदिलशाहींत निंबाळकराचें महत्त्व विशेष वाढलें. निंबराजापासून चवदावा पुरुष वणंगपाळ उर्फ जगपाळराव म्हणून झाला, त्याच्या पूर्वीची माहिती उपलब्ध नाहीं.

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

मराठा साम्राज्य : भाग 5 – भोसले कुळ

मालोजी भोसले
पूर्ण नाव मालोजी बाबाजीराजे भोसले

वडील बाबाजीराजे भोसले
पत्नी उमाबाई
संतती मालोजीराजे भोसले,
व्यंकोजीराजे भोसले
राजघराणे भोसले
चलन होन

बालपण
मालोजीरावांचे लग्न

मालोजी यांचे लग्न फ़लटणचे देशमुख जगपालराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई हिच्याशी झाले होते. त्यांना लवकर संतान होईना म्हणून मालोजी व दिपाबाई यांना वाईट वाटत होते. त्यांनी नगरचा पीरशहा शरीफ़ यांस नवस केला. त्याच्या अनुग्रहाने दिपाबाईला १५९४ व १५९७ ला दोन मुले झाली. त्यांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवण्यात आली. पुढे शहाजीना संभाजी, शिवाजी व व्यंकोजी ही ३ मुले झाली.
कारकीर्द

बाबाजीराव भोसले यांचे चिरंजीव मालोजीराजे भोसले हे पराक्रमी, युद्धप्रसंगी दाखवायची बुद्धिमत्ता असलेले व उत्तम प्रशासक होते. भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजी यांनी घातला.वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून मालोजीची पत्नी उमाबाई हिच्या हस्ते पिंडीला अभिषेक करण्यात आला. मंदिराच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पहावयास मिळतो. मालोजीनी साताऱ्यातील श्रीशिखरशिंगणापूरच्या डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधून तलाव तयार केला आणि यात्रेकरूंचा दुवा मिळवला. निजामशाहीने ऒरंगाबादेत ’मालपुरा’ व ’विठापुरा’अशा दोन पेठा भोसले घराण्याच्या नावे वसवल्या. मालोजीचा पराक्रम वाढतच गेला. आपल्या कामगिरीने मालोजीनी बुऱ्हाणपूरच्या निजामाचा विश्वास संपादन केला.त्यामुळे सरहद्दीवरील इंदापूरच्या बाजूच्या शत्रूचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवली. या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवून मालोजी रणक्षेत्रावर मरण पावले. भोसले घराण्यातील वीराच्या पराक्रमाचे ’पहिले स्मारक’ मालोजीच्या छत्रीच्या रूपाने इंदापूरला बांधले गेले.

शहाजीचे लग्न

मालोजीचा मुलगा शहाजी व लखुजी जाधवाची मुलगी जिजाऊ हे लहानपणी एकत्र खेळत असत. पण घरातील विरोधामुळे लखुजींनी संबंध नाकारले. मालोजीला कमी लेखले गेले. मालोजी पुन्हा वेरूळला आले. तिथे त्यांना देवीचा दृष्टांत होऊन द्रव्याने भरलेला हंडा सापडला. त्यातून मालोजीनी हजारो घोडे घेतले व आपली फौज तयार ते करून सरदार बनले. निजामशाहीवर मोगलाचे संकट आल्याने मालोजी भोसले निजामशाहीत कर्तबगार सरदार बनले, व लखुजी जाधवाने आपली मुलगी शहाजींना देऊन सोयरीक जमवली.

भोसले यांची वंशावळ

१. सजनसिंघ २. दिलीपसिंघ ३. सिंघजी ४. ‘भोसाजी’ ५. देवराज ६. इंद्रसेन ७. शुभकृष्ण ८. रूपसिंघ ९. भूमींद्र १०. धापजी ११. बरहटजी १२. खेलोजी १३. कर्णसिंघ १४. संभाजीराजे १५. बाबाजीराजे १६. मालोजीराजे १७. शहाजीराजे १८. शिवाजीराजे १९. संभाजीराजे २० शाहूराजे.

मराठा साम्राज्य : भाग 4 – भोसले कुळ

खेलकर्णजी माहाराज आणि मालकर्णजी माहाराज
शेडगावकरांच्या बखरीत सुरुवातीलाच, “ सिसोदे महाराणा याची वौशावळ मारवाडदेशाचे ठाई उदेपुरानजिक चितोडे शहर आहे तेथे एकलिंग माहाराज शंभू माहादेव वश्री जगदंबा देवी आहे तेच कुळस्वामी तेथील संवस्थानी सिसोदे माहाराणेआहेत. त्यांतिल एक पुरुष सजणसिव्हजी माहाराणे याजपासून संततीचा विस्तार: ” असे म्हणून त्यातील एकेक करून चौदा पुरुषांचे फक्त नाव नमुद केलेले आहे.त्यावरून कोण नेमका कोणाचा पुत्र अथवा कोणाचा भाऊ हे समजून येत नाही. तीसर्व नावे पुढीलप्रमाणे-

१. सजणसिव्हजी माहाराणा
२. दिलिपसिव्हजी माहाराणा
३. सिव्हाजी माहाराणा
४. भोसाजी माहाराणा
५. देवराजजी माहाराज
६. इंद्रसेनजी माहाराज
७. शुभकृष्णजी माहाराज
८. स्वरूपसिव्हजी माहाराज
९. भुमिंद्रजी माहाराज
१०. यादजी माहाराज
११. धापजी माहाराज
१२. बर्हाटजी माहाराज
१३. खेलकर्णजी माहाराज
१४. मालकर्णजी माहाराज.
इथे बखरीत असं नमुद केलं आहे की, चितोडगडाच्या जवळच भोशी किल्ला आहे, त्याकिल्ल्याच्या जवळच असणार्या भोसावत या गावी रहायला आल्यापासून याराजवंशाचे शिसोदे हे आडनाव मागे राहून ‘भोसले’ असं झालं. तर्क असा आहे, कीअल्लाउद्दीन खलजीने चितोडगडावर आक्रमण केल्यानंतर चितोडचा महाराणालक्ष्मणसिंह शिसोदिया हा आपल्या सात मुलांसह लढता लढता मारला गेला, आणित्याच्या आठव्या पुत्राला, अजयसिंहाला राजपुतांनी खलजीपासून वाचवूनसुरक्षित ठिकाणी लपवून ठेवले. कदाचित अजयसिंहांचेच हे पुढचे वंशज खलजीपासूनबचाव करण्यासाठी, आपला शिसोदिया म्हणून निर्वंश होवू नये म्हणून ‘भोसावत’ या नावाने राहू लागले असावेत. पण या गोष्टीला हवा तसा पुरावा आजुन सापडलेला नाही.

या शिसोदिया कुळातल्या राजांच्या दक्षिणेतल्या प्रवेशाबद्दलशेडगावकरांचा बखरकार म्हणतो, “ येकंदर पुरुष चौदा त्यांपैकी खेलकर्णजीमाहाराज व मालकर्णजी माहाराज असे दोघे बंधू हे दक्षणदेशी आलें ते आमेदशापातशहा दौलताबादकर ( दौलताबादचा अहमदशहा निजामशहा) यास येऊन भेटले. त्यानीत्यांचा मोठा सन्मान करून नंतर दर असामीस प्रथक प्रथक (?) पंधरा पंधराशेस्वारांच्या सरदार्या मणसब देऊन हे (भोसले बंधू) पातशाही उमराव म्हणवीतहोते. त्या उभयता बंधूंच्या नावे सरंजाम चाकरीबद्दल चाकण चौर्यासी (चाकणआणि भवतालची चौर्यांशी खेडी) परगणा व पुरंधेरचे खाली परगणा व सुपे माहालअसे तीन माहाल तैनातीबद्दल त्याजकडे लाऊन दिल्हे त्याप्रमाणे ते उभयेताबंधू चाकरी करीत होते”

‘२४ ऑक्टोबर’ हा दिवस ‘मराठा आरमार दिन’

 

भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. शिवरायांच्या पूर्वीही हजारो वर्षांपासून आपल्याकडे आरमार होते. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे भारतात आरमाराचा वापर पूर्णपणे बंद झाला. एवढेच काय तर समुद्र उल्लंघायला देखील बंदी करण्यात आली. याचा फायदा पोर्तुगीज-इंग्रज-डच-फ्रेंच-सिद्दी यांनी उठविला आणि आपल्याला अनेक वर्षे गुलामगिरीत काढावी लागली. त्यावेळचे बलाढ्य सम्राट मोगल-आदिलशाह-निजामशहा-कुतुबशाह इ. यांनीदेखील प्रबळ असे लढाऊ आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही.

मात्र शिवाजी महाराजांनी कोकणाचा मुलुख ताब्यात आल्यानंतर तेथील समुद्र पाहून, सिद्दी व युरोपियनांच्या उचापती पाहून लढाऊ आरमार उभे केले. एवढेच नाही तर अत्यंत कमी कालावधीत उत्तमोत्तम सागरी किल्ले बांधले.धार्मिक चालीरीती झुगारून देऊन आपल्या मावळ्यांना बलाढ्य युरोपियनांविरुद्ध लढण्याची नवी प्रेरणा दिली. आणि… आणि मग पुढच्या पिढीने आपल्या समुद्रावरील युरोपियनांची सत्ता खिळखिळी करून टाकली.पोर्तुगीज तर स्वतःला हिंदी महासागराचे मालकच समजत. समुद्रामध्ये बाहेर पडणाऱ्या कोणत्याही जहाजांना मग ते बलाढ्य मोगलांचे असले तरी त्यांना पोर्तुगीजांकडून कार्ताझ (परवाने) विकत घ्यावे लागत. मोगलांची हि स्थिती तर आपली काय ? त्यावेळच्या सागरी किनारपट्टीवरील बलाढ्य शाह्यांपुढे मराठयांची नव्याने उदयास आलेली सत्ता अगदीच छोटी होती. मात्र शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी आरमाराची गरज ओळखली.

शिवरायांच्या आरमारासंबंधी एक कवी म्हणतो-

देशी भार्गव क्षेत्र सागर तिरी नाना स्थळे योजिनी
बंदी दुर्ग अनेक डोंगर शिरी बेटे बाले पाहुनी
जहाजे आरमार भर जलधि दुष्टांसी शिक्षा करी
बारा मावळ देश पर्वत दरी बांधोनि किल्ले गिरी

हा झाला आपला इतिहास, मात्र आपण तो कदापी विसरता कामा नये.

शिवाजी महाराजांनी इ.स. १६५६ मध्ये जावळी काबीज केली. जावळीमध्ये कोकणाचा बराचसा भाग येत असल्याने राजांचा कोकणात प्रवेश झाला. ४ नोव्हेंबर १६५६ पूर्वी मराठ्यांच्या सिद्दीशी अनेक झटापटी झाल्या. ऑक्टोबर १६५७ ते जानेवारी १६५८ या कालावधीत शिवरायांनी १०० किमी. लांबीचा समुद्रकिनारा व मुलुख मिळविला. मिळविलेल्या या नव्या मुलुखाच्या संरक्षणासाठी व सिद्दीच्या कुरापती थांबविण्यासाठी व त्याला समुद्रमार्गे मिळणारी रसद तोडण्यासाठी नाविक दल (लढाऊ आरमार) असणे गरजेचे होते. त्यासाठी योग्य अशी जागा / तळ असणे गरजेचे होते. *ऐन समुद्रामध्ये नौका बांधता येत नाहीत. लष्करीदृष्ट्या समुद्रामधून आत घुसलेली खाडी हि जहाजबांधणीसाठी उत्तम जागा असते.

आणि अखेर तो दिवस उजाडला….. दि. २४ ऑक्टोबर १६५७ रोजी ऐन दिवाळीत (धनत्रयोदशी) कल्याण, भिवंडी काबीज केली. आणि कल्याण, भिवंडी व पेण येथे मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती झाली. _यावर्षी या घटनेस ३५९ वर्षे पूर्ण झालेली आहेत._ हि आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

अशा शुभमुहूर्तावर शिवरायांनी आरमाराची उभारणी केली, म्हणून ‘२४ ऑक्टोबर’ हा दिवस ‘मराठा आरमार दिन’ किंवा ‘भारतीय आरमार दिन’.

मराठा साम्राज्य : भाग 2 – भोसले कुळ


खेलकर्णजी माहाराज आणि मालकर्णजी माहाराज
बखरकार म्हणतो, की या उभयतां भावांना खेलकर्ण आणि मालकर्ण ऐवजी खेलोजी आणिमालोजी अशी नावे पडली. याचे कारण बखरकार लढाईच्या निमित्ताने देत असला तरीयाचे मूळ कारण असे असावे- सुलतानी अंमलात, मुसलमान लोक हे एखाद्याहिंदूला, जरी तो बडा सरदार अथवा सेनापती असला तरीही काफर म्हणून तुच्छतेनेचसंबोधत असत. यासाठी पुढील व्यक्तिंची उदाहरणे पाहू. महाराजांच्या पंताजीगोपिनाथ बोकील या वकीलाला अफजलखान ‘पंतू’ म्हणायचा. औरंगजेब नेतोजीपालकराला ‘नेतू’, खुद्द शिवाजी महाराजांना ‘सिवा’ आणि संभाजी महाराजांना ‘संभा’ म्हणायचा हे अस्सल पत्रांतू दिसून येतं. त्यामूळेच इथेही साहजिकच, ‘खेलकर्णजी’ आणि ‘मालकर्णजी’ ही नावे गळून पडून खेलो आणि मालो असेच उल्लेखकेले गेले असावेत. अर्थात, हे दोघेही कितीही झालं तरी निजामशाहाचे सरदारअसल्याने त्यांच्या नावापुढे ‘जी’ हे आदरार्थी विशेषण लावणे भागच होते.म्हणूनच यांची नावे पुढे ‘खेलोजी’ आणि ‘मालोजी’ अशीच रुढ झाली. पुढे खेलोजीहे लढाईत ठार झाले आणि मालोजी हे एके दिवशी चाकणजवळच्या चासकमान (थोरल्याबाजीरावांच्या पत्नीचे माहेरही याच गावचे होते) गावात जलक्रिडा करावयासगेले असता बुडून मृत्यू पावले.